Maharashtra Breaking News LIVE 22 September 2024 : अजित पवार यांच्या सभेनंतर शरद पवारांची चिपळूणमध्ये सभा

| Updated on: Sep 22, 2024 | 12:06 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 22 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 22 September 2024 : अजित पवार यांच्या सभेनंतर शरद पवारांची चिपळूणमध्ये सभा

LIVE NEWS & UPDATES

  • 22 Sep 2024 12:05 PM (IST)

    शरद पवार यांच्या सभेची तयारी

    अजित पवार यांच्या सभेनंतर शरद पवारांची सभा देखील चिपळूणमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. चिपळूणमधील सावरकर मैदानामध्ये ही सभा उद्या होणार होणार आहे. या सभेची जय्यत आणि भव्य तयारीला सुरुवात झाली आहे.

  • 22 Sep 2024 11:50 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात तारखांवर तारखा

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात तारखांवर तारखा देण्यात येत आहेत. येत्या मंगळवारी अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 313 क्रमांकवर आमदार अपात्रता प्रकरण असल्याने मंगळवारीही सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रकरण मेन्शन केल्यानंतर सुप्रीम कोर्टात तारीख देण्यात आली.

  • 22 Sep 2024 11:41 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर; भारतीय समुदायाशी साधणार संवाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून राष्ट्राध्यक्ष जो बाईडन आणि मोदी यांची आजच भेट होणार आहे. मोदींच्या दौऱ्यात भारतीय वस्तू परत मिळणार आहेत. अमेरिकेत तस्करीद्वारे गेलेल्या 297 भारतीय पुरातन वस्तू पुन्हा मिळणार आहेत. यापूर्वी 2021 साली 157 तर 2023 साली 105 भारतीय पुरातन वस्तू अमेरिकेने परत केल्या होत्या.

  • 22 Sep 2024 11:30 AM (IST)

    भारतात पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरे आक्रमक

    पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा बहुचर्चित पाकिस्तानी चित्रपट ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स (ट्विट) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये,’ असं त्यांनी म्हटलंय.

  • 22 Sep 2024 11:20 AM (IST)

    निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येणार

    नवी दिल्ली- निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येणार असून 26 सप्टेंबरपासून चार दिवसांचा दौरा असेल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह आयोगाची टीम विधानसभा निवडणुकीबाबत माहिती घेणार आहे. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चर्चा करणार आहेत.

  • 22 Sep 2024 11:10 AM (IST)

    महाराष्ट्रात जातीय दंगली व्हाव्यात असा कट यातून मला दिसतो- जयंत पाटील

    “भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे काही आमदार हे राज्यात धार्मिक वाद व्हावेत, टोकाचे भूमिका दोन्ही बाजूने घेतल्या जाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. भाजपच्या लक्षात आलंय आहे की यावेळी आपली खैर नाही. म्हणून कोणतेही मार्ग अवलंबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातला हा शेवटचा मार्ग आहे. महाराष्ट्रात जातीय दंगली व्हाव्यात असा कट यातून मला दिसतो आहे,” असं जयंत पाटील म्हणाले. धारावी प्रकरणी नितेश राणेंच्या वक्तव्यावर ते बोलत होते.

  • 22 Sep 2024 10:57 AM (IST)

    मोहोळ बंदची हाक

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोलापूरमधील मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे आज लाडकी बहीण योजने निमित्त ‘जन सन्मान यात्रा’ कार्यक्रमासाठी मोहोळला येत आहेत. मोहोळ बंदला मोहोळकरांचा सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद मिळत आहे. मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावे यासाठी मोहोळ बचाव संघर्ष समितीने दिलीय मोहोळ बंदची हाक देण्यात आलीय.

  • 22 Sep 2024 10:45 AM (IST)

    वर्षा निवासस्थानी कार्यक्रमाचं आयोजन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बौद्ध भंतेजींना चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीय समुदायासाठी महत्त्वाचा असून, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धर्म आणि समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.

  • 22 Sep 2024 10:30 AM (IST)

    सिनेट परिक्षेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

    मुंबई विद्यापीठाच्या सिनेट परिक्षेवर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. सिनेटचा मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही. मतदार विकत घेतला जात नाही तिथे शिंदे, फडणवीस अजितदादा निवडणुका घ्यायला घाबरतात. ते डरपोक सरकार आहे. मुख्यमंत्री डरपोक आहेत. पैशाची ताकद ही निवडणुकीची ताकद नाही. सिनेटची निवडणूक हरतोय याची खात्री पटल्यावर निवडणूक रद्द केली, असा आरोप राऊतांनी केला आहे.

  • 22 Sep 2024 10:15 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाचं आंदोलन

    छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने केंब्रिज चौकात रास्ता रोको करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाने रस्ता रोको केला आहे. सरकारने तात्काळ मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती आहे.जालना-संभाजीनगर महामार्ग अडवून आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. घोषणाबाजी करत आंदोलकांकडून सरकार विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

  • 22 Sep 2024 09:55 AM (IST)

    Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण… सुप्रीम कोर्टात तारखांवर तारखा… येत्या मंगळवारी अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी… 313 क्रमांक वर आमदार अपात्रता प्रकरण… मंगळवारीही सुनावणी होण्याची शक्यता कमी… अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रकरण मेन्शन केल्यानंतर सुप्रीम कोर्टात तारीख…

  • 22 Sep 2024 09:45 AM (IST)

    Maharashtra News: निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येणार

    निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येणार… 26 सप्टेंबर पासून चार दिवसांचा दौरा… मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह आयोगाची टीम विधानसभा निवडणुकीबाबत माहिती घेणार… राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चर्चा करणार…

  • 22 Sep 2024 09:35 AM (IST)

    Maharashtra News: अरविंद केजरीवाल यांची आज जनता की अदालत

    अरविंद केजरीवाल यांची आज जनता की अदालत… सकाळी 11 वाजता जंतर-मंतरवर जनता की अदालत चे आयोजन… मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच केजरीवाल संबोधन करणार… अरविंद केजरीवाल काय बोलणार याकडे संपूर्ण दिल्लीचे लक्ष…

  • 22 Sep 2024 09:16 AM (IST)

    Maharashtra News: सकल मराठा समाजाकडून आज परभणी बंदची हाक

    सकल मराठा समाजाकडून आज परभणी बंदची हाक… सकाळपासून व्यापाऱ्यांनी बंद ठेवली व्यापारी प्रतिष्ठान… बीड, जालना पाठोपाठ आज परभणीत असणार बंद…

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे, जालना, परभणी शहरांमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. मराठा आंदोलकांनी मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. तर पाच आंदोलक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहेत. तर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे. यासह, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडीही तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळणार आहेत.

Published On - Sep 22,2024 9:13 AM

Follow us
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?.
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने.
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके.
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली.
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.