शरद पवारांच्या पक्षात चाललंय काय? आधी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा, आता सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचं समोर येताना दिसत आहे. विशेष म्हणजे सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. एक गट थेट सत्तेत सहभागासाठी आग्रही आहे, तर दुसऱ्या गटाने अजित पवार गटासोबत जाण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत या दोन्ही मतप्रवाहांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापलं म्हणणं मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवारांच्या पक्षात चाललंय काय? आधी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा, आता सत्तेत सहभागी होण्यासाठी  2 मतप्रवाह?
ज्येष्ठ नेते शरद पवारImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 4:52 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे महाविकास आघाडीतील अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. महाविकास आघाडी सध्या विरोधी बाकावर आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. शरद पवार यांनी या निवडणुकीला प्रचंड ताकद लावली होती. पण तरीदेखील शरद पवार यांच्या पक्षाला अपयशाला सामोरं जावं लागलं. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं. तसेच महायुतीच्या तीनही पक्षांना भरघोस यश मिळालं. त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन झालं. यानंतर आता महाविकास आघाडीला विरोधी बाकावर बसण्याशिवाय पर्याय नाही. असं असलं तरीही शरद पवार यांच्या पक्षातून सध्या सातत्याने वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहे. आधी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राजीनामा देणार असल्याची चर्चा समोर आली. त्यानंतर आता सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आग्रही आहेत. विशेष म्हणजे सत्तेत कसं सहभागी व्हावं? याबाबतही पक्षात दोन मतप्रवाह आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत वेगवेगळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून भूमिका मांडण्यात आली. यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबतचा मुद्दा अनेकांकडून मांडण्यात आला. विशेष म्हणजे याबाबतही दोन मतप्रवाह असल्याची बाब समोर आली.

सत्तेत सहभागी होण्यावरुन शरद पवार गटात दोन मतप्रवाह

सत्तेत सहभाही होण्यावरुन शरद पवार गटात दोन मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे एक गट सत्तेत सहभाही होण्यासाठी आग्रही आहे. तर दुसरा गट हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील बैठकीत अशी मतं मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांच्या पक्षातील दोन्ही गटांचं नेमकं म्हणणं काय?

पक्षातील एका गटाचं म्हणणं आहे की, थेट सत्तेत सहभागी व्हावं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होऊन सत्तेत सहभागी व्हावं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार गटातील काही नेत्यांचा दबाव असल्याची माहिती आहे. मुंबईतील बैठकीत दोन्ही मतप्रवाहच्या कार्यकर्त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.