उद्धव ठाकरे यांना धक्का, शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

Eknath Shinde and Uddhav Thackeray: एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्षप्रवेश झाला आहे.

उद्धव ठाकरे यांना धक्का, शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 9:18 PM

Eknath Shinde and Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही. त्यांच्या पक्षाचे अवघे 20 आमदार निवडून आले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही. त्याचवेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे. एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्षप्रवेश झाला आहे.

शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाझे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली.

आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एसटी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले. 40 आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरु आहे. आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेला खिंडार पडले आहे.

महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.