VIDEO | कांदिवलीतील हंसा हेरिटेजला भीषण आग, दोन जणांचा मृत्यू

रात्री आठच्या सुमारास आग लागली होती, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली. घटनास्थळी पोहोचत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

VIDEO | कांदिवलीतील हंसा हेरिटेजला भीषण आग, दोन जणांचा मृत्यू
kandivali fire
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 12:08 AM

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढतच चालल्यात. आता कांदिवली पश्चिमेकडेही एक भीषण आग लागली असून, या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील मथुरादास रोडवर असलेल्या हंसा हेरिटेज या निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावर अचानक आग लागली. या आगीत सुमारे 7 जण अडकले होते, सध्या दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी येत आहे.

अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण

रात्री आठच्या सुमारास आग लागली होती, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली. घटनास्थळी पोहोचत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आग लागली तेव्हा काही लोक आत अडकले होते, त्यापैकी काही जखमी झाले आणि दोन जणांचा मृत्यू झाला. कांदिवलीतील आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला, एक 89 वर्षांची आहे, तर दुसरी 45 वर्षांची महिला आहे.

आपण दिवे लावतो त्या दिव्यांमुळे आग लागली

या घटनास्थळाला मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकरांनी भेट दिली असून, त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतलाय. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशीही संवाद साधलाय. चौदाव्या माळ्यावरती, आपण दिवे लावतो त्या दिव्यांमुळे आग लागली आहे, असं त्यांच्या घरातील एक सदस्य मला भेटले आणि त्यांनी मला हे सांगितलं. अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत. प्रयत्नांची शिकस्त आहे. काही जण जखमी आहे, तर मृत्यूही झाल्याचं मला माहिती मिळालीय, असंही त्या म्हणाल्यात.

आग आता नियंत्रणात आलीय

काही लोक त्यात अडकले आहेत. त्यांना आम्ही खालून फोनवरून मार्गदर्शन करतोय. ओला कपडा नाकावर ठेवा, जेणेकरून श्वास गुदमरून जो मृत्यू होतो तो होणार नाही. अशा सूचना आम्ही देत आहोत. आग आता नियंत्रणात आलीय. अजूनही पाच लोक आतमध्ये आहे. तर एका फ्लॅटमध्ये दोन लोक आहेत, ते स्वतः हँडिकॅप आहेत. त्यांनाही बाहेर काढण्यासाठी आमचे लोक गेलेले आहेत. वर जाऊन ते प्रयत्न करत आहेत, असंही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. संबंधित बातम्या

तुझ्या सेल्फीच्या चरबीमुळे डील फसली, सुनील पाटील केपी गोसावीवर भडकला; विजय पगारेंचा दावा

सेल्फीमुळे गेम फसला, कुणा कुणात झाली होती डील?; विजय पगारेंनी सांगितली आँखो देखी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.