‘हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय’, उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य

"मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. शेतकरी प्रश्न, आरक्षण या विषयावर या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय', उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 8:35 PM

धाराशिव | 7 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं आहे, असं अमित शाह म्हणाले. त्यांच्या याच टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेत प्रत्युत्तर दिलं. धाराशिवमध्ये आज ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. “हो मला करायचे आहे आदित्यला मुख्यमंत्री. पण त्यासाठी त्याला तुम्ही (नागरिकांनी) निवडून दिले पाहिजे. जय शाहचे क्रिकेटचे काय योगदान आहे? महाराष्ट्रातील मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही जय शाहाला अध्यक्ष केले. आमचे सरकार का पडले? कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. मात्र आमच्यातले मिंधे, त्यांच्यासोबत पाय चाटत गेले. माझा गुजरातला विरोध नाही. पण तुम्ही गुजरात आणि भारतात भिंत उभी करत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार करायचे नाही, असा नियम निवडणूक आयोगाने काढला आहे. निवडणूक आयोगाचे नाव मी धोंड्या ठेवले आहे. या धोंड्याने जो नियम काढला आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाला लावा. भाजप लोकांना अयोध्येला घेऊन जाते. कर्नाटकमध्ये जय हनुमानचा नारा देत मोदींनी मते मागितले होते. त्यामुळे मोदींच्या मतदानाचा अधिकार पहिल्यांदा काढून टाका, असे आवाहन मी धोंड्याला करतो. शिवसेनेबाबतचा निकाल त्या लबाड नार्वेकरने दिला. तो माणूस आता भाजपकडून निवडणुकीला उभा राहणार आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता’

“मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. शेतकरी प्रश्न, आरक्षण या विषयावर या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या शेतकऱ्याच्या बाळाच्या डोक्यावर कर्ज घेऊन तो जन्माला येतो. त्यामुळे आता यावेळी फसलात तर अवघड आहे. शिवसेना देखील 25 वर्षांपासून फसली होती”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.