उद्धव ठाकरेंची नवनिर्वाचित आमदारांसोबत पडद्याआड बैठक, म्हणाले, ‘जरी समोर फडण’वीस’ तरी तुम्ही 20….’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी आपल्या 20 निवडून आलेल्या आमदारांशी बैठक घेतली. त्यांनी आमदारांना धीर दिला आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी शिवसेनेच्या इतिहास आणि वामनराव महाडीक यांच्या उदाहरणाचा उल्लेख करत आमदारांना प्रबळपणे काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आव्हान देण्याचा संदेशही दिला.

उद्धव ठाकरेंची नवनिर्वाचित आमदारांसोबत पडद्याआड बैठक, म्हणाले, 'जरी समोर फडण'वीस' तरी तुम्ही 20....'
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 9:23 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केवळ 46 जागांवर यश आलं आहे. तर महायुतीला तब्बल 230 जागांवर यश आलेलं आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वाधिक 20 जागा जिंकून आल्या आहेत. या विजयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपल्या आमदारांना कानमंत्र दिला. आगामी काळात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. विधानसभेत सत्ताधाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कदाचित आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतं किंवा आमदारांचं मानसिक मनोधैर्याचं खच्चिकरण होऊ शकतं. याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा इतिहास आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचादेखील उल्लेख केल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडून आलेल्या 20 आमदारांशी संवाद साधला. जरी समोर फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, त्यांना पुरुन उरा, असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळेला उद्धव ठाकरे यांनी आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या. यावेळेला उद्धव ठाकरेंनी आमदारांना म्हटलं की, “जरी समोर फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, त्यांना पुरुन उरा.”

उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या सर्व 20 आमदारांना मुंबईत आपल्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलवत त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला आता पुढे काय करायचं आहे, महायुतीचा कसा सामना करायचा आहे, याबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या आमदारांच्या संख्याबळाचा धागा पकडत त्यांनी आमदारांना पुढील कामकाजांचा कानमंत्र दिला. विधानसभेत फडणवीस असले तरी तुम्ही संख्येने 20 आहात. तुम्ही त्यांना पुरुन उरा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जडणघडणबाबतही भाष्य केलं. “शिवसेना स्थापनेच्या काळात वामनराव महाडिक हे शिवसेनेचे एकमेव आमदार विधानसभेत होते. ते एकमेव असतानादेखील विधानसभा गाजवत असत, पण तुम्ही तर संख्येने 20 आहात. त्यामुळे विधानसभा आपल्या भूमिकांनी आणि मुद्द्यांनी गाजवा”, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिली. या बैठकीनंतर सर्व आमदार विधान भवनाच्या दिशेला निघाले. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी हे आमदार विधान भवनाच्या दिशेला रवाना झाले.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.