उद्धव ठाकरेंची मागणी शरद पवारांकडून अमान्य, पवारांचा पक्षही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

काही दिवसांआधी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीआधीच घोषित करण्याची मागणी केली होती. ज्याचे अधिक आमदार, त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला नको असं ठाकरे म्हणाले होते. मात्र पवारांनी संख्याबळानुसारच पुढचा निर्णय होईल असं स्पष्ट केलंय.

उद्धव ठाकरेंची मागणी शरद पवारांकडून अमान्य, पवारांचा पक्षही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 10:49 PM

ज्याचे आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला न ठेवता आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची मागणी अमान्य केली आहे. निकालानंतर संख्याबळाच्या आधारावरच मुख्यमंत्रिपदाचं ठरेल, असं शरद पवार म्हणाले आहेत. जे शरद पवार बोलले तीच भूमिका काँग्रेसची आधीपासूनच आहे. त्यामुळं शरद पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून वडेट्टीवारांनी तात्काळ, सहमती असल्याचं म्हटलं. तर मुख्यमंत्रिपदासाठी कोणाची लढाई नसून शरद पवारांशी चर्चा करु असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

2 दिवसांआधीच नारायण राणेंनी मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंनी जहरी टीका केली होती. आता नितेश राणेंनीही ठाकरेंना पवारांनी लायकी दाखवल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शरद पवारांच्या आणखी एका वक्तव्यावरुन भुवया उंचावल्या आहेत. 15 दिवसांआधीच, आमच्या पक्षातून मुख्यमंत्रीपदासाठी कोणीही इच्छुक नसल्याचं सांगत, एकप्रकारे मुख्यमंत्रिपदाच्या रेसमधून बाहेर पडल्याचेच संकेत दिले होते. आता, आपली राष्ट्रवादीही शर्यतीत असल्याचं शरद पवारांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिलं आहे.

2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, तेव्हा शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंचं नाव पुढं केलं. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशेषत: संजय राऊतांनी ठाकरे टू सरकार म्हणत नाव पुढं केलं जातंय. मात्र आता परिस्थिती बदललीय,

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या तुलनेत कमी जागा घेवून काँग्रेस नंबर वन राहिली तर शरद पवारांची राष्ट्रवादी 2 नंबरवर आहे. म्हणूनच आधीच चेहरा घोषित करण्यास काँग्रेसचा विरोधच होता. आता, ज्याचे अधिक आमदार त्याचाच मुख्यमंत्री याच मूडमध्ये शरद पवारही आले आहेत.

Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.