Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचे दिवस येतील…उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेना अन् भाजपला दिला इशारा

Uddhav Thackeray in Konkan | आम्ही तुमचे शत्रू नव्हतो, आजही नाहीत. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. तुमच्या पिलावळाने काम केले असते तर तुमच्यावर पक्ष फोडायची वेळ आली नसती, असा हल्ला कोकणातून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

आमचे दिवस येतील...उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेना अन् भाजपला दिला इशारा
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 2:37 PM

सावंतवाडी, सिंधुदुर्ग, दि.4 फेब्रुवारी 2024 | शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातून मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. सावंतवाडी येथील सभेत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना विविध प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. परंतु थांबा…आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजसह पूर्ण फेडू. व्याजसह नाही तर चक्रवाढ व्याजसह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला दिला.

गणपत गायकवाड प्रकरणावरुन टीका

गणपत गायकवाड यांच्या प्रकारणाचा संदर्भ घेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार पुन्हा आले तर पुढील प्रजाकसत्ताक दिन साजरा करता येणार नाही. देशात हुकुमशाही असणार आहे. मिंधे यांची गँग आणि भाजपची गँग मुंबईत आहे. तिसरी सिंचन घोटाळ्याची गँग आहे. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर उल्हासनगरमधील आमदार गणपत गायकवाड म्हणतात, मिंधेंकडे माझे करोडो रुपये आहेत. आता मोदींची गॅरंटी मिंधेना पावणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मोदी यांच्या योजनांवर टीका

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनेवर त्यांनी टीका केली. प्रधानमंत्री स्वनिधी योजना म्हणजे पंतप्रधानांच्या स्वत:साठी ही योजना आहे का ? पंतप्रधान मत्सनिधी योजनेचा लाभ सर्वात जास्त लाभ गुजरातला दिला. कोकणाला किती लोकांना हा लाभ मिळाला ?

हे सुद्धा वाचा

आम्ही तुमचे शत्रू नव्हतो, आजही नाहीत. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. तुमच्या पिलावळाने काम केले असते तर तुमच्यावर पक्ष फोडायची वेळ आली नसती. मी मोदी यांच्या विरोधक नाही. आम्ही सोबत २५-३० वर्ष राहिलो. परंतु चांगले काहीच झाले नाही, त्यामुळे साथ सोडली, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. निवडणूक बाकी आहे. पण मी तुम्हाला भेटायला आलो आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी येईन. त्यानंतर विजयी गुलाल उधळायलासुद्धा येईल.

तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ.
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड.
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?.
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं.