Uddhav thackrey : या पुढल्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू – उद्धव ठाकरे असं का म्हणाले ?

असं म्हणतात की भिंतीला कान असतात, पण लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू अशी मिश्कील टिपण्णी ठाकरे यांनी केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते देवेंद्र फडवणीस यांनी आज विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केला. त्यावर त्यांनी भाष्य केलं.

Uddhav thackrey :  या पुढल्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू - उद्धव ठाकरे असं का म्हणाले ?
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 1:50 PM

आजपासून विधानसभा अधिवेशनला सुरूवात झाली. पहिलाचा दिवस दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीमुळे गाजला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते देवेंद्र फडवणीस यांनी आज विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केला. त्यामुळे आजच्या अधिवशेनापेक्षा या दोन नेत्यांच्या भेटीचीच चर्चा जास्त रंगली. मात्र या भेटीतून कुठलेही अर्थ काढू नका, ती फक्त योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. असं म्हणतात की भिंतीला कान असतात, पण लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू अशी मिश्कील टिपण्णी ठाकरे यांनी केली. फडणवीस व आपल्यात कोणतीही राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.

पुणे ड्रग्स प्रकरणावर आवाज उठवणार

पुण्यातील ड्रग्स प्रकरणावर आम्ही आवाज उठवणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही त्यावर आवाज उठवणार आहे. पण सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे. सरकारला खेचायचं आहे. हे ड्रग्स येतात कुठून? राज्यातील केमिकल्सचे कारखाने हे सोर्स आहे का, उद्योगमंत्री काय करतात. उद्योगमंत्र्यांचे हे सोर्स आहे का या गोडाऊनचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे. ड्रग्स प्रकरणावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कुणाचेही सगे सोयरे असू द्या. विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून तुमच्या काळात जास्त ड्रग्स सापडले असे फालतू उत्तर नको. त्याच्या मुळाशी जा आणि खणून काढा. जे पोलीस अधिकारी कर्तव्यात कसूर करतात त्यांना निलंबित केलं पाहिजे. त्यांना सेवेतून मुक्त केलं पाहिजे, अशी मागणी उद्धव यांनी केली.

हा गाजर संकल्प आहे

विधानसभा अधिवेशनात उद्या अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. मात्र हा गाजर संकल्प आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्या गाजरं दाखवलं जाणार आहे. आजपर्यंत ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी किती झाली. त्याची श्वेतपत्रिका काढा. ही श्वेतपत्रिका कोरा कागद असणार आहे. याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ?

महायुतीत अपयशाच्या धन्याचा चेहरा पुढे येऊ द्या. एकमेकांवर आरोप करत आहेत. आम्ही विकास आघाडीचा चेहरा योग्यवेळी बाहेर आणू. महाविकास आघाडीचा चेहरा महाराष्ट्र आहे. मी वर्धापन दिनाच्या भाषणात म्हणालो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी. त्यांच्या अपयशाचा चेहरा नक्की कोण हे समोर येऊ दे. आमच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.