Maharashtra Breaking News LIVE 16 January 2025 : सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल काय अपडेट?

| Updated on: Jan 16, 2025 | 10:12 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 16 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 16 January 2025 : सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल काय अपडेट?
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Jan 2025 10:12 AM (IST)

    सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर घरात दबा धरून बसली होती.

    सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर घरात दबा धरून बसली होती. ⁠रात्री २ वाजता त्याचा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सूरु असल्याचा आवाज सैफ यांना आला. तो बाहेर आला आणि त्या व्यक्तीने सैफवर हल्ला केला. ⁠हल्लेखोर हा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का ? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का ? याचा पोलिस तपास करत आहेत.

  • 16 Jan 2025 09:49 AM (IST)

    आज धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपणार

    आज धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. जिल्हा परिषदेबरोबरच चारही पंचायत समितीचा कार्यकाळ आज संपणार आहे.  धुळे जिल्ह्यातील धुळे शिरपूर शिंदखेडा साक्री पंचायत समितीचा कार्यकाळ संपणार आहे. प्रशासक जिल्हा परिषदेसह पंचायत समितीचे कामकाज पाहणार आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या वतीने मुदत वाढवून मिळवण्यासाठी महासभेत ठराव करण्यात आला होता. जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत प्रशासन बघणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे काम पाहणार आहेत.

  • 16 Jan 2025 09:44 AM (IST)

    भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी प्रसारित

    भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी प्रसारित करण्यात आली. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पीयूष गोयल हे स्टार प्रचारक असणार आहेत. तसेच सर्व भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

  • 16 Jan 2025 09:25 AM (IST)

    वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक सैफ अली खानच्या घरी दाखल, सीसीटीव्हीची तपासणी सुरु

    वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक अभिनेता सैफ अली खानच्या घरी पोहोचले आहे.  पोलिस सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही आणि आजूबाजूच्या इमारतींचे सीसीटीव्ही तपासत आहेत. हल्लेखोर कोण होता, तो कुठून आला आणि त्याने कोणत्या उद्देशाने हल्ला केला, याबाबतची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.

  • 16 Jan 2025 08:54 AM (IST)

    Saif Ali Khan Attack : पोलिसांनी कोणाचे फोन घेतले ताब्यात

    पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या आणि सुरक्षेचे काम करणाऱ्या लोकांचे मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे.

  • 16 Jan 2025 08:37 AM (IST)

    Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर उपचार करणारे डॉक्टर कोण?

    “सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात आणलं गेलं. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर झाल्या आहेत. एक जखम त्याच्या पाठीच्या कण्याजवळ आहे. आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि अॅनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. सैफवर सर्जरी झाल्यानंतरच आम्ही अधिक माहिती देऊ शकू”, असं लिलावती रुग्णालयाचे सीईओ नीरज उत्तमणी यांनी स्पष्ट केलं.

  • 16 Jan 2025 08:30 AM (IST)

    Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल अपडेट

    घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सैफवर झाला हल्ला. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर आहेत.

  • 16 Jan 2025 08:25 AM (IST)

    नाशिक भाजपमध्ये पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका मागणी

    पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका. भाजपातील निष्ठावंत पाठवणार मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना अहवाल. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडलेले अनेक लोक परतीच्या वाटेवर. विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांना पुन्हा घेऊ नये. अन्यथा पक्षात असंतोष निर्माण होण्याची व्यक्त केली भीती.

  • 16 Jan 2025 08:17 AM (IST)

    भिमाशंकर परिसरात स्ट्रॉबेरीचं नवं क्लस्टर

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात म्हणजेच भिमाशंकर परिसरात आता स्ट्रॉबेरीचं नवं क्लस्टर तयार होतंय. मागच्या दोन वर्षात येथील शेतकऱ्यांची आणि स्ट्रॉबेरी क्षेत्राची 10 पटीने वाढ झाली असून जवळपास तीन हेक्टरच्या वर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे

  • 16 Jan 2025 08:15 AM (IST)

    अमरावतीकरांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी

    अमरावतीकरांना आता मिळणार दोन वंदे भारत एक्स्प्रेस. अमरावती ते पुणे आणि अमरावती ते मुंबई धावणार वंदे भारत एक्सप्रेस. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठवल्याची माहिती. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास पश्चिम विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार.

  • 16 Jan 2025 08:12 AM (IST)

    Saif Ali khan Attack : सैफ अली खानवर चाकू हल्ला

    घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची माहिती आहे. सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोठ्या थकबाकीदारांच्या एकूण 41 निवासी आणि बिगरनिवासी मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया कर संकलन विभागाने सुरू केली आहे. या मालमत्तांचा लिलाव 30 जानेवारीला होणार आहे. कर संकलन कार्यालयाने मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करून जप्त केल्या आहेत, तरीही मालमत्ताधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने त्या मालमत्तांचा लिलाव जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात म्हणजेच भिमाशंकर परिसरात आता स्ट्रॉबेरीचं नवं क्लस्टर तयार होतंय. मागच्या दोन वर्षात येथील शेतकऱ्यांची आणि स्ट्रॉबेरी क्षेत्राची 10 पटीने वाढ झाली असून जवळपास 3 हेक्टरच्या वर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. डोंबिवलीतील रो हाऊसच्या नावाखाली 44 लाखाची फसवणूक. विकासक आणि दोन साथीदारांविरुद्ध विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांचा तपास सुरू.

Published On - Jan 16,2025 8:11 AM

Follow us
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.