Maharashtra Breaking News LIVE 7th January 2025 : HMPV च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

| Updated on: Jan 07, 2025 | 4:02 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 7 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 7th January 2025 : HMPV च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 07 Jan 2025 04:02 PM (IST)

    HMPV च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

    एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. त्याचबरोबर संभाव्य एचएमटीव्हीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला मार्गदर्शनही करण्यात आलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी,असं आवाहन सांगलीच्या शासकीय रुग्णालयाचे सांगली जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम यांनी केलं आहे.

  • 07 Jan 2025 03:39 PM (IST)

    दिल्लीत एकूण 1 कोटी 55 लाख मतदार- CEC राजीव कुमार

    केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण 70 मतदारसंघांमध्ये एकाच फेरीत मतदान पार पडणार आहे. 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 ला मतमोजणी होणार आहे. सध्या दिल्लीत 1 कोटी 55 लाख मतदार आहेत. तर 83 लाखांहून अधिक पुरुष मतदार आहेत .तर 71.74 लाखांहून अधिक महिला मतदार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

  • 07 Jan 2025 03:12 PM (IST)

    दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती

    दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे. दिल्लीत फेब्रुवारीत निवडणुका पार पडणार आहेत. दिल्लीतील सर्व 70 जागांवर एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

  • 07 Jan 2025 03:06 PM (IST)

    मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिस्कटली, मुंबईत मनसेच्या बैठकीत नेत्यांचा सूर

    राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिस्कटली आहे, असा सूर मुंबईत मनसेच्या बैठकीत पाहायला मिळाला आहे. तर विधानसभा निवडणुकीत जे झालं ते विसरा असं राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हटलंय.

  • 07 Jan 2025 02:01 PM (IST)

    दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार,आयोगाची पत्रकार परिषद

    मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत दिल्ली निवडणूकांची कार्यक्रम घोषीत करणार आहेत,.

  • 07 Jan 2025 01:44 PM (IST)

    बच्चू कडू यांचे मेंढपाळाच्या वेशात आंदोलन

    अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर निवडणूकांनंतर बच्चू कडू यांनी मोर्चा काढला आहे. या आंदोलनात ते मेंढपाळाच्या वेशात येणार आहेत.

  • 07 Jan 2025 01:37 PM (IST)

    केजच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सराफ संघटनेची बैठक घेतली

    केजचे पीआय वैभव पाटल यांनी सराफा असोसिएशनची बैठक घेतली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या बैठकीत त्यांनी काही सूचना दिल्या आहेत.

  • 07 Jan 2025 12:57 PM (IST)

    नायडू हॉस्पिटलमध्ये 50 स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार

    हा व्हायरस नवीन असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. यासंदर्भात पुणे महापालिका सक्षम असून सर्व तयारी करण्यात आली आहे .नायडू हॉस्पिटलमध्ये 50 स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. महापालिकेअंतर्गत असणाऱ्या प्रत्येक क्षत्रिय कार्यालयाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विषाणूचा पुण्यात अद्यापही एकही रुग्ण आढळला नसून कुणाचेही नमुने घेण्यात आले नाहीत, अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ नीना बोराडे यांनी दिली.

  • 07 Jan 2025 12:50 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांना काही गोष्टी सांगायच्या आहेत- धनंजय देशमुख

    आज मुंबईत देशमुख कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. अहिल्यानगरहुन देशमुख कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज मुख्यमंत्री यांना काही गोष्टी बोलायच्या आहे, त्या मी नंतर सांगेल, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

  • 07 Jan 2025 12:40 PM (IST)

    लोकप्रतिनिधी विषयाला वळण देत आहेत

    संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला निश्चित न्याय मिळाला पाहिजे. परंतु या जिल्ह्यात काही तथाकथित लोकप्रतिनिधी विषयाला वळण देत आहेत. काही ठेकेदारांनी याची सुपारी घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याची सुपारी घेतली आहे. SIT CID चांगल तपास करीत आहे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे काही लोक चामकोगिरी करत आहे, असा आरोप बाबुराव पोटभरे यांनी केला आहे.

  • 07 Jan 2025 12:30 PM (IST)

    धनंजय देशमुख यांनी घेतली याचिका मागे

    संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात योग्य तपासाचे निर्देश द्यावेत अशी विनंती करणारी याचिका त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आता ही याचिका त्यांनी मागे घेतली आहे.

  • 07 Jan 2025 12:20 PM (IST)

    नैतिकतेनं राजीनाम्याचा निर्णय घ्यावा

    मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेनं राजीनाम्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

  • 07 Jan 2025 12:10 PM (IST)

    योग्य वेळी प्रत्युत्तर देणार

    मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे हजर झाले आहेत. मी काहीही राजीनामा दिला नाही, असे ते म्हणाले. तर योग्यवेळी सुरेश धस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार असल्याचे ते म्हणाले.

  • 07 Jan 2025 12:00 PM (IST)

    सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त

    राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाल्यानंतर सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सलमान खानच्या घराच्या बाल्कनीमध्ये बुलेट प्रूफ काच लावण्यात येत आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सीमा भिंतीवर काटेरी तार टाकण्यात येत आहे.

  • 07 Jan 2025 11:52 AM (IST)

    कोल्हापूर- ब्रेकडाऊन झालेल्या एसटीमधील प्रवाशी दुसऱ्या एसटीमध्ये घेण्यावरून कंडक्टरची हाणामारी

    कोल्हापूर- ब्रेकडाऊन झालेल्या एसटीमधील प्रवाशी दुसऱ्या एसटीमध्ये घेण्यावरून कंडक्टरने हाणामारी केली. भोगावती बस स्टँड परिसरातील ही घटना आहे. विनंती करायला गेलेल्या कंडक्टरला दुसऱ्या बसच्या कंडक्टरने बेदम मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 07 Jan 2025 11:41 AM (IST)

    मी राजीनामा दिलेला नाही- धनंजय मुंडे

    धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत. मी राजीनामा दिलेला नाही, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. थोड्याच वेळात मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होणार आहे.

  • 07 Jan 2025 11:33 AM (IST)

    HMPV व्हायरस 2001 पासून, घाबरण्याची आवश्यकता नाही- नागपूरचे जिल्हाधिकारी

    “कोरोना व्हायरस नवीन होता. हा HMPV व्हायरस 2001 पासून आहे. नेदरलँडमध्ये हा व्हायरस आढळून आलेला. मुलांमध्ये तापासारखी लक्षण दिसतात. हा जुनाच व्हायरस आहे. रिसर्च केला तर तुमच्या लक्षात येईल. सध्या घाबरण्याची आवश्यकता नाही. सरकारच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याचं पालन केलं, तर अजून फायदा होईल” असं नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणाले.

  • 07 Jan 2025 11:22 AM (IST)

    मुंबईतील दादर स्थानकावरील धक्कादायक घटना 

    मुंबईतील दादर स्थानकावरील धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माथेफिरूने १९ वर्षीय तरुणीचे केस कापले. दादर पोलीस ठाण्यात तरुणीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

  • 07 Jan 2025 11:11 AM (IST)

    कोल्हापूर शहरासह उपनगराला टँकरने पाणीपुरवठा

    कोल्हापूर शहरासह उपनगराला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतोय. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पुईखडी आणि काळमवाडी योजनेच्या जल वाहिन्यांच्या दुरुस्ती कामामुळे शहरात पाणी टंचाईचं संकट ओढावलं आहे. जलवाहिन्या दुरुस्ती काळातील पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेकडून 18 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरद्वारे आलेलं पाणी भरण्यासाठी महिलांसह लहान मुलांची धडपड चालू आहे. कोल्हापूरकरांना आणखी दोन दिवस पाणीटंचाईची झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे.

  • 07 Jan 2025 10:53 AM (IST)

    एमआरए मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगडियावर गोळीबार करणारे दोघे अटकेत

    एमआरए मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगडियावर गोळीबार करणारे दोघेजण अटकेत मात्र तीन आरोपींचा अद्याप शोध सुरू.

    अंगडियावर गोळीबार करून सोन्याचा मुद्देमाल आरोपीनी पळवला होता. एमआरए मार्ग पोलिसानी एका आरोपीला तर गुन्हे शाखेने दुसऱ्या आरोपीला अटक केली . चोरी झालेला ९० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

  • 07 Jan 2025 10:41 AM (IST)

    अमरावतीत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज वाडा आंदोलन, पोलीस बंदोबस्त तैनात

    अमरावतीत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज वाडा आंदोलन आहे. या आंदोलनात बकरी, मेंढ्या विभागीय आयुक्त कार्यालयावर नेणार होते मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी जनावरे ताब्यात घेतली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात ठिकठिकाणी जवळपास 300 पोलिसांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.   बच्चू कडू यांचे विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकार विरोधात पहिलंचं आंदोलन आहे.

  • 07 Jan 2025 10:13 AM (IST)

    बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे – संजय राऊत यांची मागणी

    बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे. बीडमधील एसआयटीतील अधिकाऱ्यांची चौकशी करा . देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडबाहेर चालवा – संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे.

  • 07 Jan 2025 10:12 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे ची पक्षबांधणी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीसाठी मनसेच्या सर्व मुबईतील विभागअध्यक्षांना उपस्थित राहण्याचे आदेश.

  • 07 Jan 2025 10:03 AM (IST)

    संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

    संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी भाजप आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेतला आहे. – संतोष देशमुख हत्येचा तपास व इतर बाबींच्या संदर्भात देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडणार आहेत.

  • 07 Jan 2025 09:55 AM (IST)

    सांगलीत घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

    सांगली – सांगलीत घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चार लाख 64 हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीकडून 4 गुन्हे उघडकीस आले आहेत

  • 07 Jan 2025 09:47 AM (IST)

    बीड जिल्ह्यातील पालकमंत्री नको, मराठा बांधवाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

    धाराशिव- बीड जिल्ह्यातील मंत्री धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री नको म्हणत धाराशिव जिल्ह्यातील मराठा बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलय. मंत्री धनंजय मुंडे यांना धाराशिवचे पालकमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करू नये, संतोष देशमुख यांची हत्या करणारे आरोपी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींना धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री करू नये त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशा मागण्याचे निवेदन मराठा बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे.

  • 07 Jan 2025 09:35 AM (IST)

    भाजप नेते सुधीर मुनंगटीवार अजित पवारांच्या भेटीला, कारण अद्याप गुलदस्त्यात

    महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • 07 Jan 2025 09:33 AM (IST)

    संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार

    बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. तसेच सुरेश धस यांनी अजित पवारांकडेही भेटीसाठी वेळ मागितली आहे. अजित पवारांना ग्राऊंड रिअॅलिटी सांगणार, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.

  • 07 Jan 2025 09:31 AM (IST)

    राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ई-कॅबिनेटची संकल्पना राबवण्यात येणार

    आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या बैठकीत ई-कॅबिनेटची संकल्पना राबवण्यात येणार आहे.

  • 07 Jan 2025 09:19 AM (IST)

    तारापूर MIDC मध्ये आयकर विभागाची छापेमारी, पोलीस बंदोबस्त तैनात

    बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीतील स्टील निर्मितीत नामांकित असलेल्या विराज प्रोफाइल या कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आज सकाळी पाच वाजल्यापासून आयकर विभागाची टीम विराज प्रोफाईल या जी टू प्लॉटनंबरवर दाखल झाली आहे. सध्या या कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे. कंपनीच्या गेट समोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आतापर्यंत या कंपनीत आयकर विभागाच्या किती तुकड्या दाखल झाल्या आहेत याची अद्याप अधिकृत माहिती नाही.

  • 07 Jan 2025 09:12 AM (IST)

    ठाण्यात परिवहन सेवेतील नियुक्त्यांचा मार्ग मोकळा, 91 पदं भरली जाणार

    ठाणे परिवहन सेवेला उभारी देण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परिवहन सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांची अनुकंपा तत्त्वावर नेमणूक केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार ९१ पदे भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    ठाणे पालिका परिवहन सेवेची परिस्थिती सुधारण्याबरोबरच ठाणेकर प्रवाशांना उत्तम व पर्यावरणाभिमुख सेवा देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. तर दुसरीकडे ठाणे परिवहन उपक्रमासाठी सद्यः स्थितीत शासन मंजूर पदांनुसार वर्ग तीन व चारमधील १, ३८१ पदे रिक्त आहेत.

  • 07 Jan 2025 08:59 AM (IST)

    नाशिकच्या निफाडमध्ये कडाक्याची थंडी

    निफाडमध्ये थंडीच्या हंगामात तिसऱ्यांदा किमान तापमानाचा पारा 10°c चा आत. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 9.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. थंडीचा कडाका कायम असल्याने या थंडीपासून उब मिळवण्यासाठी शेकोट्यांचा आधार.

  • 07 Jan 2025 08:58 AM (IST)

    आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

    आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकी संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • 07 Jan 2025 08:12 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेल्या थंडीचा दूध उत्पादनाला फटका

    थंडीमुळे जिल्ह्यातील दूध संघाचं दूध संकलन घटलं. कोल्हापूर जिल्ह्यात गारठा वाढला आहे. वाढलेल्या गारठ्याचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम.

  • 07 Jan 2025 08:06 AM (IST)

    Earthquake: दिल्ली-बिहार ते नेपाळ-तिबेटपर्यंत भूकंपाचे धक्के

    दिल्ली आणि NCR मध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारच्या पाटण्यासह अनेक जिल्ह्याने भूकंपाचे हादरे जाणवले. मंगळवारी सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी हे धक्के जाणवले. नेपाळ आणि तिबेटची भूमी सुद्धा भूकंपाने हादरली. 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता.

  • 07 Jan 2025 08:03 AM (IST)

    महाराष्ट्र केसरी गटासाठी या वर्षी प्रथमच थेट प्रवेश

    प्रतिष्ठेच्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील ‘महाराष्ट्र केसरी’ गटासाठी प्रथमच मल्लांना वाईल्ड कार्डद्वारे अर्थात थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा यंदा २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत अहिल्यानगर येथे रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाने या वर्षीपासून जिल्हाबंदी नियम लागू केला आहे. त्यामुळे कुठल्याही मल्लाला आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यातून खेळता येणार नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात काल दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी काल पक्षाध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटींमुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? ही चर्चा रंगली आहे. दरम्यान एचएमपीव्हीच्या खबरदारीसाठी नायडू रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलाय. महाराष्ट्रात व पुणे महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून पुणे महानगरपालिकेकडून नायडू सांसर्गिक रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.

Published On - Jan 07,2025 8:02 AM

Follow us
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.