भीमा कोरेगावचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही : उद्धव ठाकरे
केंद्राने एल्गार प्रकरणाचा तपास काढून घेतला आहे. मात्र भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Bhima Koregaon and elgar parishad)
सिंधुदुर्ग : “एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. दलित बांधवांशी संबंधित जो विषय आहे तो भीमा कोरेगावचा आहे. या प्रकरणाचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही”, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Bhima Koregaon and elgar parishad) यांनी दिलं. ते सिंधुदुर्गात बोलत होते. एल्गार परिषद हा विषय वेगळा आहे. केंद्राने एल्गार प्रकरणाचा तपास काढून घेतला आहे. मात्र भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Bhima Koregaon and elgar parishad)
राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर काही तासातच केंद्र सरकारने या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादविवाद होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
नीट लक्षात घ्या की एल्गार आणि भीमा कोरेगाव हे दोन वेगळे विषय आहेत. माझ्या दलित बांधवाचा जो विषय आहे तो भीमा कोरेगावबाबत आहे आणि भीमा कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, तो केंद्राकडे देणार नाही. भीमा कोरेगावमध्ये दलित बांधवांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे, त्याच्यात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी दलितांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे एल्गार हा विषय वेगळा आहे आणि दलितांशी संबंधित भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे. तपास केंद्र सरकारने जो आपल्याकडून काढून घेतला आहे तो एल्गारचा आहे, भीमा कोरेगावचा नाही. त्यामुळे कृपा करुन कोणीही गैरसमज करुन घेऊ नका. मी पुन्हा सांगतो, एल्गार हा विषय वेगळा आहे आणि दलितांशी संबंधित भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत काल काय चर्चा झाली?
कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. काल मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी (Nawab Malik on Koregaon Bhima SIT) पत्रकार परिषदेत दिली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन गृहमंत्री अनिल देशमुख कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करतील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी चर्चा केली. एसआयटी स्थापन करण्याबाबत शरद पवारांनी राज्य सरकारला पत्र दिलं होतं. राज्य सरकार एल्गार परिषदेसंदर्भात समांतर एसआयटी स्थापन करु शकते, एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या कलम 10 नुसार वेगळी समिती स्थापन करण्याची तरतूद आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या
कोरेगाव-भीमा प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करणार, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा