Garhwal | पाऊण महिन्यांपूर्वी मुंबईहून निघाले, दोघे पर्यटक उत्तराखंडमध्ये मृतावस्थेत, रस्ता हरवल्यानंतर बर्फाखाली गाडले?

दोन्ही पर्यटकांनी 8 डिसेंबर रोजी मुंबई-देहरादून विमानात पकडले होते. जोशीमठला जाण्यापूर्वी 12 डिसेंबरपर्यंत ते हरिद्वार येथे थांबले होते. 12 डिसेंबरला जोशीमठला पोहोचल्यानंतर, त्यांनी गढवाल मंडल विकास निगमच्या गेस्ट हाऊसमध्ये चेक इन केले

Garhwal | पाऊण महिन्यांपूर्वी मुंबईहून निघाले, दोघे पर्यटक उत्तराखंडमध्ये मृतावस्थेत, रस्ता हरवल्यानंतर बर्फाखाली गाडले?
प्रातिनिधीक फोटो - गढवाल - सौजन्य - विकीपीडिया
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 8:21 AM

देहरादून : उत्तराखंडमध्ये बर्फाखाली गाडले जाऊन दोन मुंबईकर मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गढवालमधील चमोली जिल्ह्यातील औलीजवळील बर्फाच्छादित कुरणात शनिवारी दोन पर्यटक मृतावस्थेत आढळले. 50 वर्षीय संजीव गुप्ता आणि 35 वर्षीय सिन्शा गुप्ता यांचे मृतदेह सापडले असून दोघांचाही गोठून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या तिथे तापमान शून्यापेक्षा कमी आहे. त्यांचे मृतदेह एका कुरणातील बर्फाळ भागात मोकळ्या जागेत आढळले होते. रस्ता हरवल्यामुळे दोघं कुरणात थांबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते तिथे मृतावस्थेत पडल्याची चिन्हं आहेत.

विमान तिकीटांवरुन मुंबईचे रहिवासी असल्याचा अंदाज

या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या खिशात सापडलेल्या विमान तिकिटांच्या आधारे मृतदेहांची ओळख पटली. प्राथमिक तपासात दोघांच्या विमानाच्या तपशीलावरुन ते मुंबईचे रहिवासी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यांचे मृतदेह तिथे किती काळापासून होते आणि दोघांमध्ये काय नाते होते, हे अद्याप अस्पष्ट असल्याचं चमोलीच्या एसपी श्वेता चौबे यांनी सांगितले.

एका पर्यटकाने दोन मृतदेहांविषयी माहिती दिल्यानंतर, राज्य आपत्ती दल आणि चमोली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांचे मृतदेह बर्फाखालून बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असल्याची माहितीही एसपींनी दिली.

8 डिसेंबरला देहरादूनला आल्याचे पुरावे

दोन्ही पर्यटकांनी 8 डिसेंबर रोजी मुंबई-देहरादून विमानात पकडले होते. जोशीमठला जाण्यापूर्वी 12 डिसेंबरपर्यंत ते हरिद्वार येथे थांबले होते. 12 डिसेंबरला जोशीमठला पोहोचल्यानंतर, त्यांनी गढवाल मंडल विकास निगमच्या गेस्ट हाऊसमध्ये चेक इन केले. ते दुसऱ्या दिवशी रोपवेने औलीला गेले. 15 डिसेंबरला ते परतणार होते, असेही पोलिसांनी सांगितले.

कुटुंबीयांचा शोध नाही

दरम्यान, पीडितांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. चमोली येथील पोलीस अधिकारी विनोद रावत यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, सर्वतोपरी प्रयत्न करुनही पोलीस त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकलेले नाहीत. “त्यांच्या मोबाईलवरील कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) वरुन आम्हाला कळले की संजीव गुप्ता एका खाजगी वृत्तवाहिनीत कॅमेरामन होते. अद्याप आमच्याकडे महिलेबद्दल फारशी माहिती नाही” असं श्वेता चौबे म्हणाल्या.

“मृतांच्या कपड्यांमधून एक आधार कार्ड सापडले आहे, ज्यामध्ये मुंबईतील वरळी येथील पत्त्याचा उल्लेख आहे. आम्ही अधिक माहिती गोळा करण्यासाठी वरळी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, पण आधार कार्डवर नमूद केलेला पत्ता जुन्या घराचा असल्याचे निष्पन्न झाले” असेही चौबे म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

Nashik Suicide | आई मला माफ कर, सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या

CCTV | निवांतपणे चालत होता, अचानक सळी कोसळली, डोक्यात घुसली, पुढचं सगळंच सुन्न करणारं..

पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात, चौघींचा मृत्यू, पाच जणी गंभीर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.