‘कुणबी मराठा जात…’, उदयनराजे भोसले यांचे सर्वात मोठे विधान
कुणबी मराठा हे तुम्हाला मान्य आहे का? मला जात मान्य नाही. एखाद्या एक्स वाय झेडला मागासवर्गीय म्हणायचा अधिकार कोणी दिला? मी मोठा, तू हलका, एवढ जर करायचे असेल तर रक्त लावताना कोणाचे रक्त हे का पहात नाही, असा जळजळीत सवाल केला.
सातारा : 13 ऑक्टोबर 2023 | जालना येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा कार्यक्रम आहे. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठे विधान केलंय. तिथे काय कार्यक्रम आहे हे माहित नाही. मी जात पात मानत नाही. भविष्यकाळात मेरीटच बघितले जाणार आहे. कायद्याप्रमाणे दहा वर्षानंतर लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्या. ठराव नाही, नोटीफिकेशन नाही. बाकिच्या समाजाला तुम्ही आरक्षण देताय. देवाने सर्वांना सेम बुध्दी दिली नाही. खरी चुकी ही त्यावेळच्या राज्यकर्त्यांची आहे. त्यावेळी मंडल आयोग होते त्यांनी बँकवर्ड क्लास म्हणता तुम्ही त्याच विश्लेषन केले ते चुकिचे आहे असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
कोणी कोणत्याही जातीचा असू दे. त्यांना तुम्ही आर्थिकदृष्या सहकार्य करा. आजची मुले शिकली नाही तर काय होईल. त्यांचे भवितव्य राज्यकर्त्यांच्या हातात आहे. मी जालन्याला जाणार नाही. त्यांची सभा होऊन जाऊ देत. ज्या त्या जातीची लोकसंख्या निश्चित होत नाही. ती दहा दहा वर्षानी करावी लागते. आता किती वर्ष झाली. जनगणनेची तयारी करा आपोआप हा प्रश्न मिटेल. आणि जर प्रश्न सोडवायचाच नसेल, भिजत घोंगडे ठेवायचे असेल तर तसं करा, असा टोलाही त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारला लगावला.
कॉग्रेसकडूनही जात निहाय गणनेची मागणी होते. पण, त्यांनी फक्त वोट बँक बघितली आहे. लोक त्यांची कदर करणार नाही. पाच राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. पण, मला त्याचे काही वाटत नाही. माजी निवडणूकीची खाज भागली. बघता बघता मी 50 कधी झाले माहिती नाही. हापचड्डी कधी गेली समजलेच नाही. रिटायरमेंटचे जे वय शासनात असते तसे वय राजकारणात पाहिजेत. तो नियम राजकारण्यांनाही लागू झाला पाहिजे. प्रत्येकजन म्हणणार लोकांचा आग्रह होता म्हणून. शरद पवारांनी आता मार्गदर्शक म्हणून असावे असे मला वाटते. त्यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रातही सर्व भोगले. त्यांनी आता मार्गदर्शक भूमिकेत असले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये आणण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे ही करी की खोटी यावर ते म्हणाले, ‘मी लहान असताना जलमंदिर येथे चोरी झाली होती. वाघनख्यांची त्यावेळी चोरी झाली की नाही हे माहिती नाही. मी लहान होतो. पण, छत्रपती शिवाजीराजे यांच्याबाबतीत तारीख आणि इतर वाद निर्माण केले जातात, असे त्यांनी सांगितले.