‘ठाकरे गटाच्या 8 आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून देणार’, शिवसेना नेत्याचा मोठा दावा
"विरोधकांकडे दुसर काहीच भांडवल नाहीय. अशा कुठल्या जागा आहेत, ज्या वाटाघाटीसाठी थांबल्या आहेत, बदनामी करण, आपलं काही साध्य होतय का पाहण? म्हणून विरोधक प्रयत्न करतायत. पण महायुती अजूनही मजूबत आहे"
महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजून सुटत नाहीय. राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सांमत यांनी माघार घेत असल्याच सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. नंतर त्यांनी टि्वट डिलीट केलं. त्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडणार नसल्याच जाहीर केलं. या दरम्यान त्यांनी एक मोठा दावा केला. “ठाकरे गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत भेट घडवून देणार आहे. हवं तर त्यांची नाव सांगतो. नंतर ते म्हणाले की, प्रवेशाच्यावेळी नाव सांगेन”
रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा नारायण राणेंकडे जाणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, “विरोधकांकडे दुसर काहीच भांडवल नाहीय. अशा कुठल्या जागा आहेत, ज्या वाटाघाटीसाठी थांबल्या आहेत, बदनामी करण, आपलं काही साध्य होतय का पाहण? म्हणून विरोधक प्रयत्न करतायत. पण महायुती अजूनही मजूबत आहे” “रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीवर कसालाही परिणाम होणार नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग फार मोठ्या फरकाने जिंकू असं मला वाटत. सोशल मीडियावर एखाद्याची व्यक्तीगत पोस्ट म्हणजे पक्षाची भूमिका नसते” असं उदय सामंत म्हणाले.
राजकारणात भावनिक होण ठीक आहे, पण….
“मी शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय. शिंदे साहेबांनी तो मतदारसंघ निरीक्षणासाठी माझ्याकडे दिलाय. पक्षीय निर्णय मी घेतो. त्या टि्वटमुळे कोणाचा गैरसमज झाला असेल, तर दूर झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने तो प्रश्न संपलेला आहे. ही जागा शिवसेनेकडेच रहावी. राजकारणात भावनिक होण ठीक आहे. पण सोशल मीडियाचा वापर होऊ नये” असं त्यांनी सांगितलं.