‘कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे’, वायूगळतीवर उदय सामंत आक्रमक

रत्नागिरीतील जिंदाल कंपनीत झालेल्या वायूगळतीमुळे अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे आणि बाधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कंपनीने योग्य ती काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.

'कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे', वायूगळतीवर उदय सामंत आक्रमक
उदय सामंत
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 3:45 PM

रत्नागिरीत जिंदाल कंपनीतून वायुगळती झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला. अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेकांची प्रकृती बिघडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अखेर या घटनेची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली आहे. माजी मंत्री उदय सामंत यांनी या घटनेची दखल घेतली आहे. उदय सामंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत भूमिका मांडली आहे. “अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली गेलीय. आजच केस दाखल केली जाईल. निष्काळाजीपणामुळे वायूगळती झाली. कंपनीने दिलेली आश्वासन आणि त्याची परिपूर्णता याचा अहवाल देखील समितीने द्यावा. कंपनीकडून काय मिळते याबाबत नागरिकांनी देखील सजग राहावे. कंपनीकडून सुसज्ज हॉस्पिटल होईल यासाठी ग्रामस्थांनी सजग पाहिजे. ग्रामस्थांचा कोणताही गैरफायदा कंपनी उठवू नये यासाठी समिती स्थापन केली आहे. कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. कंपनीच्या मालकाने देखील कधीतरी रत्नागिरीमध्ये यायला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये कंपनी दोषी आहे”, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही प्रतिक्रिया दिली. “मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या मंत्र्यांची नावं ठरली आहेत, तर त्याची नावे सांगा. मी आता अभिनंदन करतो”, असं उदय सामंत म्हणाले. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार भेटीचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही. तसं काही असेल तर लवकर कळेल. आम्ही तत्त्वाने शरद पवार यांचे विरोधात. पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान आहे”, असंदेखील उदय सामंत यावेळी म्हणाले.

उदय सामंत यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

“मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता नक्की येणार आहे. महायुतीचे हिंदुत्व बेडगी असते तर आम्ही 234 वर गेलो असतो का? पराभव मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे”, असं म्हणत उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं. “हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात झालेल्या आंदोलनात उबाठा कुठे सामील होते? महायुती म्हणून आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकणार म्हणजे जिंकणार”, असंही उदय सामंत म्हणाले.

‘विरोधक म्हणून काही चांगले सल्ले दिल्यास स्वीकारले जातील’

यावेळी उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनादेखील प्रतिक्रिया दिली. “विरोधक म्हणून काही चांगले सल्ले दिल्यास स्वीकारले जातील. मुद्दा करायला आता कोणत्याच निवडणुका नाहीत”, असं उदय सामंत म्हणाले. “कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार”, असं उदय सामंत म्हणाले.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.