NCP Ministers Meet Sharad pawar | राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला, शिंदे सरकारमधील मंत्र्याची पहिली प्रतिक्रिया

NCP Ministers Meet Sharad pawar | सत्तेत सहभागी झालेल्या गटाने आज अचानक दुपारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

NCP Ministers Meet Sharad pawar | राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला, शिंदे सरकारमधील मंत्र्याची पहिली प्रतिक्रिया
ncp ministers to meet sharad pawar
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 2:39 PM

-चैतन्य गायकवाड

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तेत सहभागी झालेल्या गटाने आज अचानक दुपारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध रहावा, अशी विनंती केली. शरद पवार यांची त्यांचं सर्व म्हणण ऐकून घेतलं. पण कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ही माहिती दिली.

आज अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जमले होते. त्यांची बैठक सुरु होती. शरद पवार वाय.बी. सेंटर येथे असल्याच समजल्यानंतर हे सर्व आमदार आपणहून शरद पवार यांच्या भेटीला गेले.

एकनाश शिंदे गटातील मंत्र्याची काय प्रतिक्रिया?

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांच्या भेटीला आल्याचे समजल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांना भेटले, त्यावर आता एकनाश शिंदे गटातील एका मंत्र्याने प्रतिक्रिया दिली आहे.

‘आशीर्वाद द्यायचा की नाही, हे पवारांनी ठरवावे’

“मला याबाबत कल्पना नाही. मी प्रवासात होतो. जरी भेट घेतली असेल, तर ते सगळेच म्हणत आहेत की, आम्ही राष्ट्रवादी सोडलेली नाही. आमचे नेते पवार साहेब आहेत. ते राष्ट्रवादीचेच मंत्री आहेत. सरकारला आशीर्वाद द्यायचा की नाही, हे पवारांनी ठरवावे” असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. “हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पवार साहेब काय बोलतात, हे बघावं लागेल. काल अजित पवार यांनी सांगितलं की, शरद पवार यांचा फोटो दालनात लावलेला आहे. प्रतिभा काकू यांचं ऑपरेशन झालं. तशीच औपचारिक भेट असेल. यात राजकीय काही वाटत नाही” असं शंभूराजे देसाई म्हणाले.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.