Maharashtra Breaking News LIVE 23 December 2024 : 8-10 दिवसांनंतर मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचं भुजबळांना आश्वासन

| Updated on: Dec 23, 2024 | 11:58 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 23 डिसेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 23 December 2024 : 8-10 दिवसांनंतर मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचं भुजबळांना आश्वासन
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Dec 2024 11:56 AM (IST)

    एमपीएससीच्या वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ

    एमपीएससीच्या वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्यात आली आहे. परीक्षेची जाहिराती येण्यास विलंब झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीच्या 1 हजार 813 जागांसाठी भरती होणार आहे. 5 जानेवारी, 2 फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे.

  • 23 Dec 2024 11:52 AM (IST)

    राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेणार

    राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आहेत.

  • 23 Dec 2024 11:40 AM (IST)

    8-10 दिवसांनंतर यावर मार्ग काढू, असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन- भुजबळ

    “कुठल्याही प्रकारे ओबीसीचं नुकसान होणार नाही, याची काळजी मलासुद्धा खूप आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मला तुम्ही आठ-दहा दिवस द्या. त्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि यातून निश्चितपणे चांगला मार्ग शोधून काढू, असं आश्वासन त्यांनी दिली. ओबीसी नेत्यांना माझा निरोप द्या की मी जरूर त्याच्यावर साधक-बाधक विचार करतोय, असं मुख्यमंत्री म्हणाले”, असं भुजबळ म्हणाले.

  • 23 Dec 2024 11:38 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद

    “आज मी आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींबद्दल चर्चा झाली. सामाजिक-राजकीय.. काय काय घडलं त्यासंदर्भात चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत, मी ऐकल्या आहेत. चर्चेनंतर त्यांनी सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की यावेळेला आपल्याला जो महाविजय मिळालाय, त्यामागे ओबीसीचं आपल्याला पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं, त्याचाही मोठा वाटा आहे”, असं भुजबळ म्हणाले.

  • 23 Dec 2024 11:25 AM (IST)

    छगन भुजबळ-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

    “छगन भुजबळ यांची ‘मास लीडर’ म्हणून ओळख आहे. त्यांचा रोष सुनील तटकरेंकडे जास्त आहे,” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तर भुजबळ-फडणवीसांमध्ये राजकीय भेट नसावी, असा अंदाज अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे. भुजबळ बंडाचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता प्रवीण दरेकरांनी वर्तवली आहे.

  • 23 Dec 2024 11:15 AM (IST)

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे- धनंजय देशमुख

    बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. “काल नवीन एसपींनी ग्रामस्थांची भेट घेतली. आरोपींना लवकर अटक करू असं एसपींनी सांगितलंय,” असं ते म्हणाले.

  • 23 Dec 2024 11:06 AM (IST)

    ‘सागर’ बंगल्यावर भुजबळ आणि फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा

    छगन भुजबळ ‘सागर’ बंगल्यावरून निघाले आहेत. भुजबळ थोड्याच वेळात माध्यमांशी संवाध साधणार आहेत. अर्ध्या तासानंतर भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावरून निघाले. ‘सागर’ बंगल्यावर भुजबळ आणि फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.

  • 23 Dec 2024 10:52 AM (IST)

    फडणवीस सरकारमध्ये जुन्याजाणत्या नेत्यांचे महत्त्व कमी झाल्याची शिंदेंच्या शिवसेनेत चर्चा

    फडणवीस 3.0सरकारमध्ये भाजपकडून जुन्याजाणत्या नेत्यांचे महत्त्व कमी झाल्याची शिंदेंच्या शिवसेनेत चर्चा.

    नवीन चेहऱ्यांना अधिक संधी, अन्य पक्षांमधून आलेल्यांकडे महत्त्वाची खाती, ग्रामीण भागात पक्षाची पकड बसविण्यासाठी ग्रामविकास आणि पंचायत राज हे अधिक महत्त्वाचे खाते काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या जयकुमार गोरे यांच्याकडे सोपवण्यात आले. तर सार्वजनिक बांधकाम हे अन्य महत्त्वाचे खाते भाजपने राष्ट्रवादीतून दाखल झालेल्या शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे

    गणेश नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांच्याकडे वने हे खाते सोपविण्यात आल्याने भाजपमधील अनेकांचा त्याला आक्षेप आहे.

  • 23 Dec 2024 10:33 AM (IST)

    छगन भुडबळ हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर

    मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचलेत.

  • 23 Dec 2024 10:21 AM (IST)

    महाराष्ट्राचा चित्ररथ का डावलला ? शिंदेंनी विचारला पाहिजे हा प्रश्न – संजय राऊत

    छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ का डावलला ? हे राज्याचे उपमुख्यमंत्री, स्वत:ला शिवसेना प्रमुख म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि मोदींना विचारलं पाहिजे.

  • 23 Dec 2024 10:13 AM (IST)

    काहींना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हवं असतं – राऊतांचा शिंदेंवर निशाणा

    महायुतीचे पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आहेत. काहींना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हवं असतं, मलिदा हवा असल्याने  पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू – संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा.

  • 23 Dec 2024 10:08 AM (IST)

    एकनाथ खडसे- गिरीश महाजनांमधील वाद लवकरच संपेल – रक्षा खडसेंना विश्वास

    एकनाथ खडसे- गिरीश महाजनांमधील वाद लवकरच संपेल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाला गती मिळेल असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.

  • 23 Dec 2024 10:06 AM (IST)

    तुळजापुर मध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग, सामान जळून खाक, जीवितहानी नाही

    तुळजापुर मध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली असून त्यामध्ये  भंगारासह दुकानातील इतर सामान जळून खाक झालं.

    तुळजापुर मधील पापनस तिर्थाजवळ असलेल्या भंगाराच्या दुकानाला सकाळी ९ च्या दरम्यान लागली आग. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र अग्निशमन दलाकडुन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • 23 Dec 2024 09:40 AM (IST)

    सांगलीचा पारा घसरला, सर्वत्र धुक्याची चादर

    गेल्या तीन दिवसापासून वातावरणामधील पारा घसरल्याने सांगलीकर धुक्याचा आनंद घेत आहेत. शनिवारपासून सांगली जिल्ह्यावर गर्द धुके पडायला सुरुवात झाली आहे. आज सोमवारी सुद्धा सलग तिसऱ्या दिवशी सांगलीवर धूक्याने आपली चादर पांघरली आहे. पहाटेपासूनच गर्द धुके सांगलीवर पडले आहे. त्यामुळे पहाटेच्या सुमारास आणि सकाळी सांगलीकरांना या धुक्यातूनच वाट काढावी लागली. सलग तिसऱ्या दिवशी सुखद असे धुके पडल्यामुळे सांगलीकर या धुक्यात फिरण्याचा आनंद घेत आहेत.

  • 23 Dec 2024 09:38 AM (IST)

    राहुल गांधी आज परभणीत, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणीत येणार आहेत. दुपारी सव्वा दोन वाजता न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतील. यानंतर दुपारी तीन वाजता आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. या पार्श्वभूमीवर कालपासूनच पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील अनेक अधिकारी परभणीत तळ ठोकून आहेत. राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. यावर राहुल गांधी काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

  • 23 Dec 2024 09:36 AM (IST)

    चालत्या सीएनजी कारने अचानक पेट घेतला, एकाचा मृत्यू

    सांगली :  सांगलीच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील बोरगाव टोलनाका येथे चालत्या सीएनजी कारने अचानक पेट घेतल्याने स्फोट होऊन चालकाचा जळून मृत्यू झाला आहे. गणेश माळवदे,वय 27 असे या चालकाचे नाव आहे. कवठेमहांकाळकडून मिरजेकडे जात असताना बोरगाव टोल नाका येथे सीएनजी कार असणाऱ्या गाडीने अचानक पेट घेतला. त्यानंतर काही क्षणातच पेटलेल्या गाडीत स्फोट होऊन गाडीच्या आत अडकलेल्या चालकाचा होरपळून मृत्यू झाला. आग लागल्यानंतर गाडीचे चारही दरवाजे लॉक झाले, त्यामुळे चालक गणेश याला बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे गाडीसह तो आगीत जळून मृत्यूमुखी पडला आहे.

  • 23 Dec 2024 09:35 AM (IST)

    पुण्यात बनावट नोटा जप्त, गुजरातमधील तरुणाला अटक

    पुणे : पुणे शहराच्या मध्य भागात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुजरातमधील तरुणाला अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुजरातमधील तरुणाला समर्थ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१, अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. गौरव रामप्रताप सविता (वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

  • 23 Dec 2024 09:34 AM (IST)

    थंडीचा कडाका सरला, हलक्या पावसाचा अंंदाज

    गेल्या काही दिवसांत शहर आणि परिसरात वाढलेला थंडीचा जोर आता कमी होऊन किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. तसेच, पश्चिमी विभोक्ष (वेस्टर्न डिस्टर्बन्स) येऊ घातला असून, २६ डिसेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत अति हलका ते हलका पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

  • 23 Dec 2024 09:28 AM (IST)

    राहुल गांधी आज परभणीत, सूर्यवंशी कुुटुंबाची भेट घेणार

    राहुल गांधी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. दुपारी 2 वाजता राहुल गांधी परभणीत दाखल होतील. त्यानंतर ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जातील. यानंतर ते विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करतील.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात परभणी हिंसाचार प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेली मारहाण यावरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत सोमनाथच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी जाणार आहेत. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यासोबतच पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. यात एका डंपरने ९ जणांना चिरडले आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ल्याप्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. यांसह अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा.

Published On - Dec 23,2024 9:05 AM

Follow us
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.