Maharashtra Political News LIVE : अर्चना पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार, पक्षप्रवेशानंतर उमेदवारीही मिळणार, सूत्रांची माहिती

| Updated on: Apr 04, 2024 | 7:16 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi: आज 3 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News LIVE : अर्चना पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार, पक्षप्रवेशानंतर उमेदवारीही मिळणार, सूत्रांची माहिती

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाची आणखी एक यादी आज जाहीर होणार आहे. पाच जागांवर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. नागपुरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सियसवर गेल्याने नागपूरकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. नागपूर काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्या उमेदवारी अर्जापाठोपाठ जिल्हा परिषद सदस्यत्व ही करण्यात आले रद्द करण्यात होते. त्या प्रकरणात आज उच्च न्यायालयात निर्णय होणार आहे. मुंबईत बेस्टमध्ये गेल्या तीन महिन्यांत ४ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडून ४० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Apr 2024 06:52 PM (IST)

    बॉक्सर विजेंदर सिंगने काँग्रेस सोडून भाजपमध्ये केला प्रवेश

    लोकसभा निवडणुकीपूर्वी बॉक्सर विजेंदर सिंगने काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विजेंदर सिंग यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. विजेंदरने 2019 मध्ये दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

  • 03 Apr 2024 06:37 PM (IST)

    भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार!

    लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यात प्रसिद्ध होऊ शकतो. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी पक्ष हे पत्र जारी करू शकतो. भाजपच्या जाहीरनाम्याची थीम मोदींची हमी आणि विकसित भारत 2047 असेल. जाहीरनामा “GYAN” ज्ञानावर केंद्रित असेल. ज्ञान म्हणजे गरीब, तरुण, शेतकरी (शेतकरी) आणि नारी शक्ती (महिला).

  • 03 Apr 2024 06:25 PM (IST)

    लोकसभा निवडणुकीसाठी बसपाने तिसरी यादी केली जाहीर

    बीएसपीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 12 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये मथुरेतील उमेदवार बदलण्यात आला आहे. आता सुरेश सिंह येथून निवडणूक लढवणार आहेत. मायावतींनी सरवर मलिक यांना लखनौमधून भाजपचे उमेदवार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात तिकीट दिले आहे.

  • 03 Apr 2024 06:10 PM (IST)

    जालना लोकसभेत काँग्रेसने वंचितला पाठिंबा द्यावा, वंचितच उमेदवार प्रभाकर बकले यांचा काँग्रेसला सल्ला

    जालना लोकसभा मतदार संघात काँग्रेसची ताकत नाही आणि ते पाच वेळेस निवडणूक हरले आहेत, आमची लढाई भारतीय जनता पार्टी सोबत असल्याचा दावा जालना लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले यांनी केला आहे. तसेच काँग्रेसने मोठे मन करावे आणि सहाव्यानदा निवडणूक हरण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीला काँगसने पाठिंबा द्यावा असेल वंचितचे उमेदवार बकले यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे

  • 03 Apr 2024 05:42 PM (IST)

    अर्चना पाटील या भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी

    अर्चना राणाजगजीतसिंह पाटील ह्या 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई पक्ष कार्यालयात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्चना पाटील या भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. धाराशिव लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली आहे. अर्चना पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवार असतील अशी सूत्रांची माहिती आहे.

  • 03 Apr 2024 05:29 PM (IST)

    रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही उमेदवारी जाहीर नाही

    रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा अद्याप जाहीर व्हायची आहे. मात्र त्याआधीच उमेदवार कुणीही असला तरी तो मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

  • 03 Apr 2024 05:17 PM (IST)

    नांदेडमधून विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी

    प्रताप पाटील चिखलीकर गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

    महायुती प्रणित भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे उद्या 4 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,गिरीष महाजन ,अशोक चव्हाण आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

  • 03 Apr 2024 05:00 PM (IST)

    सत्ताधाऱ्यांना जाब विचारा – प्रणिती शिंदे

    सत्ताधारी आल्यानंतर तुम्ही रागाने बोलायला पाहिजे, मात्र आम्ही आल्यावर आमच्यावर राग करू नका अशी मागणी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांकडे केली आहे. सोलापूर लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे.

  • 03 Apr 2024 04:50 PM (IST)

    नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार

    गोदिंया जिल्ह्यातील आठ गावांमधील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्काराचे शस्त्र उपसले आहे. अनेक राजकीय पक्ष बहिष्कारच्या विरोधात आहेत. सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जर बळजबरीने मतदानापासून वंचित केल्यावर पोलीस कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

  • 03 Apr 2024 04:40 PM (IST)

    ‘उखाड के फेक देंगे’, बच्चू कडूंचा राणांवर हल्लाबोल

    भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्यानेआमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. अमरावती लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात आपल्या पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणत उतरवल आहे. त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराने आज अर्ज दाखल केला. यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भाषणातून राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.

  • 03 Apr 2024 04:33 PM (IST)

    रश्मी बर्वे जात प्रमाणपत्राप्रकरणी उद्या निकालाची शक्यता

    रश्मी बर्वे जात प्रमाणपत्रावर आज सुनावणी पूर्ण झाली.दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला. निकाल उद्या पर्यंत राखीव ठेवण्यात आला आहे. प्रकरणात उद्या निकाल येण्याची दाट शक्यता आहे.

  • 03 Apr 2024 04:20 PM (IST)

    संदीप शेळके पण लोकसभेच्या रिंगणात

    वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके हे पण लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी अपक्ष नामांकन अर्ज भरला आहे. अर्ज भरताना शेळके यांचे रॅली काढत मोठे शक्ती प्रदर्शन केले. विजय त्यांचाच असल्याचा दावा त्यांनी केला.

  • 03 Apr 2024 04:10 PM (IST)

    पवना धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

    पिंपरी-चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागविणाऱ्या पवना धरणात 44.72 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.तीव्र उन्हामुळे होणा-या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे.

  • 03 Apr 2024 04:01 PM (IST)

    प्रदूषण कमी करण्यासाठीची यंत्रणा शोभेची वस्तू

    स्मार्ट सिटी समजल्या जाणाऱ्या पिंपरी- चिंचवड शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा अद्याप सुरू झाली नाही. ती शोभेची वस्तू ठरली आहे. तीन महिने झाले तरी ही यंत्रणा एखाद्या खेळण्यासारखी चौका- चौकात उभी आहेत. निगरगट्ट पालिका अधिकारी हे यंत्र सुरू होईल एवढंच उत्तर देत आहेत.

  • 03 Apr 2024 03:44 PM (IST)

    कल्याणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल पेटणार – वैशाली दरेकर

    कल्याण : 100% यंदा कल्याण लोकसभेचे चित्र बदलणार. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल पेटणार आहे. कल्याण लोकसभेत ओरिजनल शिवसेनेचा विजय होणार आहे. असं ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी म्हटले आहे.

  • 03 Apr 2024 03:42 PM (IST)

    कुसुंबा मालेगाव मार्गावर लक्झरी पलटल्याने दोन जणांचा मृत्यू

    धुळे – धुळे जिल्ह्यातील कुसुंबा मालेगाव मार्गावर भीषण अपघात झाला आहे. खाजगी लक्झरी पलटल्याने दोन जणांचा मृत्यू तर 26 जण जखमी झाले आहेत. खंडेरावच्या बारी जवळ ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स उलटली. जखमींना तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • 03 Apr 2024 03:20 PM (IST)

    12 एप्रिलला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर महाराष्ट्र दौऱ्यावर

    मुंबई – 12 एप्रिलला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई, पुण्यात एस. जयशंकर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

  • 03 Apr 2024 03:15 PM (IST)

    बॉक्सर विजेंदर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

    नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला मोठा धक्का. बॉक्सर विजेंदर सिंह भाजपमध्ये. भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश. भारत जोडो यात्रेमध्ये विजेंदर सिंह होता राहुल गांधी यांच्यासोबत. काँग्रेस सोडून अखेर विजेंदर सिंह भाजपमध्ये दाखल.

  • 03 Apr 2024 03:12 PM (IST)

    महाराष्ट्रात रिपाईला सोबत न घेतल्याचा फटला माविआला बसेल – डॉ.राजेंद्र गवई

    अमरावती : अमरावती लोकसभा निवडणुकीत रिपाइं गवई गटाची एन्ट्री. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.राजेंद्र गवई यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ पक्ष आमच्याकडे. तो ताकदवाण बनवावा यासाठी लोकसभा रिंगणात. महाविकास आघाडीने अमरावतीची उमेदवारी दिली नाही त्यामुळे आमचा भ्रमनिरास झाल्याचं डॉ.राजेंद्र गवई यांनी म्हटले आहे.

  • 03 Apr 2024 03:02 PM (IST)

    काँग्रेस नेते संजय निरुपम उद्या मोठा निर्णय घेऊ शकतात

    संजय निरुपम उद्या मीडियासमोर आपली बाजू मांडणार आहेत. संजय निरुपम यांची भविष्यातील रणनीती काय असेल, ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार?. काँग्रेस सोडून शिवसेना की भाजपमध्ये प्रवेश करणार हे निरुपम उद्या स्पष्ट करू शकतात.

  • 03 Apr 2024 03:01 PM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्याची महत्वपूर्ण बैठक

    यवतमाळ- हॉटेल राधामंगल येथे यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्याची महत्व पूर्ण बैठक. बैठकीसाठी संजय राठोड, आमदार मदन येरावार, अशोक उईके यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेते राहणार उपस्थित.

  • 03 Apr 2024 02:54 PM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्याची महत्वपूर्ण बैठक

    यवतमाळच्या हॉटेल राधामंगलमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. बैठकीसाठी संजय राठोड, आमदार मदन येरावार उपस्थित.

  • 03 Apr 2024 02:49 PM (IST)

    पुन्हा पैशावाल्यांचा विजय होऊ देऊ नका- बच्चू कडू

    पुन्हा पैशावाल्यांचा विजय होऊ देऊ नका, असे बच्चू कडू यांनी सभेत म्हटले आहे.

  • 03 Apr 2024 02:17 PM (IST)

    आमदार बच्चू कडू यांची सभा सुरू

    आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारकडून दिनेश बुब यांची जनआंदोलन नामांकन यात्रा निमित्त जाहीर सभा सुरू. यावेळी आमदार बच्चू कडू कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांच्या नजरा आहे.

  • 03 Apr 2024 02:04 PM (IST)

    कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार जाहीर

    कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार जाहीर करण्यात आल्या आहेत. वैशाली दरेकर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर निवडणूक लढणार आहेत.

  • 03 Apr 2024 01:51 PM (IST)

    सिंधुदुर्ग : कुडाळ येथे भाजपाची संघटनात्मक आढावा बैठक सुरु

    भाजपाची कुडाळ येथे संघटनात्मक आढावा बैठक सुरू आहे. व्यासपीठावर नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार राजन तेली, रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने आणि अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत.

  • 03 Apr 2024 01:42 PM (IST)

    ठाकरे गटाकडून लोकसभेचे चार उमेदवार जाहीर

    ठाकरे गटाने लोकसभेसाठी चार उमेदवार जाहीर केले आहेत. जळगावातून उन्मेष पाटील यांच्याऐवजी त्यांचे समर्थक करण पवार, कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कामडी, हातकणंगलेतून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

  • 03 Apr 2024 01:36 PM (IST)

    जळगावातून करण पवार यांना ठाकरे गटाची उमेदवारी

    जळगावातून उन्मेष पाटील यांचे समर्थक करण पवार यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे.

  • 03 Apr 2024 01:33 PM (IST)

    मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत हंडोरे यांनी राज्यसभेची शपथ घेतली

    मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत हंडोरे यांनी राज्यसभेची शपथ घेतली आहे. एकूण 12 खासदारांनी यावेळी राज्यसभेसाठी शपथ घेतली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शपथ दिली.

  • 03 Apr 2024 12:50 PM (IST)

    खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा

    खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ई-मेलच्या माध्यमातून उन्मेष पाटील यांनी त्यांचा राजीनामा दिला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाने पत्र लिहून त्यावर खासदार उन्मेष पाटील यांनी राजीनामा दिला. ठाकरे गटात प्रवेश होण्यापूर्वीच खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांचा राजीनामा दिला आहे. मी माझ्या जळगाव लोकसभा सदस्यत्वाचा तात्काळ राजीनामा देत असून तो स्वीकार करावा, असं त्यांनी राजीनाम्यात म्हटलंय.

  • 03 Apr 2024 12:40 PM (IST)

    गोंदिया- नक्षलवादी आणि जवानांमधील चकमकीत लाखोंचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा

    गोंदिया- नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत लाखोंचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्याशेजारील मध्यप्रदेशातील बालाघाटमधील मंडला इथली घटना आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश मिळालं आहे.

  • 03 Apr 2024 12:30 PM (IST)

    केरळ- राहुल गांधी यांच्यविरोधात अखेर उमेदवार जाहीर

    केरळ- राहुल गांधी यांच्यविरोधात अखेर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. CPI कडून ॲनी राजा निवडणूक लढवणार असून त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वायनाडमधून राहुल गांधी यांच्यविरोधात ते निवडणूक लढवणार आहेत.

  • 03 Apr 2024 12:20 PM (IST)

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज, उद्या वाहतूक ब्लॉक

    एमएसआरडीसी हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत मुंबई आणि पुणे वाहिनीवर गॅन्ट्री बसविण्याचं काम करणार आहे. बुधवारी आणि गुरुवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत ही कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी या वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई आणि पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या, तसंच जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.

  • 03 Apr 2024 12:10 PM (IST)

    इस्रायलच्या हल्ल्यात मानवतावादी कार्यकर्ते ठार

    गाझापट्टीत ‘वर्ल्ड सेंट्रल किचन’ या मदतसंस्थेचे सहा आंतरराष्ट्रीय मानवतावादी कार्यकर्ते आणि त्यांचा पॅलेस्टिनी चालक इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाले. सोमवारी रात्री हा हल्ला झाला. त्यानंतर मदतकार्य तातडीने थांबवण्यात येत असल्याचं संस्थेनं जाहीर केलं.

  • 03 Apr 2024 11:56 AM (IST)

    Live Update | काँग्रेस नेते राहुल गांधी थोड्याच वेळात आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

    अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांचा वायनाडमध्ये रोड शो… राहुल गांधी पुन्हा एकदा वायनाड लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार… शक्ती प्रदर्शन करत दाखल करणार उमेदवारी अर्ज

  • 03 Apr 2024 11:44 AM (IST)

    Live Update | पवारांनी वर्ध्यातून पंजा गायब करुन दाखवला – देवेंद्र फडणवीस

    मोदींनी देशात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला… मोदींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा… लाट नाही आता मोदींची त्सुनामी येणार… पवारांनी वर्ध्यातून पंजा गायब करुन दाखवला… असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

  • 03 Apr 2024 11:40 AM (IST)

    Live Update | छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अग्नी तांडव, मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला आग

    छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अग्नी तांडव… मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला आग… आगीत जाळलेल्या वस्तूत शालेय साहित्य आणि स्टीलच्या भांड्यांचा समावेश… अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल… आग विझवण्याचे प्रयत्न सुरू.. आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट

  • 03 Apr 2024 11:30 AM (IST)

    Live Update | वंचित बहुजन आघाडी कडून पुणे लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे करणार प्रचाराला सुरुवात

    शहरात आजपासून वसंत मोरे प्रचाराला करणार सुरूवात… मार्केट यार्ड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत वसंत मोरे फोडणार प्रचाराचा नारळ… काल पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांना वंचित कडून उमेदवारी जाहीर… तर आज पासून वसंत मोरे प्रचाराचा नारळ फोडणार… शुक्रवारी वसंत मोरे करणार वंचितमध्ये पक्ष प्रवेश

  • 03 Apr 2024 11:18 AM (IST)

    Live Update | ईव्हीएम बाबत किती याचिका दाखल होत राहणार – सुप्रीम कोर्टाचा सवाल

    सुप्रीम कोर्टाचा सवाल ईव्हीएम विरोधातील याचीकेबाबत आज सुप्रीम कोर्टात होणार होती सुनावणी… 10 एप्रिलला होणार पुन्हा एकदा सुनावणी… ईव्हीएममध्ये मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटची रिसीट येते , पण याची पुष्टी होत नाही की त्याच मतदाराचं मत देण्यात आलय…

  • 03 Apr 2024 10:59 AM (IST)

    आज दुपारी १ वाजता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक होणार

    आज दुपारी १ वाजता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समितीची टिळक भवन येथे बैठक होणार आहे.  प्रचार समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल.  या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनिती आखण्यात येणार आहे.

  • 03 Apr 2024 10:48 AM (IST)

    सोलापूर – अक्कलकोट रोड येथील एमआयडीसीतील टेक्सटाईल कंपनीला भीषण आग

    सोलापुरातील अक्कलकोट रोड येथील एमआयडीसीतील टेक्सटाईल कंपनीला भीषण आग. टॉवेलचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला ही आगा लागली असून अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून  जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने कारखान्याला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • 03 Apr 2024 10:44 AM (IST)

    एमआयएमचा खासदार निवडून देण्याची चूक आता संभाजीनगरची जनता करणार नाही

    एमआयएमचा खासदार निवडून देण्याची चूक आता संभाजीनगरची जनता करणार नाही. इम्तियाज जलील यांनी फक्त विरोधक म्हणून काम केले.

    खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर दोन लाख मताने निवडून येतील, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केला विश्वास.

  • 03 Apr 2024 10:26 AM (IST)

    सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगली लोकसभेसाठी समन्वयक जाहीर

    सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगली लोकसभेसाठी समन्वयक जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सांगली लोकसभा निवडणूक समन्वयक पदी आदित्य शिरोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    सध्या आदित्य शिरोडकर हे ठाकरे गटात पुणे जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख म्हणून काम करत आहेत. आदित्य शिरोडकर यांनी मनसेतून ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला होता.

  • 03 Apr 2024 10:12 AM (IST)

    ऊबाठा आमदार वैभव नाईक यांचा किरण सामंतांना टोला तर नारायण राणे यांच्यावर टीका

    ऊबाठा आमदार वैभव नाईक यांचा किरण सामंतांना टोला तर नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे यांनी किरण सामंत यांची लायकी काढली , दम दिला हे कोकणातील जनतेनं पाहिलं आहे.

    दम देऊन नारायण राणे ऊमेदवारी मागे घेण्यास सांगू शकतात, पण दम देऊन मतदान करायला सांगू शकत नाही. त्यामुळे ७ मे ला जनता दाखवून देईल.  केंद्रीय मंत्री असताना कोकणात काय काम केलं याचा हिशोब जनता मागेल

  • 03 Apr 2024 09:57 AM (IST)

    जळगावच्या पाणीटंचाईच्या निवारणाचा आराखडा तयार

    जळगाव जिल्हा परिषदेचा संभाव्य 592 गावाचा 9 कोटी 90 लाख 74 हजार रुपयाचा टंचाई निवारणाचा आराखडा तयार आहे, जिल्ह्यात सद्य स्थितीत 42 गावांना 51 टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा, तर 59 गावांसाठी 65 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत उपलब्धतेची तपासणी करण्यासाठी दुष्काळ तपासणी समिती गठीत करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा प्रशासन पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सतर्क झालं आहे.

  • 03 Apr 2024 09:45 AM (IST)

    ‘त्या’ जागेवरून शिंदे गटात रस्सीखेच सुरूच

    यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या जागेचा अजूनही तिढा कायम आहे.  भावना गवळी आणि संजय राठोड यांनी काल  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आज 12 वाजता च्या बैठकीनंतर यावर निघेल तोडगा, अशी माहिती आहे.  भावना गवळी मुंबईत तळ ठोकून आहेत. तर संजय राठोड यवतमाळ परतले आहेत.

  • 03 Apr 2024 09:30 AM (IST)

    संजय सिंह यांना जामीन मंजूर

    आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय सिंह यांची आज सुटका होण्याची शक्यता आहे. संजय सिंह सध्या दिल्लीतल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयातून त्यांना तिहार जेलमध्ये आणलं जाणार आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करून संजय सिंह यांना बाहेर सोडण्याची शक्यता आहे.

  • 03 Apr 2024 09:15 AM (IST)

    अरविंद केजरीवाल यांच्या वजनात घट

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वजन घटले आहे.  गेल्या चार दिवसात साडेचार किलो वजन घटल्याची माहिती समोर आली आहे.  जेलमधील वैद्यकीय पथकाने वजन घटण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.  वेगाने वजन कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.

  • 03 Apr 2024 09:02 AM (IST)

    Maharashtra News : नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप

    मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची काँग्रेस उमेदवारावर टीका. काँग्रेस उमेदवार हा उपऱ्या टपऱ्या आहे. आमदार के सी पाडवी यांनी डॉ. गावीतांवर पलटवार केला. डॉ. गावित 1955 ला उमेदवार होते, त्यावेळेस देखील ते उपऱ्या टपऱ्या होते. प्रत्येक उमेदवार नवीन असतो. काँग्रेसने नवीन चेहरा दिला आहे, याचा अर्थ कोणीही काही बोलणार हे चालणार नाही.

  • 03 Apr 2024 08:44 AM (IST)

    Maharashtra News : त्रंबकेशवर मंदिरातील पिंडीचा वज्रलेप निखळला

    त्रंबकेशवर मंदिरातील पिंडीचा वज्रलेप निखळला. पुरातत्व विभागाने केलेला दावा ठरला फोल. यापूर्वी 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 दरम्यान झाला होता पिंडीवर वज्रलेप. किमान 100 वर्ष झीज होणार नाही, असा पुरातत्व विभागाने त्यावेळी केला होता दावा. मात्र अवघ्या 2 वर्षातच पींडीची झीज झाल्याने आश्चर्य. पिंडीची झीज झाल्याचं सेवेकऱ्याना सर्वप्रथम आलं लक्षात.

  • 03 Apr 2024 08:18 AM (IST)

    Maharashtra News : पिंपरी चिंचवडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील परवानाधारक शस्त्र असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याकडील शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे 1400 पेक्षा अधिक शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. त्यांच्याकडील शस्त्रे पोलिसांच्या शस्त्रागारात जमा करण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष सरसावले आहेत. निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निवडणूक सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन केले जात आहे.

  • 03 Apr 2024 08:16 AM (IST)

    Maharashtra News : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम

    यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. भावना गवळी, संजय राठोड यांनी काल घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. आज 12 वाजताच्या बैठकीनंतर यावर निघेल तोडगा अशी माहिती. भावना गवळी मुंबईत तळ ठोकून, तर संजय राठोड यवतमाळला परतले.

  • 03 Apr 2024 07:55 AM (IST)

    कल्याण, भिवंडीत 73 जणांचे रिव्हॉल्वर जप्त

    लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे. कल्याण, डोंबिवलीत 773 जणांचे रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहे. तसेच ५९३ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक तर ११९ जणांच्या विरोधात अजामीन पात्र स्वरुपाची कारवाई करुन त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

  • 03 Apr 2024 07:43 AM (IST)

    धोकादायक वाड्यांना महापालिकेच्या नोटीस

    पुणे शहरातील धोकादायक वाड्यांना महापालिकेच्या नोटीस पाठवली आहे. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील 46 वाड्यांना नोटीस बजावली आहे. पुणे शहरात एकूण 141 धोकादायक वाडे आहेत.

  • 03 Apr 2024 07:27 AM (IST)

    बेस्ट विनातिकीट प्रवाशांकडून ४० लाख रुपये दंड वसूल

    मुंबईतील रस्ते मार्गावरील प्रवाशांची जीवनवाहिनी अशी बेस्ट बसची ओळख बनली आहे. परंतु बेस्टमध्ये अनेक प्रवासी तिकिटांचे ५ ते २५ रुपये वाचविण्यासाठी तिकीट काढत नाही. त्यामुळे त्यांना ६६ रुपये ते २०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागला आहे. गेल्या तीन महिन्यांत बेस्टमधील ६४ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडून ४० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Published On - Apr 03,2024 7:26 AM

Follow us
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.