Maharashtra Political News live : लोकसभा निवडणूक २०२४ पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडवणार

| Updated on: Apr 18, 2024 | 8:01 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 17 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : लोकसभा निवडणूक २०२४ पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडवणार

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होत आहे. देशात १०२ तर राज्यात पाच जागांवर मतदान होत आहेत. विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ठिकाणी मतदार होणार आहेत. या मतदार संघातील प्रचार तोफा आज संध्याकाळी पाच वाजता थंडवणार आहेत. छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यांतर्गत नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत 29 नक्षलवाद्यांच्या खात्मा झाला. यंदाचा आंबा हंगाम जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यत चालणार आहे. वातावरणातील बदलामुळे मे महिन्यात आंब्याचे उत्पादन जास्त होणार आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबारासाठी वापरण्यात आलेला दुचाकीचा फोटो समोर आला आहे. आरोपींनी जुनी दुचाकी वापरली होती. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Apr 2024 08:37 PM (IST)

    सांगली अवकाळी पावसाचा फटका, अनेक गावांना पावसाने झोडपले

    सांगली : सांगली जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर मिरज पूर्व भागातील अनेक गावांना पावसाने अचानक झोडपले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे उनमळून पडली आहेत. तसेच अनेक घरांची पत्रे देखील उडाली आहेत. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

  • 17 Apr 2024 01:56 PM (IST)

    कल्याण स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना

    मित्राच्या बायकोला बघतोय असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या दोघांवर चाकूचा हल्ला.  आरोपीला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • 17 Apr 2024 01:40 PM (IST)

    आगीत एकूण चार जण बेपत्ता असल्याची माहिती

    केमिकल कंपनीत स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत चार कामगार पूर्णपणे आगीत सापडल्याची जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. आगीत एकूण  चार जण बेपत्ता असल्याचीही माहिती.

  • 17 Apr 2024 01:09 PM (IST)

    राजू पारवे यांच्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मोठे विधान

    राजू पारवेंचा विजय पक्का असल्याचे मोठे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच केले आहे.

  • 17 Apr 2024 01:03 PM (IST)

    भाजपाचे उमेदवार सुभाष भामरेच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

    धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ.  खासदार सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाला सुरुवात करण्यात आलीये.

  • 17 Apr 2024 11:50 AM (IST)

    जालना लोकसभेची अधिसूचना गुरुवारी जारी होणार

    जालना लोकसभेची अधिसूचना गुरुवारी जारी होणार. 18 ते 25 एप्रिल या कालावधीत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. एका उमेदवाराला चार अर्ज भरता येणार आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याण काळे यांची प्रचारात आघाडी आहे. जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे सलग पाच वेळा खासदार झाले आहेत. कल्याण काळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने रावसाहेब दानवे यांना मोठं आव्हान आहे.

  • 17 Apr 2024 11:40 AM (IST)

    मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकत नाही- अजित पवार

    “लोकसभा ही 140 कोटी जनतेची निवडणूक आहे. गावकीची निवडणूक नाही. मोदींची प्रशासनावर पकड आहे. पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलला आहे. कुणाचा फायदा होईल यापेक्षा कुणी फायदा केला याचा विचार करा. राहुल गांधी यांचं नाव नाईलाजाने घ्यावं लागतं. मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना होऊ शकत नाही,” असं अजित पवार म्हणाले.

  • 17 Apr 2024 11:30 AM (IST)

    मुंबईत दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

    उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाड्यामुळे होणारी काहिली आजसुद्धा कायम आहे. मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ केंद्राने सरासरी 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. तर ठाण्यात सरासरी 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं.

  • 17 Apr 2024 11:20 AM (IST)

    फोनवरून धमकीप्रकरणी एकनाथ खडसेंकडून तक्रार दाखल

    “परवापासून मला धमकीचे कॉल येत आहेत. त्यात दाऊद आणि छोटा शकीलचा उल्लेख करण्यात येतोय. आपकी कोई खैर नहीं, आपको मार देंगे. आपको मारना है, अशी धमकी मला दिली. कोणी खोडसाडपणा करत असेल असं मला आधी वाटलं होतं. पण नंतर मी पोलिसांना कळवलं तक्रार दाखल केली आहे,” अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

  • 17 Apr 2024 11:10 AM (IST)

    आईसाठी पार्थ पवारांचा पुण्यात प्रचार

    प्रभू श्री राम यांच्या प्रतिमेला वंदन करून युवानेते पार्थ पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्याला बावधन परिसरातून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

  • 17 Apr 2024 11:00 AM (IST)

    Live Updates : रामनवमीनिमित्त धुळ्यात शोभा यात्रा

    रामनवमी निमित्ताने धुळे शहरात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेत खासदार सुभाष भामरे यांची उपस्थिती होती. शहरातील शिवतीर्थ चौकापासून शोभा यात्रेची यात्रेची सुरुवात झाली. शोभायात्रेत अयोध्येतील राम मंदिरात बसवलेल्या मूर्तीप्रमाणे मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

  • 17 Apr 2024 10:50 AM (IST)

    Live Updates : नक्षलग्रस्त भागात मतदान पथके रवाना

    गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात वायुसेनेचे हेलिकॉप्टर आणि मतदान पथके रवाना झाले आहेत. दोन दिवसापासून मतदान पथके पाठवण्याचे काम सध्या ४ हेलिकॉप्टरने सुरू आहे.जीवाची बाजी लावून मतदान करण्यासाठी आम्ही काम करतो अशी मतदान पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 17 Apr 2024 10:44 AM (IST)

    Live Updates : रोजगाराचा मुद्दा महत्वाचा- राहुल गांधी

    देशातील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे हा प्रमुख मुद्दा आहे. त्यासाठी आम्ही आमच्या जाहिरनाम्यात काही आयडिया दिल्या आहेत 30 लाख सरकारी जागा सध्या आहेत त्या मोदींनी भरल्या नाहीत आम्ही त्या सगळ्या जागा भरू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.

  • 17 Apr 2024 10:34 AM (IST)

    Live Updates : प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र

    वंचिताच प्रयोग नेमका कशासाठी, कोणाविरुद्ध लोकसभेच्या मैदानात वंचित उतरली आहे, असे अनेक संभ्रम सर्वसामान्यांनाच नाही तर कार्यकर्त्यांना पण आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटरवर कार्यकर्त्यांना पत्र लिहले आहे.

  • 17 Apr 2024 10:22 AM (IST)

    Live Updates : बारामतीच्या आखाड्यात रिक्षावाला

    बारामती लोकसभा मतदारसंघातून रिक्षावाला संघटनेकडून “शरद राम पवार” यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राहणाऱ्या शरद राम पवार नावाच्या व्यक्तीला बघतोय रिक्षावाला या रिक्षा संघटनेने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. शरद राम पवार हे स्वतः रिक्षाचालक असून गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातील आंबेगाव बुद्रुक मध्ये वास्तव्यास आहेत. शरद पवार यांच्यासारखं नाव असल्याने राजकीय वर्तुळात शरद राम पवार यांच्या उमेदवारीची विशेष चर्चा सुरु आहे

  • 17 Apr 2024 10:13 AM (IST)

    Live Updates : शरद पवार यांची मात्रा लागू पडली

    धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एकत्रित येत असल्याचे चित्र आहे. शरद पवारांसोबत सकारात्मक बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही एकत्र येऊन विकासाचे राजकारण करावे, असं माढाच्या जनतेची इच्छा आहे. उत्तम जानकर 19 तारखेला कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत मागचं वैर विसरून एकत्र यावे असं शरद पवारांनी आम्हाला सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

  • 17 Apr 2024 10:01 AM (IST)

    Live Updates : नवनीत राणा यांच्यावर टीका

    महायुतीतील नेते आणि माजी खासदार आनंदराळ अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. बुलडाणा दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राजकारण सोडेने पण राणा यांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे निर्धार त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला

  • 17 Apr 2024 09:50 AM (IST)

    Maharashtra News : धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकरांची शरद पवारांसोबत कशी झाली बैठक?

    शरद पवारांसोबत सकारात्मक बैठक झाली आहे. आम्ही एकत्र येऊन विकासाचे राजकारण करावे, अशी माढ्याच्या जनतेची इच्छा आहे. उत्तम जानकर 19 तारखेला कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. मागचं वैर विसरून एकत्र यावे असं शरद पवारांनी आम्हाला सांगितलं.

  • 17 Apr 2024 09:48 AM (IST)

    Maharashtra News : राणा दाम्पत्याला अक्कल नाही – आनंदराव अडसूळ

    “खरंच त्या पती पत्नीला अक्कल आहे की नाही? हा माझा प्रश्न आहे. नैतिकता नाही, अक्कल नाही. आटापिटा करून मंडळींनी मला थांबविले आणि तिला उमेदवारी दिली. 17 रुपयांच्या साड्या वाटून हीची हवा निर्माण झालीय. नवरा बायकोला बंटी बबली नावं दिली, ती विचारपूर्वक दिली आहेत. मी जाहीर केलेलं आहे, राजकारण सोडेन पण प्रचाराला जाणार नाही” असं आनंदराव अडसूळ म्हणाले.

  • 17 Apr 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News : एकनाथ खडसे यांना धमकी

    एकनाथ खडसे यांना दाऊद, छोटा शकील गँगकडून धमकी मिळाल्याने खळबळ. मुक्ताईनगर पोलिसात खडसेंनी दिली फिर्याद. अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना दि. 15 आणि 16 एप्रिल रोजी फोन करण्यात आल्याची तक्रारीत माहिती.

  • 17 Apr 2024 09:13 AM (IST)

    Maharashtra News : सोलापूर, माढा लोकसभेतील भाजप उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती जाहीर

    अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली मालमत्ता आणि कर्जाची माहिती. माढ्यातील भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार कोट्याधीश आहेत. त्याचबरोबर दोघांच्या डोक्यावर 30 कोटीचे कर्ज असल्याचे पाहायला मिळतेय. माढ्याचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबाकडे एकूण 168 कोटींची संपत्ती आहे. शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटलांकडे एकूण 40 कोटींची संपत्ती आहे. भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्याकडे 91 लाखांची मालमत्ता आहे. त्याचबरोबर राम सातपुतेंकडे पिस्तूलाचा परवाना देखील आहे.

  • 17 Apr 2024 08:56 AM (IST)

    पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे खोटे प्रमाणपत्र

    पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचे खोटे पत्र समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजप प्रदेश कार्यालयाच्या वतीने पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे.भाजपच्या कायदा विभागाचे अँड अखिलेश चौबे यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  • 17 Apr 2024 08:41 AM (IST)

    मुंबईत रामनवमीचा उत्साह

    मुंबईसह राज्यभरात राम नवमी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. वडाळ्यातील मंदिरात भाविकांची मांदियाळी झाली आहे. मंदिराला ६० वर्ष पूर्ण झाली आहे. मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 17 Apr 2024 08:22 AM (IST)

    डिएसके यांना परवानगी

    ईडीने जप्त केलेल्या बंगल्यात जाण्यास डिएसके म्हणजेच दीपक कुलकर्णी यांना परवानगी मिळाली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने त्यांचा बंगला जप्त केला होता. ईडीच्या विशेष न्यायालयाकडून ही परवानगी मिळाली आहे.

  • 17 Apr 2024 08:06 AM (IST)

    प्रचार आज थांबणार

    लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातल्या पाच लोकसभा मतदारसंघात आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. आज सायंकाळनंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार नाही. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचार रॅली, सभा आणि मिरवणुकीने गाजणार आहे.

Published On - Apr 17,2024 8:04 AM

Follow us
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.