देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंबाबतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 1999 पासूनच…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीतून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे मोठे गौप्यस्फोट केले आहेत. तसेच राज ठाकरे यांना लोकसभेत जागा का देता आल्या नाहीत याचं स्पष्टीकरणही दिलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांना 1999 पासूनच मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडत होती. पण त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत येत नसल्याने त्यांनी अपक्षांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष द्यायला सुरुवात केली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
उद्धव ठाकरे यांना 1999 पासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती. 1999च्या निवडणूक निकालानंतर त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत नव्हतं. मुख्यमंत्रीपदासाठी नाव पुढे येत नव्हतं म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. मात्र, या काळात त्यांनी एक गोष्ट केली. ती म्हणजे नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही. याची त्यांनी काळजी घेतली होती. जनहितापेक्षा त्यांना पद महत्त्वाचं वाटत होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
प्रत्येक उमेदवार निवडून आणणार
लोकसभेच्या जागा वाटपावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत 30 जागा लढवण्याचा आमचा आग्रह होता. पण लोकसभेच्या जास्त जागा लढवण्याची शिंदे गटाचीही इच्छा होती. त्यामुळे आम्ही कमी जागा घेतल्या. पण युतीत आमच्या जागा वाढल्या आहेत. आता आम्ही युतीतील प्रत्येकाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
राज ठाकरेंचा विचार विधानसभेत
यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं. राज ठाकरे महायुतीत आले. पण त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. कारण आम्ही तीन पक्ष एकत्र होतो आणि जागा फक्त 48 होत्या. त्यामुळे त्यांना जागा देऊ शकलो नाही. पण विधानसभेत त्यांचा विचार केला जाईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
दादा आरोपांमुळे सोबत नाहीत
अजित पवार यांच्या बंडावरही त्यांनी भाष्य केलं. मोदींच्या विकास कामांना पाठिंबा देण्यासाठी अजितदादा आमच्यासोबत आले. आरोपांमुळे आमच्यासोबत आले नाहीत. त्यांच्यावर दोषसिद्ध झालेले नाहीत. भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आरोपाच्या चौकशीची मागणी केली होती. त्या भूमिकेतून ती योग्य होती, असं सांगतानाच बारामतीच्या लढाईत दादांना कुटुंबाने एकटे पाडले. ते अभिमन्यूसारखे एकटे लढले. आमच्या लोकांना अजित पवारांच्या लढ्याचं अप्रुप वाटतं, असंही ते म्हणाले.