Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये जुंपली. 1500 रुपये देता पण महागाईचं काय ?, देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ म्हणत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. त्यानंतर शिंदेंनीही पाटणच्या सभेतून प्रत्त्युत्तर दिलं. 

लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 10:49 PM

विधानसभेसाठी प्रचार सुरु झालाय आणि सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली आहे. लाडकी बहिण योजनेमुळं कोणाचं घर चालतं का ?, महागाईचं काय असा सवाल करत देवा भाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ अशी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी राधानगरीच केपी पाटलांसाठी सभा घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी शंभूराज देसाईंच्या पाटणमधून ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. टप्प्यात सावज आल्यावर करेक्ट कार्यक्रम केला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘हे भाऊ नाहीत हे जाऊ तिथे खाऊ आहेत. या योजनेमुळे कोणाचे घर चालतंय असं एका जरी व्यक्तीने सांगितले तरी मी महाविकासआघाडीला सांगेल की महायुतीच्या विरोधात एकही उमेदवार नको. कारण घरं सगळी सुखी आहेत. ही योजना राबवताय पण महागाई कितीये.’

‘माझी आई काटकसर करायची हे मी पाहिलेय. यामध्ये जर आम्ही थोडा हातभार लावायला गेला तर तुम्ही त्याला रेवड्या म्हणतात. त्याला लाच म्हणतात. तुम्हाला लाज वाटली पाहिजेय ज्यांनी ज्यांनी यात खोडा घातलाय त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवणार की नाही. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

जेव्हा लोकांनी बाळासाहेबांचा विचार सोडले. पक्ष विकायला काढला. जेव्हा खच्चीकरण होऊ लागले. बाळासाहेबांचे धनुष्यबाण, विचार जेव्हा तोडून मोडून टाकले. वेळ साधून करेक्ट कार्यक्रम करायचा असतो. असंही शिंदे यांनी म्हटले आहे.

भाजपच्या कटेंगे तो बटेंगे या कॅम्पेनवरुनही ठाकरेंनी ना तुटू देणार…ना लुटू देणार असा पलटवार केला. इकडे बारामतीच्या सभेतून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोर्चा वळवला. पंतप्रधानांनी देशाचा विचार करायचा असतो. मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. तुम्ही देशाचे पंतप्रधान आणि एकाच राज्याचा विचार करतात. मोदी फक्त गुजरातचाच विचार करतात, मग पंतप्रधान कशाला मुख्यमंत्रीच व्हा, असा चिमटा पवारांनी काढला. प्रचार जेमतेम सुरु झालाय. 20 तारखेला मतदान आहे. त्यामुळं जसजसा प्रचार शिगेला पोहोचले, टीकेचे रॉकेट फुटतील.

स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?.
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....