Maharashtra Breaking News LIVE 15 January 2025 : लायब्ररीला डॉ. मनमोहन सिंह यांचं नाव – खरगे
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 15 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
लायब्ररीला डॉ. मनमोहन सिंह यांचं नाव – खरगे
नव्या काँग्रेस मुख्यालयात असलेल्या लायब्ररीला डॉ. मनमोहन सिंह यांचं नाव दिलं जाणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.
-
महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची- राहुल गांधी
“महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार यादीमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागितली ती त्यांनी दिली नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.
-
-
बीड- वाल्मिक कराडला केज पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं जाणार
बीड- वाल्मिक कराडला केज पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं जाणार आहे.. मकोका अंतर्गत पुण्यात अटक दाखवली जाणार आहे. वाल्मिक कराडला अटक दाखवण्याची प्रक्रिया सुरू असून काही वेळात केज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
-
भारतानं ‘सागर’ हा जगाला मंत्र दिला- मोदी
“कोरोना काळातही भारताने चांगलं काम केलंय. भारतानं ‘सागर’ हा जगाला मंत्र दिला. वाघशीर या सहाव्या पाणबुडीचं राष्ट्रार्पण करण्याचं भाग्य मिळालं. जगाचा भारतावरील विश्वास वाढलाय. आपण जगाला वन अर्थ, वन फॅमिलीचा मंत्र दिला”, असं मोदी म्हणाले.
-
नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण मोठं पाऊल उचलत आहोत- मोदी
“नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण मोठं पाऊल उचलत आहोत. दोन्ही युद्धनौकांसह पाणबुडी भारत निर्मित आहेत. भारतीय नौदल ताकदवान बनतंय”, असं मोदी म्हणाले.
-
-
गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींचे बंदुकीचे परवाने होणार रद्द
गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या शस्त्र परवान्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. सध्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात शस्त्र परवाने रद्द करण्याच्या प्रक्रिया सुरू असतानाच जालना जिल्हा पोलीस प्रशासन देखील ॲक्शन मोडवर आलेय.जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींचे शस्त्र परवाने (बंदूक आणि इतर शस्त्रे) रद्द केले जाणार असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.
-
महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का
महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी घेतला काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसात त्या पक्षाचा राजीनामा देणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर हेमलता पाटील नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत नाशिकमधली जागा ठाकरे गटाला दिल्यापासून हेमलता पाटील नाराज होत्या.
-
-
मोदींच्या हस्ते आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या युद्धनौकांचं राष्ट्रार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज दोन युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण होणार आहे. मोदींच्या हस्ते आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या युद्धनौकांचं आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचं जलावतरण होईल.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. मोदींच्या हस्ते आज 2 युद्धनौका, पाणबुड्यांचे आज राष्ट्रापर्ण होणार आहे. त्यानंतर ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. तर आज दुपारी दे खारघर येथे इस्कॉन मंदिराचे लोकार्पण करतील.
-
वाल्मीक कराडचा तुरुंगातून एसआयटीने घेतला ताबा
वाल्मीक कराडचा तुरुंगातून एसआयटीने ताबा घेतला. वाल्मीकला हत्या आणि मकोकाच्या गुन्ह्यात कागदोपत्री अटक करण्याची प्रक्रिया सुरू.
कागदोपत्री अटकेची कारवाई पूर्ण करून केज कोर्टात हजर करणार.
-
शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या विष्णू भंगाळे यांची शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव जिल्हा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या विष्णू भंगाळे यांची शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव जिल्हा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. दोन महिन्यांनंतर विष्णू भंगाळे यांची शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव जिल्हा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे.
-
Maharashtra News: कर्करोगग्रस्त महिलांना आर्थिक मदतीचा हात
मिरा-भाईंदर पालिकेने कर्करोगग्रस्त महिलांसाठीच्या आर्थिक मदतीच्या धोरणात बदल केला आहे. याआधीच्या धोरणात कर्करोगाच्या प्रकारासंदर्भात स्पष्टता नसल्याने अनेक महिला मदतीपासून वंचित राहिल्या होत्या. नव्या धोरणामुळे महिलांच्या आर्थिक मदतीचा मार्ग खुला झाला आहे.
-
Maharashtra News: मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी… दिल्ली निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या अडचणीत वाढ… अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोपनिश्चिती होण्यापूर्वी पूर्वपरवानगी आवश्यक होती… केंद्रीय गृहमंत्रालयाने ED ला पूर्व परवानगी दिली आहे… गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ED ला खटला चालवण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाची पूर्व परवानगी घेणे गरजेचे असेल. त्यानुसार ही परवानगी दिली गेलेली आहे…
-
Maharashtra News: काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाचे आज उद्घाटन
सकाळी दहा वाजता होणार उद्घाटन… सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन… राज्यातील काँग्रेस नेतेही उद्घाटनाला उपस्थित राहणार… नव्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला इंदिरा भवन असे नाव…
-
यूजीसी नेटची परिक्षा पुढे ढकलली
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) 15 जानेवारीला घेण्यात येणारी विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, 16 जानेवारीची परीक्षा आधीच्याच नियोजनानुसार होणार असल्याचं ‘एनटीए’चे संचालक राजेश कुमार यांनी सांगितलं.
-
उत्तर भारतात आज प्रचंड धुकं
राजधानी दिल्लीतील दृश्यमानता पोहोचली शून्यावर. दिल्ली विमानतळ, इंडिया गेट परिसरात प्रचंड दाट धुक. हिमाचल प्रदेश उत्तराखंड राज्यातही पहाटेपासून मोठ्या प्रमाणात धुकं. उत्तर भारतातील सर्वच राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्गांवरही परिणाम. दिल्लीत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या उशिरा.
-
लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाच्या कोठडीत वाढ
कर्वेनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी नृत्य शिक्षकाच्या पोलीस कोठडीत विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली.
-
Congress : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि प्रवक्ते हेमलता पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत. या फेसबुक पोस्टद्वारे पुन्हा खदखद व्यक्ति केली. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पक्ष सोडण्याचे देखील दिले संकेत. भावी राजकीय वाटचालीसाठी तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा असा पोस्टमध्ये उल्लेख.
-
PM Modi Mumbai Visit : कसा असेल मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याहस्ते आज मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी देशाला समर्पित करण्यात येईल. खारघर येथे बांधण्यात आलेल्या इस्कॉन मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आहे. महायुतीच्या आमदारांशी सुद्धा मोदी संवाद साधतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचवेळी पीएम मोदी आज महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्याबाजूला आज सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. सोमवारी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी सर्व आरोपींना मोक्का लावावा यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. काल वाल्मिक कराड समर्थकांनी परळी पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं. यावेळी काही समर्थकांनी वाल्मिक कराडच्या सुटकेच्या मागणीसाठी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. एका समर्थकाचा पेटवून घेण्याच्या प्रयत्नात पाय जळाला.
Published On - Jan 15,2025 8:24 AM