प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी उभे असलेल्या दोन पोलिसांना भोवळ; तात्काळ रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी असलेल्या दोन पोलिसांना भोवळ आली. (two police constable suffered dizziness in republic day function at nagpur)

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी उभे असलेल्या दोन पोलिसांना भोवळ; तात्काळ रुग्णालयात दाखल
पोलीस शिपाई
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 10:39 AM

नागपूर: नागपूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी असलेल्या दोन पोलिसांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेत टाकून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलची प्रकृती उत्तम असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (two police constable suffered dizziness in republic day function at nagpur)

प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूरमध्ये परेडचं आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी 8.30 वाजता ही परेड सुरू असताना परेडसाठी उभे असलेले लक्ष्मण कदम आणि आशिष बागडे या दोन कॉन्स्टेबलला भोवळ आली. दोन्ही पोलीस शिपाई अचानक कोसळल्याने इतर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन या दोघांना बाजूला बसवले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावून या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या दोघांवरही उपचार केले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात येत आहे. या दोघांना चक्कर नेमकी कशामुळे आली हे सांगण्यात आलं नाही. मात्र, अशक्तपणा किंवा अति तणावामुळे त्यांना भोवळ आली असावी असं सांगण्यात येतं.

राज्यभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात

दरम्यान, राज्यासह संपूर्ण देशात आज प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह सर्वच पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. सिंधुदुर्गात ओरोस येथील पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री उदय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलीस दलाकडून मैदानात संचलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा आणि गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थित प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

अजितदादांकडून शुभेच्छा

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचं बलिदान केलेल्या शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण अभिवादन केले असून राज्यातील जनतेला तसेच देशवासियांना भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपला देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला, त्यावेळचा काळ देशासाठी खूपच कठीण काळ होता. देशासमोर अनेक आव्हानं होती. परंतु गेली 71 वर्षे हे प्रजासत्ताक आपण टिकवलं, वाढवलं, सुरक्षित केलं. जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहीली, याचं श्रेय देशातील जनतेला आणि जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेवर, भारतीय राज्यघटनेवर अढळ विश्वास असलेल्या तमाम देशवासियांना मी वंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या योगदान, त्यागाबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.  (two police constable suffered dizziness in republic day function at nagpur)

संबंधित बातम्या:

72 Republic Day LIVE UPDATES | राजपथावर पथसंचालनाला सुरुवात, तीनही सेनांची परेड

ठाकरे सरकारकडून 100 नावांची शिफारस, मिळाला फक्त एक पद्म, राऊतांनाही नाही !

PHOTO | प्रजासत्ताक दिनाची देशभरात धूम, विठ्ठलालाही तिरंगी उपरण्याचा साज

(two police constable suffered dizziness in republic day function at nagpur)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.