Maharashtra Political News LIVE : “चिता भी दो कदम पीछे आता है”, राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राजू पाटील यांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Political News LIVE in Marathi: आज 10 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा काल दादरच्या शिवाजी पार्क मैदानात संपन्न झाला. यावेळी भव्य सभा पार पडली. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. जागांच्या वाटाघाटीमध्ये आपल्याला रस नसल्याचही त्यांनी जाहीर केलं. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यासह अनेक भागांना पुन्हा गारपीटीसह वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे संत्रा,कांदा, गहू पिकासह अन्य पिकांचे मोठं नुकसान झालय. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातल्या गजानन नगरमधील रहिवासी असलेले गौरव कुलकर्णी यांच्या राहत्या घराला सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. यावेळी घरात कोणीच नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक दत्ता सुसर यांनी लगेचच अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाला घराला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवता आले असून घरातील साहित्य मात्र आगीत जळून खाक झालं आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे समजते. आग लागल्यावर नागरिकांनी सुद्धा आग विझविण्याचा प्रयत्न केलाय.
-
नरेंद्र मोदी रामटेकच्या सभास्थळी दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक येथे सभास्थळी दाखल झाले आहेत. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी त्यांची आज रामटेकमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे.
-
-
राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसेच्या एकमेव आमदाराची पोस्ट व्हायरल
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर सभेत महायुतीला लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर सोशलवॉर सुरू आहे. आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
राजू पाटील यांची फेसबूक पोस्ट
-
“काँग्रेस कार्यकर्त्यांची देखील भावना जाणून घेऊन पुढील भूमिका घेतली जाईल”
सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती जाणून घेऊन महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा. येत्या काही दिवसात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बरोबर बैठक घेणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांची देखील भावना जाणून घेऊन पुढील भूमिका घेतली जाईल, अशी भूमिका आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हा काँग्रेसने जाहीर केली.
-
पुण्यात उद्या शिवसेनेचा मेळावा
पुण्यात उद्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ३ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार मेळावा.
-
-
एनआयएकडून छत्रपती संभाजीनगरातील तीन तरुणांची चौकशी
बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन मुख्य संशयितांच्या संपर्कात शहरातील तीन तरुण असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एनआयए व दिल्ली पोलिसांचे पथकाने हर्सूल परिसरातील तीन तरुणांची कसून चौकशी केली. त्यात त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन लॅपटॉप, मोबाईलसह ते वापरत असलेले अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ते संशयितांच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. जवळपास ८ तास चौकशीनंतर नोटीस बजावून पथक रवाना झाले.
-
गौतम नवलखा यांना सर्वोच्च झटका
भीमा कोरेगाव प्रकरणातील गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला. नवलखा घरातच नजरकैद आहेत. त्यांच्या सुरक्षेपोटी त्यांनी 1.6 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे जमा करण्याचे निर्देश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्या. एस. व्ही. एन. भट्टी यांच्या खंडपीठाने दिले.
-
मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का
माझ्या निवडणुकीत कधी भावंडे फिरले नाहीत. पण आता गरागरा फिरत आहेत. पावसाळ्यात छत्री उगतात, तशी ही उगवली आहेत. मी फार तोलून मापून बोलतोय, एकदा मी जर तोंड उघडले तर कित्येक लोकांना फिरता येणार नाही. तोंड दाखवता येणार नाही. कुणी पाणी देणार नाही. मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का? अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी इशारा दिला.
-
धमकीप्रकरणात एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
महायुतीचे उमेदवार सुजय विखे धमकी प्रकरणी एका जणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पारनेर तालुक्यातील कळस या गावात दोन कार्यकर्त्यांची संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. सुजय विखे यांना शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी निवृत्ती उर्फ नाना घाडगे या कार्यकर्त्याला पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
-
सोलापूरात एमआयएम पदाधिकारी नाराज
सोलापुरात एमआयएम पक्षातर्फे उमेदवार जाहीर करणार असल्याने पक्षातील पदाधिकारी नाराज झाले आहेत. एमआयएमने सोलापूरमध्ये उमेदवार दिल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
-
विजयाची तुतारी फुंकणार
माझ्या समोर कोण उमेदवार असेल मी नवा असेल पण पण माझ्या पाठीशी शरदचंद्रजी पवार यांची ताकद आहे त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात इतिहास घडणारा विजयाची तुतारी वाजेल असा विश्वास श्रीराम पाटील यांनी व्यक्त केला आहे.
-
बंगळुरू स्फोटात क्रिप्टोकरन्सी वापराचा संशय, एनआयएकडून तीन तरुणांची चौकशी
बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन मुख्य संशयितांच्या संपर्कात शहरातील तीन तरुण असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एनआयए व दिल्ली पोलिसांच्या पथकाने हर्सूल परिसरातील तीन तरुणांची कसून चौकशी केली. त्यात त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन लॅपटॉप, मोबाईलसह ते वापरत असलेले अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले.
क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ते संशयितांच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. १ मार्च रोजी बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट होऊन ११ जण गंभीर जखमी झाले होते. आयईडी टायमर वापरून हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता.
-
अहमदनगर – महायुतीचे उमेदवार सुजय विखे धमकी प्रकरणी एकाला चौकशीसाठी पोलिसांनी घेतलं ताब्यात
अहमदनगर – महायुतीचे उमेदवार सुजय विखे धमकी प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
पारनेर तालुक्यातील कळस या गावात दोन कार्यकर्त्यांची संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये सुजय विखे यांना शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची दिली होती धमकी. याप्रकरणी नाना घाडगे या कार्यकर्त्याला पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात.
-
अरविंद केजरीवाल प्रकरणी तत्काळ सुनावणी घेण्याची वकीलांची विनंती
अरविंद केजरीवाल प्रकरणी तत्काळ सुनावणी घेण्याची त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी विनंती केली आहे. याप्रकरणी मेल केल्याचे नमूद करत तत्काळ सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती सिंघवी यांनी कोर्टाकडे केली आहे.
-
महाविकास आघाडीच्या वाटपावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज
महाविकास आघाडीच्या वाटपावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या नाराज होत्या. त्यांनी ती नाराजी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा मांडली होती. आज दुपारी २ वाजता मुंबई काँग्रेस ची बैठक मुंबईच्या काँग्रेस च्या कार्यालयात बोलावण्यात आली आहे.
या बैठकीत मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष आहे.
-
महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या नाराज काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
सांगली – महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या नाराज काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. आज विश्वजीत कदम,विशाल पाटील विक्रम सावंत,जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील या प्रमुख नेत्यांची उपस्थित ही बैठक दुपारी पार पडणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाणार .
-
Live Update | मुंबईत आज सर्वत्र स्वामी समर्थांचा प्रकट दिन मोठ्या ऊत्साहात साजरा
मुंबईत आज सर्वत्र स्वामी समर्थांचा प्रकट दिन मोठ्या ऊत्साहात साजरा होत आहे. या दिवसाचे औचित्य साधून सकाळपासूनच दादरच्या स्वामी समर्थ मठात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय… सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय…
-
Live Update | देशाला माजी पंतप्रधान देणाऱ्या मतदारसंघाबाबत आज दिल्लीत निर्णय
देशाला माजी पंतप्रधान देणाऱ्या मतदारसंघाबाबत आज दिल्लीत निर्णय… रामटेकमधील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी… बर्वे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल… उद्यापासून सुप्रीम कोर्टाला सलग चार दिवस सुट्टी… आज याचिकेवर सुनावणी होणार का? संपूर्ण विदर्भाचे लक्ष…
-
Live Update | ‘नवनिर्माण’ सेनेचा नमो निर्माण पक्ष का झाला? – राज ठाकरे
राज ठाकरे यांना अचानक काय साक्षात्कार झालाय? राज ठाकरे यांना दिल्लीत कोणती फाईल दाखवण्यात आली? ‘नवनिर्माण’ सेनेचा नमो निर्माण पक्ष का झाला? राज ठाकरे यांनी अचानक यू-टर्न घेतला आहे, लोक समजून घेतील… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Live Update | ठाणे बेलापूर मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी
ठाणे बेलापूर मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी… ट्रक पलटी झाल्याने शेकडो वाहने अडकली… पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा… सकाळी साडे सहा वाजता ट्रक पलटी झाल्याने अजूनही वाहतूक कोंडी… सकाळी सकाळी वाहन चालक आणि चाकरमान्यांना नाहक त्रास
-
राज यांचे पंधरा दिवसांपूर्वीच ठरले- सुप्रिया सुळे
राज ठाकरे यांनी दहा ते पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीला भाजपच्या मोठ्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाले होती. आता त्यांची मते कोणाच्या पारड्यात पडतील हे काळच ठरवेल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
-
भाजपने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना डिवचले
भाजपाकडून केजरीवाल यांच्याबाबत आणखी एक पोस्टर जारी करण्यात आले आहे. पोस्टर बॉय ऑफ करप्शन अशा आशयाचं पोस्टर सोशल मीडियावर जारी केले आहे. केजरीवाल यांना अटक झाल्यापासून आतापर्यंत भाजपकडून तीन पोस्टर्स जारी केले आहे.
-
ठाकरे गटाची राज ठाकरे यांच्यावर टीका
ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंचं कसं आहे, उठ दुपारी आणि घे सुपारी यातला प्रकार आहे. जर त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असेल तर त्यांनी एक नाही अनेक पोळी भाजून घेण्यासाठी पाठिंबा दिला असेल, असे कोळी यांनी म्हटले आहे.
-
वीज दरवाढ मागे घ्या- रयत सेना
राज्यात एक एप्रिलपासून विजेच्या दरात वाढ झाली आहे. या वीज दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. ही वीजदर वाढ मागे घेण्याची मागणी रयत सेनेने केली आहे. आठ दिवसांत वीज दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा रयत सेनेने महावितरण कंपनीला दिलेला आहे.
-
Maharashtra News : मुक्ताईनगर जळगावला अवकाळी पावसाचा तडाखा
पुन्हा बसला मुक्ताईनगर, बोदवड भुसावळ, जामनेर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका. अवकाळीच्या तडाख्याने मका, ज्वारी, उन्हाळी कांदा, सूर्यफूल, अनेक पिकांचे नुकसान. पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला. सध्या लोकसभेच्या निवडणुका आहेत. मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, मदत करावी शेतकऱ्यांच्या व्यथा.
-
Maharashtra News : अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यासह अनेक भागांना पुन्हा गारपीटीसह वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाचा तडाखा. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे संत्रा,कांदा, गहू पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान. वादळी वाऱ्यामूळे चांदुर बाजार तालुक्यातील जमापूर आणि शिरजगाव बंड गावात घरांची मोठी पडझड. थुगाव व पिंपरीमध्ये गारपीट झाल्याने संत्रा, गहू, कांदा, पिकाचे नुकसान. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
-
National News : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. येत्या जून महिन्यापूर्वी केजरीवाल यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार. ईडीकडून आरोप पत्र दाखल करण्याची जोरदार तयारी, सूत्रांची माहिती. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आरोपींना अटक झाल्यानंतर ईडी कडून हालचालींना वेग.
-
Maharashtra News : भाजपाचा सातारा लोकसभा उमेदवार आज जाहीर होणार का?
भाजपाचा सातारा लोकसभा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता. भाजपाकडून आज नववी उमेदवारांची यादी जाहीर होणार. उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह महाराष्ट्रातील दहा उमेदवारांची नाव आज जाहीर होण्याची शक्यता. सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती.
-
एमआयएममध्ये राजीनामा सत्र
मागील निवडणुकीला प्रकाश आंबेडकर हे उमेदवार होते तरीही 1 लाख 70 हजार मते पडले होते. जर आता MIM स्वतंत्र लढणार असतील तर किती मते पडतील याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आम्ही आमचे राजीनामे दिले असून आगामी काळात आणखी राजीनामे देणार आहोत, असे एमआयएमचे कोमरु सय्यद यांनी सांगितले
Published On - Apr 10,2024 7:57 AM