‘तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो…’, ठाकरेंकडून पुन्हा अमित शाहांसोबतच्या बंद दाराआडच्या चर्चेवर विधान

"2014, 2019 ला आम्ही मोदींचे फोटो लावले होते. तुम्ही बाळासाहेबांचे फोटो लावले होते. तुम्ही खाल्ले ते श्रीखंड आणि आम्ही खाल्ले ते शेण आहे का?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये आपल्या भाषणात केला.

'तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो...', ठाकरेंकडून पुन्हा अमित शाहांसोबतच्या बंद दाराआडच्या चर्चेवर विधान
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 8:08 PM

सागर सुरवसे, Tv9 प्रतिनिधी, धाराशिव | 7 मार्च 2024 : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात मातोश्रीवर बंद दाराआड चर्चा झाली होती. या चर्चेत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात आला होता. भाजपने हा प्रस्ताव मान्य केला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार केला जातोय. उद्धव ठाकरे यांनी आजदेखील तोच दावा खरा असल्याचं म्हटलं. यासाठी त्यांनी आज धाराशिवमध्ये तुळजा भवानी देवीची शपथ घेतली. धाराशिवमध्ये आज ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

“तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो की अमित शाह यांनी मला सांगितले की अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ. 2019 साली अमित शाह यांनी शब्द दिला होता. पण तो शब्द त्यांनी पाळला नाही. ते खोटे बोलत आहेत. मी वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना शब्द दिला होता की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करतो. यावरून अमित शाह यांनी ठीक आहे असे सांगितले. तुम्ही दिलेल्या शब्द पाळला नाही म्हणून मी तो सूड उगवला. तो पण अजूनही पूर्ण झालेला नाही. पुन्हा एकदा शिवसैनिक मुख्यमंत्री बनेल”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

‘तुम्ही खाल्ले ते श्रीखंड आणि आम्ही खाल्ले ते शेण?’

“2014, 2019 ला आम्ही मोदींचे फोटो लावले होते. तुम्ही बाळासाहेबांचे फोटो लावले होते. तुम्ही खाल्ले ते श्रीखंड आणि आम्ही खाल्ले ते शेण आहे का?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. “भाजपाला काय वाटते की, पूर्ण देश आणि महाराष्ट्र त्यांना आंधन दिला आहे का? आम्ही पण श्रीरामचे भक्त आहोत. नरेंद्र मोदींचे नाव कोणाला माहिती नव्हतं. त्यावेळपासून हिंदुत्वचा झेंडा घेऊन आम्ही कित्येकपटीने पुढे गेलो होतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“क्रिकेटमधील आधीच्या बॅट्समनने सेंचुरी, डबल सेंचुरी मारली आहे, अशी माझी अवस्था झाली आहे. कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचे अभिनंदन करतो. कारण अस्सल शिवसैनिक हा खोक्यांनी विकला जात नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत एक साप निघाला होता. पण आम्हाला काय माहिती तो साप दूध सोडून कोरक्स प्यायला लागला. त्याच्यावर फिरतोय त्यामध्ये लक्षात येते की मुस्लिम समाज देखील आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. कारण त्यांना लक्षात आले आहे की आमचे हिंदुत्व हे खरे हिंदुत्व आहे”, असंदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.