उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेनेत नाराजीनाट्य, शेकडो समर्थक शिंदेसेनेत

नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटात नाराजी असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्याची दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली नाही. नेर तालुक्यातही खासदार संजय देशमुख यांच्या समर्थकानी साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संजय राठोड यांच्या समक्ष मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेनेत नाराजीनाट्य, शेकडो समर्थक शिंदेसेनेत
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 1:45 PM

शिवसेना उबाठामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यासाठी मुंबईतील मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. परंतु दुसरीकडे शिवसेनेतील धुसफूस समोर आली आहे. शिवसेनेतील नाराजी नाट्याचा फटका उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या दिवशीच मिळाला आहे. शिवसेना उबाठामधील शेकडो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहे. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना यवतमाळमधून उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का बसला आहे.

वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी सोडली साथ

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात पराभव केला होता. या निकालाच्या काही महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी घटना घडली आहे. २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस साजरा होत असताना यवतमाळ जिल्ह्यात पक्षातील कार्यकर्ते सोडून गेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनाही हा मोठा धक्का आहे. खासदार संजय देशमुख यांच्या शेकडो समर्थक युवकांनी मंत्री संजय राठोड यांच्या समक्ष शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला आहे.

मुस्लिम युवकांचाही शिवसेनेत प्रवेश

दिग्रस येथील विश्रामगृह येथे मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. दिग्रस शहरातील गवळीपुरा परिसरातील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे उबाठा सेनेला धक्का मानला जात आहे. शिवसेना शिंदे गटामध्ये मुस्लिम बांधवांनी प्रवेश केल्याने मंत्री राठोड यांच्याकडून युवकाच्या खांद्यावर कौतुकाची थाप घेतली.

हे सुद्धा वाचा

संजय देशमुखांबद्दल नाराजी

नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटात नाराजी असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्याची दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली नाही. नेर तालुक्यातही खासदार संजय देशमुख यांच्या समर्थकानी साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संजय राठोड यांच्या समक्ष मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्रस मतदार संघात ताकद वाढवण्याचा मंत्री राठोड यांचा प्रयत्न आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.