Maharashtra Breaking News LIVE 28 September 2024 : आता सुट्टी नाही! निवडणूक आयोग प्रलोभणं देणाऱ्यांवर कारवाई करणार

| Updated on: Sep 28, 2024 | 4:27 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 28 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 28 September 2024 : आता सुट्टी नाही! निवडणूक आयोग प्रलोभणं देणाऱ्यांवर कारवाई करणार

LIVE NEWS & UPDATES

  • 28 Sep 2024 04:27 PM (IST)

    निवडणूक आयोग एक्शन मोडवर, मतदारांना प्रलोभणं देणाऱ्यांवर कारवाई करणार

    निवडणूक आयोग राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्शन मोडवर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौऱ्यानंतर विधानसभेची तयारीची माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने 11 पक्षांनी काही सूचना आणि विनंती केल्याचंही सांगितलं. निवडणुकीच्या तोंडावर अनेकदा मतदारांना भुलवण्यासाठी अनेक प्रलोभणं दिली जातात. अशी प्रलोभणं देणाऱ्यांबाबत निवडणूक आयोग अलर्ट मोडवर असणार आहे.

    “जिथे पैसे, दारू, गिफ्ट दिले जात असतील त्यावर कठोर कारवाई होणार. आम्ही या वाटपावर अधिक लक्ष देणार”, असं राजीव कुमार पत्रकार परिषदेत म्हणाले.

  • 28 Sep 2024 04:18 PM (IST)

    मुंबईतील या 3 मतदारसंघातील मतदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राजीव कुमार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 3 मतदार संघातील मतदारांना आवाहन केलं आहे. कुलाबा, कुर्ला आणि कल्याण या 3 विधानसभा मतदारसंघातील मतदारांना हक्क बजावण्याचं आवाहन केलंय. राजीव कुमार यांनी हे आवाहन करत असताना आकडेवारीसह या 3 ठिकाणी गेल्या वेळेस मतदानाचा टक्का कमी असल्याचं सांगितलं. तसेच राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीरसह तुलना करत मतदारांना मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी साद घातली.

    दोडा येथे 72, पुंछमध्ये 74, बस्तर येथे 60 आणि गडचिरोलीत ७३ टक्के मतदान होतं. मग कुलाबा, कल्याण आणि पुण्यातही एवढं मतदान होऊ शकतं, असं राजीव कुमार यांनी म्हटलं.

    मतदारसंघ आणि तिथेली मतांची टक्केवारी

    • कुलाबा – 40 टक्के
    • कल्याण – 44 टक्के
    • कुर्ला – 41 टक्के
  • 28 Sep 2024 04:10 PM (IST)

    केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज, अशी आहे तयारी

    केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात 11 राजकीय पक्षांची भेट घेतली. राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला काही विनंती केली. तसेच काही गोष्टी निदर्शनात आणून दिल्या.त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या दौऱ्यात काय काय केलं? तसेच विधानसभा निवडणुकीबाबत काय तयारी आहे? याबाबत आयोगाचे अधिकारी राजीव कुमार यांनी माहिती दिली आहे. आपण सर्व बाबी मुद्द्यांद्वारे जाणून घेऊयात.

    • महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 59 लाख मतदार
    • पहिल्यांदाच 19 लाख 48 हजार मतदार पहिल्यांदा हक्क बजावणार
    • राज्यात 1 लाख 186 पोलिंग स्टेशन
    • 9 लाख नवीन महिला मतदार
    • शहरी विभागात 100 टक्के बुथवर सीसीटीव्ही लावण्यात
    • ग्रामीण भागात 50 टक्के बुथवर सीसीटीव्हीची नजर असणार
    • 350 मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी तरुणांवर (कर्माचारी वर्ग)
  • 28 Sep 2024 04:03 PM (IST)

    मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्याची मागणी

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र दौरा केल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या राजीव कुमार यांनी एकूण 11 पक्षांची भेट घेतल्याचं म्हटलं. त्यापैकी काही पक्षांनी काही सूचना-विनंती केल्याचं सांगितलं. नक्की काय विनंती करण्यात आली आहे, हे आपण जाणून घेऊयात.

    राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला या मुद्द्यांबाबत विनंती

    • पैशाची ताकद रोखण्याची विनंती
    •  पोलिंग स्टेशन दूर असल्याने वृद्धांना येण्याजाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी
    • पोलिंग एजंट त्याच मतदारसंघाचा असावा, अशी काही पक्षांची विनंती
    • मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्याची पक्षाची मागणी
    • फेक न्यूज रोखण्याची मागणी
  • 28 Sep 2024 03:56 PM (IST)

    केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा

    “आम्ही गेल्या 2 दिवसात एकूण 11 राजकीय पक्षांची भेट घेतली.  या भेटीत पक्षांकडून अनेक सूचना करण्यात आल्या. सर्व सण-उत्सव पाहूनच निवडणुकीच्या तारखा जाहीर कराव्यात”, अशी विनंती राजकीय पक्षांनी केल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 2 दिवस महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी या दौऱ्याबाबत पत्रकार परिषदेत आणि विधानसभा निवडणुकीबाबत संवाद साधत आहेत.

  • 28 Sep 2024 03:31 PM (IST)

    रासपची महायुतीकडे 35 ते 40 जागांची मागणी

    नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. रासप नेते महादेव जानकर यांनी महायुतीला इशारा दिला आहे.सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास 288 जागांवर लढणार असल्याचं जानकर यांनी म्हटलंय. रासपची महायुतीकडे 35 ते 40 जागांची मागणी आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यातच अजून जागा वाटप होत नसल्यानं आमच्याशी चर्चेचा विषय नाही, असा टोलाही जानकरांनी लगावला.

  • 28 Sep 2024 02:34 PM (IST)

    भास्कर जाधव अनेक पक्षातून फिरून आताच स्थिरावले आहेत- सुधीर मुनगंटीवार

    त्यांच्याविषयी मी बोलणार नाही, विधानसभेत योग्य उत्तर देईन. आपल्यावर भास्कर जाधव यांनी केलेल्या टिकेसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

  • 28 Sep 2024 02:29 PM (IST)

    मुंबईतील धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवली

    मुंबईत दहशतवादी धोक्याचा इशारा दिल्यानंतर गर्दीच्या आणि धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मॉक ड्रीलच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे, असे सदा सरवणकर यांनी म्हटले.

  • 28 Sep 2024 02:25 PM (IST)

    पुणे शहरातील ३ विधानसभा शिंदे गटाला मिळव्यात अशी मोठी मागणी करण्यात आलीये

    शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी. २०१९ ला विधानभेला एकही जागा ही पुणे शहरात मिळाली नव्हती. आता ३ जागा मिळाल्या पाहिजेत शिवसेना वाढली पाहिजे

  • 28 Sep 2024 02:13 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांचे अत्यंत मोठे भाष्य

    निवडणूक आयोगाकडे एकच विनंती आहे की त्यांनी भाजप कार्यालयाकडून निवडणुका घेण्याची परवानगी घ्यावी, आदित्य ठाकरे

  • 28 Sep 2024 02:05 PM (IST)

    विजयी उमेदवारांचे आदित्य ठाकरेकडून काैतुक

    सिनेट निवडणूकीनंतर विजयी उमेदवारांचे आदित्य ठाकरेकडून काैतुक करण्यात आले आहे.

  • 28 Sep 2024 01:49 PM (IST)

    पुण्यातील प्रतिष्ठित कॉलेजमधील अल्पवयीन तरुणीवरील अत्याचाराची सीआयडी चौकशी करावी – सचिन खरात

    पुण्यातील प्रतिष्ठित कॉलेजमधील अल्पवयीन तरुणीवरील अत्याचाराची सीआयडी चौकशी करावी.   ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात  यांनी केली आहे.

  • 28 Sep 2024 01:35 PM (IST)

    राज्यात सोमवारपासून हर घर दुर्गा अभियानाची होणार सुरुवात

    राज्यात सोमवारपासून हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात होणार असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते शुभारंभ होईल. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली.

    मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे या अभियानाच्या शुभारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.

    आयटीआय प्रशिक्षणार्थींसोबत सर्वसामान्य युवती व महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी मंत्री लोढा यांचा नवा उपक्रम.

  • 28 Sep 2024 01:31 PM (IST)

    भाजप सदस्यता नोंदणीत महाराष्ट्र पिछाडीवर, केंद्रीय नेतृत्व नाराज

    भाजप सदस्यता नोंदणीत महाराष्ट्र पिछाडीवर असल्याने केंद्रीय नेतृत्वने नाराजी व्यक्त केली. 3 सप्टेंबर पासून देशभरात भाजपची सदस्य नोंदणी सुरू असून महाराष्ट्रसह राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, राज्यात सदस्य नोंदणी बाबत सुमार कामगिरी असल्याचे दिसून आले.  महाराष्ट्रात आतापर्यंत 83 लाख सदस्य , मात्र 1 कोटी नोंदणी करणे पक्षाच टार्गेट होतं.

    उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश या राज्यात मात्र सदस्य नोंदणी जोरात सुरू आहे.

  • 28 Sep 2024 01:25 PM (IST)

    भाजप मित्रपक्षांना स्थान देतं हे स्पष्ट झालंय – महायुतीतल्या नेत्याचा दावा

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच महायुती मध्ये महत्त्व कमी झालं आहे अशा बातम्या सातत्यानं येत आहेत ह्या खोट्या बातम्या आहेत. कारण राष्ट्रवादीला वेगवेगळ्या राज्यांतील आणि केंद्रातील कमिट्यांवर नियुक्त्या केलं जात आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले.

    288 जागांवर महायुती म्हणून लढायच हेच आमचं ठरलं आहे. एकदा निवडणुका पार पडल्या की मग पुढे निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी पेक्षा आमची महायुतीची चर्चा पुढं गेली आहे.

  • 28 Sep 2024 01:07 PM (IST)

    एकनाथ शिंदे हायलाईट झाले की यांच्या पोटात गोळा का उठतो ? संजय शिरसाट

    एकनाथ शिंदे हायलाईट झाले की यांच्या पोटात गोळा का उठतो ? संजय शिरसाट यांचा राऊतांना सवाल.

  • 28 Sep 2024 12:59 PM (IST)

    गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे यांची सडकून टीका

    गिरीश महाजन हा माणूस नुसतं बडबड करणं आणि खोटं करणं देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रछाया खाली राहून मोठा झालेला गिरीश महाजन माणूस आहे. स्वतःचं कर्तृत्व गिरीश महाजनांचे शून्य आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

  • 28 Sep 2024 12:54 PM (IST)

    अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

    कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा पडला आहे. पुराणात काळात भटाळे तलावात भराव टाकून उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा पडला आहे. मोठ्या संख्येने पालिका व पोलीस कर्मचारी बंदोबस्तात कारवाई सुरू आहे.

  • 28 Sep 2024 12:41 PM (IST)

    पूर्व विदर्भात ठाकरे गटाचा दावा काय

    26 नोव्हेंबर 2023 रोजी संपर्क नेता म्हणून निवड झाल्यावर, जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न होता. रामटेकची लोकसभेची जागा उदार अंतकरणाने सोडली, काँग्रेसचे 14 आमदार निवडून आले ते सोडून युतीत असतात 28 जागा लढल्या आहे, नैसर्गिक दृष्ट्या 8 ते 10 मतदारसंघ आम्हाला परत मिळावे अशी मागणी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली.

  • 28 Sep 2024 12:40 PM (IST)

    शरद पवार यांचे ठिकठिकाणी स्वागत

    शरद पवार हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. श्रीगोंदा – कर्जात रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करीत स्वागत होत आहे अनेक नागरिक स्वागतासाठी रस्त्यावर उतरले.आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी दौरा महत्वाचा मानल्या जात आहे.

  • 28 Sep 2024 12:30 PM (IST)

    कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाची युद्धपातळीवर तयारी

    कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली जात आहे. गाभाऱ्याची स्वच्छता होत असल्याने आज अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन सायंकाळी ६ वाजे पर्यंत बंद राहणार आहे.

  • 28 Sep 2024 12:20 PM (IST)

    ते पट्टे ओढलेले वाघ, खरा वाघ मातोश्रीवर -अंबादास दानवे

    या देशात कुणी आवाज उठवला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी उठवला.आदित्य ठाकरे यांनी मनसे, भाजपला हरवले, भाजप, शिंदे आणि मनसे असताना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांचा पराभव केला. हे म्हणतात आम्ही वाघ आहोत ,तुम्ही फक्त पट्टे ओढून वाघ होत नाही. वाघ मातोश्रीवर बसला आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

  • 28 Sep 2024 12:10 PM (IST)

    पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदार संघावर मनसेची फिल्डिंग

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अमरावती दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. राज ठाकरे यांची पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 6 जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख, शहर प्रमुखां सोबत बैठक सुरू आहे. पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदार संघाचा राज ठाकरे कडून आढावा घेण्यात येत आहे.

  • 28 Sep 2024 12:00 PM (IST)

    प्रणिती शिंदे यांचा केंद्र सरकारवर निशाणा

    वन नेशन वन इलेक्शन यासाठी आणले जाते कारण पाच वर्षातून एकदाच लोकांसमोर त्यांना यायचं आहे. त्यामुळे ही पद्धत आणली जात आहे का असे वाटते, असा टोला काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी लगावला.

  • 28 Sep 2024 11:47 AM (IST)

    Maharashtra News: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काढायला पैसे नाहीत आणि हे लाडकी बहीण योजना आणतात – प्रणिती शिंदे

    सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काढायला पैसे नाहीत आणि हे लाडकी बहीण योजना आणतात… लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर आणली जाते… निवडणुका झाल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना आणणार… कोणीतरी म्हणाले की, महिला स्वतःच्या नवऱ्याकडून पैसे घेतले तरी त्याचे ऐकत नाही मग यांचे काय ऐकणार?… असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं आहे.

  • 28 Sep 2024 11:32 AM (IST)

    Maharashtra News: एका लेखकाला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं – वडेट्टीवार

    एका लेखकाला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं… ‘मुख्यमंत्री’ नाटकासाठी 3 रंगमंच असले पाहिजेत… विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर निशाणा…

  • 28 Sep 2024 11:25 AM (IST)

    Maharashtra News: नागपुरात शिवसेना ठाकरे गटाची पूर्व विदर्भाच्या जिल्हा निहाय बैठका

    नागपुरात शिवसेना ठाकरे गटाची पूर्व विदर्भाच्या जिल्हा निहाय बैठका… भास्कर जाधव घेत आहे बैठक… विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होत आहे बैठक… नागपूरच्या रवी भवनमध्ये बैठक सुरू… पूर्व विदर्भातील नागपूर , भंडारा , गोंदिया , गडचिरोली ,चंद्रपूर , वर्धा जिल्ह्याचे पदाधिकारी बैठकीला राहणार उपस्थित…

  • 28 Sep 2024 11:12 AM (IST)

    Maharashtra News: संसदीय समितीच्या अध्यक्ष पदावरून शरद पवार गटात नाराजी ?

    संसदीय समितीच्या अध्यक्ष पदावरून शरद पवार गटात नाराजी ? एकाही समितीच्या अध्यक्षपदी शरद पवार गटाच्या खासदाराची निवड नाही… आठ खासदारांपैकी कुणाचीही निवड न झाल्याने पवार गटात नाराजीचा सूर… सुनील तटकरे यांना पेट्रोलियम समितीचे अध्यक्ष पद.. सामाजिक न्याय, ग्रामविकास, संरक्षण या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार गट होता आग्रही…

  • 28 Sep 2024 10:57 AM (IST)

    शरद पवार नगर जिल्ह्यात

    शरद पवार यांचा अहमदनगर जिल्हा दौरा, शरद पवार श्रीगोंदा या गावात दाखल झालेत. श्रीगोंद्यामधील रयत शिक्षण संस्थेच्या नुतन इमारत उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभास उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या मंचावर सर्वच पक्षातील नेते उपस्थित आहेत. श्रीगोंद्यातील शरद पवार गटाकडून इच्छुकांसह महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते उपस्थित आहेत. माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, तर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र नागवडे एकाच मंचावर उपस्थित आहेत.

  • 28 Sep 2024 10:45 AM (IST)

    जम्मू काश्मीरनमध्ये दहशतवादी शिरले

    जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या काळातच पुन्हा दहशतवाद्यांचा शिरकाव झाला आहे. कुलगाम लष्कर आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. कुलगाम भागात 3 दहशतवादी लपल्याची माहिती आहे. लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला.

  • 28 Sep 2024 10:31 AM (IST)

    प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

    प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. वंचित आता आदिवासींसोबत जाणार आहे. यात ज्याला यायचं असेल त्यांना दरवाजे भाजपन सोडून सर्वांसाठी उघडे आहे. आम्ही कोणाकडे जाणार नाही. राजू शेट्टींसोबत बोलणं झालं होतं. त्यांना शहाणपण शिकवलं, आम्ही निवडून आले नाही तर मतदान आहे. ज्याचा बाजूने टाकले त्यांचे पारड जड होते. आमदार झालं तर रिलिव्हन्स राहणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

  • 28 Sep 2024 10:15 AM (IST)

    संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

    सिनेट निवडणुकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दोन वर्षे भाजपकडून निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला गेला. पण अखेर काल मुंबई विद्यापीठावर भगवा फडकला, असं संजय राऊत म्हणालेत.

  • 28 Sep 2024 09:58 AM (IST)

    महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार नाही – विजय वडेट्टीवार

    ‘दिल्लीची पूर्ण फौज आली तरी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार नाही’ असं राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. युवकांमध्ये संभ्रम होता, युवक महाविकास आघाडी बरोबर आहे असं सिनेट निवडणुकीवर वडेट्टीवार म्हणाले.

  • 28 Sep 2024 09:52 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका

    मोहोळ तालुक्यातील बीबीदारफळमध्ये कांदा पिकात शिरलं पाणी. ऐन काढणीला आलेलं पिक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे झाले मोठे आर्थिक नुकसान. संपूर्ण शेतात चिखल झाल्याने कांदा काढणीला निर्माण होतायत अडचणी. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकरी करतायत.

  • 28 Sep 2024 09:41 AM (IST)

    धारावीची जागा काँग्रेसने शिवसेनेला द्यावी

    वर्षा गायकवाड यांच्यासाठी शिवसेनेनं इमाने इतबारे काम केलय. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळायला हवी. मी स्वतः बाबूराव माने धारावी विधानसभेतून निवडणुक लढवण्यास इच्छुक आहे. वर्षा गायकवाड ह्या तिथे त्यांच्या बहिणीला तिकीट देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमचा त्याला विरोध आहे असं बाबूराव मानेंनी म्हटलय.

  • 28 Sep 2024 09:37 AM (IST)

    अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    अमरावतीच्या दर्यापूर येथे दामिनी रेस्टॉरंट अँड बारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या हॉटेलमधील धक्कादायक घटना. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणलं. त्यानंतर हॉटेलमध्ये अत्याचार. 25 वर्षीय आरोपी रोशन पळसपगार याला पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक.

“पद्माकर वळवी यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांच शिक्षण किती? असा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकार जितके तेवढेच त्यांनी वापरावे. शिंदे समिती ही घटनाबाह्य तयार केलेली समिती आहे. शिंदे समितीला घटनात्मक कुठलाही अधिकार नाही” अशी टीका भाजपा नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. ऑनलाइन पद्धतीने भरता येणार विद्यार्थ्यांना अर्ज. 1 ते 30 ऑक्टोबर पर्यत नियमित शुल्कासह विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहेत.

Published On - Sep 28,2024 9:35 AM

Follow us
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?.
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?.
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्...
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्....
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं.