मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली हायकोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या धायरी परिसरात सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. पुणे महापालिकेने 12 दिवसांत मिळकत करातून 114 कोटी रुपये जमवले आहेत. पुण्यात उपनगरांसह आता शहराच्या मध्यवर्ती भागातही कमाल तापमान 40 अंशांवर पोहचले आहे. छत्रपती संभाजी नगरातील सिद्धार्थ गार्डनमध्ये दहा बछड्यांना जन्म देणाऱ्या समृद्धी वाघिणीचा मृत्यू झाला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
वर्धा : वर्धा शहरासह जिल्ह्याच्या काही भागाला वादळाचा तडाखा बसला आहे. वर्धा शहरात मुख्य मार्गावर कडुलिंबाचं झाड कोसळलं आहे. सुदैवाने कुठली हानी नाही. सेलू, वर्धा तालुक्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्याने विद्युत पुरवठा खंडीत झालाय. काही गावात काही घरांच्या छतांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
माझ्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा आहे. माझं व्हीजन हे फक्त माझं नसुन देशवासियांचं आहे. देश चालवताना देशवासी हेच माझं लक्ष्य आहे. आम्ही कलम 370 रद्द करून दाखवलं- नरेंद्र मोदी
माझे सर्व निर्णय देशाच्या हितासाठीचे आहेत. गेल्या दोन वर्षापासून 2047 डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. 2047 मध्ये देशाला स्वातंत्र्य होऊन 100 वर्षे पूर्ण होतील. निवडणुकीमध्ये प्रत्येत मतदार महत्त्वाचा आहे. मी अधिक काळ मुख्यमंत्री होतो, प्राण जाये पर वचन न जाये हे माझं तत्त्व- नरेंद्र मोदी
काँग्रेसचं काम हे पाच ते सहा दशकांचं आहे. माझं काम हे 10 वर्षांचं आहे. त्यातही दोन वर्ष हे कोरोना संकटाचे आहेत. पण तरीही देशाचा सर्वांगीण विकास आम्ही वेगाने केला. काँग्रेसचे काम आणि आमच्या कामाची तुलना नागरिकांनी करावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत म्हणाले.
मंत्री उदय सामंत आणि हेमंत पाटील हे भावना गवळी यांच्या भेटीसाठी गवळींच्या कार्यालयात दाखल. उमेदवारी घोषित झाल्यानंतर हेमंत पाटील आणि गवळी यांची पहिलीच भेट. गवळींनी राजश्री पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे आभार मानण्यासाठी भेट असल्याची हेमंत पाटील यांच्याकडून माहिती तसेच प्रचारची पुढील रणनीती ठरवणार
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर आरोप केले.बिनबुडाचे आरोप करतांना तारतम्य बाळगायचे होते. दोन कागद घेऊन काहीही बोलता, असे संजय शिरसाठ यांनी म्हटले.
आज सकाळी संजय राऊतने पीएम फंडची चौकशी करण्याची मुक्ताफळे उधळली. ज्या पीएम फंडमुळे कोरोना काळात लोकांना खूप मदत झाली. उद्धव ठाकरेच्या पीएम फंडची चौकशी व्हावी, असे उद्धव ठाकरे म्हणतात, असे नितेश राणे यांनी म्हटले.
नागपूर- म्हाडाचा तिढा सोडवण्यासाठी रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजी बापू आणि उत्तम जाणकार हे चौघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत.
सलमान खानच्या घरावरच्या हल्ल्याचं नियोजन एक महिन्यापूर्वीच झाल्याचा संशय व्यक्त होतोय. अमेरिकेत या गोळीबाराचा कट रचला गेला. वेगवेगळ्या फोन नंबर्सवरून शूटर्सना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. रोहित गोदाराच्या इशाऱ्यावरच शूटर्स आणि बंदुका ठरवण्यात आल्या आहेत. सध्या पाच राज्यांची पोलीस दलं या प्रकरणाचा तपास करत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरयाणा आणि पंजाब पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अनमोल बिश्नोई याने फायरिंगची जबाबदारी रोहित गोदारा याच्याकडे सोपवली होती. गोदारा याच्याकडे 12 पेक्षाही जास्त प्रोफेशनल शूटर्स असल्याने त्याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. रोहित गोदारा अमेरिकेत असला तरी त्याचे देशातल्या अनेक राज्यांमध्ये प्रोफेशनल शूटर्स आहेत.
सर्वांत जास्त ओबीसी मंत्री मोदींच्या सरकारमध्ये आहेत. ओबीसींचं कल्याण केवळ भाजपने केलंय. काँग्रेसने ओबीसींचा व्होट बँकेसाठी वापर केला, असंदेखील फडणवीस म्हणाले.
गरीबांना मोफत वीज देण्याची व्यवस्था करणार. प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस देण्याचा निर्धार आहे. गरीब वर्गासाठी मोफन रेशनची गॅरंटी देणार आहोत. जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठा महासंघाकडून आज महायुतीला लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात पाठिंबा जाहीर होणार. मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप आणि महायुती मधील प्रमुख नेत्यांची दुपारी २ वाजता पत्रकार परिषद भाजपच्या प्रदेश कार्यालयात होणार आहे. या पत्रकार परिषदेत मराठा महासंघाकडून महायुतीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पाठिंबा जाहीर केला जाणार आहे.
दिल्लीच्या कथित दारू घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांना २३ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सीबीआयने के. कविता यांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर केले होते.
के कविता यांच्या इडी कोठडी संपल्यानंतर त्यांना ११ एप्रिलला सीबीआयने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना १५ एप्रिल पर्यंत के कविता यांना CBI कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यानंतर न्यायालयाने आज के कविता न्यायालयीन कोठडी सुनावली.
भाजपचा जाहीरनामा सर्व घटकांना समर्पित, मोदींच्या गॅरंटीच संकल्पपत्र हे देशाच्या विकासासाठी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सांगली – आज पार पाडणाऱ्या महाविकास आघाडी मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार . शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन. चंद्रावर पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आला मेळावा. राष्ट्रवादी शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विश्वजीत कदम यांना निमंत्रण.
मात्र या मेळाव्याला न जाण्याची भूमिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी केली जाहीर. विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने मेळाव्याला जाणार नसल्याचे आमदार विक्रम सावंत यांची माहिती.
मालेगाव मनमाड रोडवरील व-हाणे जवळ ट्रॅव्हलचा भीषण अपघात. ट्रॅव्हल बस पलटी 50 पेक्षा जास्त लोक जखमी. जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू आहेत.
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशीची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रधानमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ठाण्यातील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मदाय आयुक्तांकडे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार केली आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत गरजूंना रोख स्वरूपात मदत केली जाते त्याचबरोबर मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते. याचा खर्च कोट्यावधीमध्ये आहे. हा खर्च नेमका कोणत्या माध्यमातून येतो, यावर धर्मदाय आयुक्तांनी प्रकाश टाकायला हवा असे पत्र संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहल आहे.
भारतीय हवामान खात्याची आज पत्रकार परिषद. दुपारी अडीच वाजता होणार पत्रकार परिषद. मान्सूनच्या आगमनाची घोषणा आज केली जाणार. यंदा देशात पावसाच प्रमाण कसं असणार ?. बळीराजाला दिलासा मिळणार का ?. हवामान खात्याच्या पत्रकार परिषदेनंतर देशातल्या यंदाच्या मान्सूनची परिस्थिती स्पष्ट होणार.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा तिढा कायम आहे. आता उमेदवारी भरण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत. सुट्टयांमुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ चार दिवस. 12 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यत उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा कालावधी. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत तीन दिवस सुट्टी. महायुतीचा उमेदवार कोण? याबाबत अद्याप सस्पेंन्स कायम. उद्धव ठाकरे गटाकडून उद्या विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार.
लोकसभा निवडणुकीचं मतदान चार दिवसांवर असताना रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक विधानसभेतील काँग्रेस नेते गज्जू यादव यांनी पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे. सुनील केदार यांच्या एककल्ली आणि हटखोरीच्या राजकारणाला कंटाळून राजीनाम राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा आटलाय. त्यामुळे पाणीबाणीमुळे रत्नागिरी शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. तर शीळ धरणावर पाणी साठा कमी झाल्याने नगरपरिषद प्रशासनानं सुरक्षा रक्षक नेमलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने महायुतीचे आज कोल्हापूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन होणार होणार आहे.
छत्रपती संभाजी नगरातील सिद्धार्थ गार्डनमध्ये दहा बछड्यांना जन्म देणाऱ्या समृद्धी वाघिणीचा मृत्यू झाला.
शवविच्छेदन अहवालात वाघिणीचे हृदय निकामी झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण समोर आले. पंधराव्या वर्षी समृद्धी वाघिणीची किडनी देखील निकामी झाली होती.