शिवसेनेला नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे काय?; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला

पाच वर्ष सरकार राहिलं असतं तर तुमच्यासाठी मी एक योजना आणली असती. जाहीर करून तोंडाच्या वाफा दडवण्यापेक्षा मी तुम्हाला करून दाखवलं असतं. मी तुम्हाला कर्जमुक्तही केलं असतं, असं सांगतानाच या हुकूमशाही विरोधातील मत वाया जाऊ देऊ नका. तुमचं मत मशालला द्या. अपक्ष किंवा इतरांना मतदान करू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

शिवसेनेला नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे काय?; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला
Uddhav ThackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 9:19 PM

मोदीजी याच शिवसैनिकांनी तुम्हाला दोनदा पंतप्रधान करण्यासाठी जीवाचं रान केलं. अन् तुम्ही त्यांना नकली म्हणता? नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे काय? तुम्ही शिवरायांचा भगवा घेतलेल्या शिवसैनिकांना नकली म्हणताय, तुम्हाला महाराष्ट्राची जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघाती हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे यांची बुलढाणा येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी भरसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आज माझ्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आहे, कम्युनिस्ट आहेत. ठिक आहे. पण गेल्यावेळी आम्ही तुमच्यासोबत होतो. शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही महाराष्ट्रात फक्त दोन चार सभांसाठी आला होता. आता तुम्हाला महाराष्ट्रात वारंवार यावं लागतं. मतांची भीक मागत आहात. उद्धव ठाकरेंना संपवत आहेत. संपूर्ण पक्ष माझ्या अंगावर येत आहे. तुम्ही माझा पक्ष फोडला, माझे वडील चोरले, पण जनता तुमच्यासोबत येत नाही. त्याला मी काय करू? उद्धव ठाकरे संपलाय ना? मग का येता महाराष्ट्रात? नकली शिवसेना म्हणताय ना, पहा हा दांडका, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

तुम्हाला पाय ठेवू देणार नाही

इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. ते आणावं लागणार आहे. सरकार आल्यावर गुजरातच्या हक्काचं आहे ते आम्ही देणार. पण गुजरातच्या समृद्धीसाठी महाराष्ट्राच्या हक्काचं ओरबाडून नेत असाल तर तुम्हाला महाराष्ट्र्राच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही. गेली दहा वर्ष तुम्हाला दिली. पण तुम्ही काहीच केलं नाही. तुमची नुसती फेकाफेकी ऐकली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेत आहात. मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. गुजरातचे नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंमत असेल तर कारवाई करा

तुमच्या सातशे पिढ्या उतरल्या तरी आमच्या हृदयातील भवानी आणि शिवाजी काढू शकणार नाही. आम्ही बोलणार जय भवानी, जय शिवाजी, हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करून दाखवा. तुम्ही जय श्रीराम म्हणता. कर्नाटकात बजरंगबली की जय म्हणता. पण आम्ही तसं बोललोय का? आम्ही आमच्या भवानी मातांचा गजर करतोय. ते आमचं कुलदैवत आहे, असं त्यांनी ठासून सांगितलं.

ती राखीच आरसा दाखवेल

मोदीजी तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते तुमच्याकडे आले. एक ताईही तुमच्याकडे आल्या. त्यांनी तुम्हाला राखी बांधली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्याच पक्षाने केले. पण त्यांनी तुम्हाला राखी बांधली. ती राखी नाहीये. तुमच्या हातावरील राखी तुम्हाला सतत आरसा दाखवेल, असा टोला त्यांनी लगावला.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.