Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena: उद्धव ठाकरे हेच खरे मातोश्रीचे बछडे, मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव.. शिवसेनेचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

मुंबईत मेट्रो-3 च्या कार्यक्रमाला आलेल्या नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात अडीच वर्षांत राज्य 10वर्षे मागे गेल्याची टीका त्यांनी केली होती. राज्यात आलेले शिंदे सरकार हे गणरायाच्या कृपेने आले असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Shiv Sena: उद्धव ठाकरे हेच खरे मातोश्रीचे बछडे, मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव.. शिवसेनेचे नारायण राणेंना प्रत्युत्तर
शिवसेनेचे राणेंना प्रत्युत्तर Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 3:24 PM

जालना – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांच्या विचारांशी विश्वासघात केला तेच खरे गद्दार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhay Thackeray)हेच मातोश्रीचे खरे बछडे आहेत. नारायण राणे(Narayan Rane)यांना शिवसेनेतून हाकलून दिले होते. गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये. या शब्दांत शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांचे नारायण राणे यांना उत्तर दिले आहेत.

खरे गद्दार हे उद्धव ठाकरेच असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून हे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. विकास हा केवळ पैशांसाठी आहे, अशी उद्धव ठाकरेंची व्याख्या होती, अशीही टीका राणे यांनी केली होती. त्यावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.

नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेनेचे काय प्रत्युत्तर?

नारायण राणे यांन उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला जालन्यातील शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हेच खरे मातोश्रीचे बछडे आहेत. ज्यांनी शिवसेनेसोबत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी विश्वासघात केला तेच खरे गद्दार आहेत. अशी टीका त्यांनी केली आहे. राणे यांना शिवसेनेतून हाकलून दिले होते, त्यामुळे मतोश्रीशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये. या शब्दांत त्यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले होते नारायण राणे?

मुंबईत मेट्रो-3 च्या कार्यक्रमाला आलेल्या नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात अडीच वर्षांत राज्य 10वर्षे मागे गेल्याची टीका त्यांनी केली होती. राज्यात आलेले शिंदे सरकार हे गणरायाच्या कृपेने आले असल्याचे त्यांनी सांगितले होते. घरात राहून महाराष्ट्र चालवता येत नाही, असा टोला उद्धव यांना लगावतानाच, आता राज्य सर्वांगिण विकासाकडे वाटचाल करत आहे. असेही ते म्हणाले होते.

उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार – राणे

शिवसेना आमदार आणि पक्षाशी खरी गद्दारी ही उद्धव ठाकरेंनी केली. गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं. भाजपाशी गद्दारी केली. कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदेंसारख्याशी गद्दारी केली. आमदारांची कामे केली नाहीत. केवळ कुटुंबीयांची कामे केली, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आवाज कुणाचा, यावर आता उत्तर मिळालेले आहे. शिवसेनेकडे किती आमदार आहेत. असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटाकडे ४० आमदार आहेत. इतरही अनेक जण मार्गावर असल्याचे संकेत नारायण राणे यांनी दिलेत. शिवसेना आणि ठाकरे यांचा आता आवाज राहिलेला नाही. दसरा मेळाव्यात काय बोलणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना संपलेली आहे. शिंदे हीच खरी शिवसेना आहे, असेही राणे म्हणाले.