Maharashtra Marathi Breaking News Live | दापचरी सीमा तपासणी नाक्यावर एक कोटी रुपयांचा मद्य साठा जप्त

| Updated on: Feb 02, 2024 | 7:09 AM

Maharashtra Breaking News in Marathi | आज 1 फेब्रुवारी 2024,अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4 टक्क्यांनी वाढली आहे. नव्या कररचनेत 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.

Maharashtra Marathi Breaking News Live | दापचरी सीमा तपासणी नाक्यावर एक कोटी रुपयांचा मद्य साठा जप्त

नवी दिल्ली, दि.1 फेब्रुवारी 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता त्या सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. हे अंतरिम बजेट असले तरी सीतारमण यांच्या पेटाऱ्यात काही तरी खास असेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांसाठी यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या 2.0 मधील या शेवटच्या अर्थसंकल्प आहे. त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. परंतु निवडणुकीमुळे लोकप्रिय घोषणा अर्थसंकल्पात असण्याची शक्यता निर्मला सीतारमण यांच्याकडून आहे. मध्यवर्गीयांना आयकरातील सुट वाढवण्याची अपेक्षा यंदा आहे. अर्थसंकल्पासंदर्भातील सर्व अपडेट वाचण्यासाठी दिवसभर फॉलो करा ब्लॉग.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Feb 2024 06:42 PM (IST)

    हिमाचल प्रदेशातील मनालीत अतिबर्फवृष्टी, वीज खंडीत, तर वाहतुकीवर परिणाम

  • 01 Feb 2024 06:30 PM (IST)

    राज्यपालांनी शपथविधीची वेळ सांगितली नाही : काँग्रेस आमदार

    राज्यपालांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते आणि आमदार आलमगीर म्हणाले की, राज्यपालांनी शपथविधीसाठी वेळ दिलेला नाही. यावर गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगितले. राजभवनकडून अधिकृत निमंत्रण मिळालेले नाही.

  • 01 Feb 2024 06:18 PM (IST)

    राज्यपालांनी अद्याप सरकार स्थापनेचे निमंत्रण दिलेले नाही: चंपाई सोरेन

    राज्यपालांनी उद्या सकाळी ८ वाजेपर्यंतची वेळ दिल्याचे चंपाई सोरेन यांनी म्हटले आहे. तसेच राज्यपालांनी अद्याप त्यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिलेले नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

  • 01 Feb 2024 05:36 PM (IST)

    उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, एक कोटी रुपयांचा मद्य साठा जप्त

    पालघर | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. एक ट्रक आणि आयशर टेम्पोमध्ये असलेला दमन बनावटीचा मद्य साठा केला आहे आहे. मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील आंबोली आणि मनोर नजीक उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने ट्रक आणि टेम्पो मधून जवळपास १ कोटी किंमतीची बियर, विदेशी मद्य यांच्या जवळपास 700 मद्य पेट्या हस्तगत केल्या.

  • 01 Feb 2024 05:13 PM (IST)

    पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने महिला आक्रमक

    गोंदिया | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा काढण्यात आला. मागील काही दिवसांनी पाणी येत नसल्यामुळे महिलांनी हा धडक मोर्चा काढला. मागील अनेक दिवसांपासून गढुळ पाणी येत असल्याची तक्रारही महिलांनी या वेळेस बोलून दाखवली. तसेच एक महिन्यात समस्या मार्गी न लागल्यास कार्यालयात धरणे आंदोलन करु, असा इशाराही या महिलांनी दिला.

  • 01 Feb 2024 05:00 PM (IST)

    समता परिषदेचे जोडो मारो आंदोलन

    समता परिषदेकडून बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोडे मारो आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. छगन भुजबळ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर हे आंदोलन करण्यात आले.

  • 01 Feb 2024 04:51 PM (IST)

    काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

    गडचिरोलीमधील सिरोंचा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदभरतीत घोटाळा झाल्यामुळे काँग्रेस पक्षाने ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळातील निकटवर्ती व नातेवाईकांची वर्णी लावल्याचा आरोप पक्षाने केला आहे. संचालक मंडळावर कारवाई होऊन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 01 Feb 2024 04:41 PM (IST)

    गोंदियात महिला आक्रमक

    गोंदियात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा पोहचला. मागील काही दिवसांनी पाणी येत नसल्यामुळे महिलांनी धडक मोर्चा काढला. मागील अनेक दिवसापासून नळा द्वारे गढूळ पाणी पण येत असल्याने महिला आक्रमक झाल्या.एक महिन्यात समस्या मार्गी न लागल्यास कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

  • 01 Feb 2024 04:35 PM (IST)

    आरोपी गणेश मारणेला 8 दिवसांची कोठडी

    शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला 8 दिवसांची कोठडी सुनावली. आरोपी गणेश मारणेला 9 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गणेश मारणे हा मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असून गेल्या अनेक दिवसापासून तो फरार होता. काल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे नाशिक रोड वरून गणेश मारलेला अटक केली होती.

  • 01 Feb 2024 04:21 PM (IST)

    बुलेटवर बसून जरांगे अंतरवाली सराटीकडे

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत दाखल होणार आहे. जरांगे बुलेटवर बसून सराटीकडे निघाले आहे. त्यांच्या बुलेट बाईक रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • 01 Feb 2024 04:10 PM (IST)

    थेट रस्त्यावर रक्तदान

    सांगली जिल्ह्यातील जतमधील दुष्काळग्रस्तांनी रस्त्यावरच रक्तदान आंदोलन केले. रक्त घ्या,पाणी द्या,अशी मागणी घेऊन दुष्काळग्रस्तांनी थेट विजापूर – पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरच रक्तदान आंदोलन केला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावच्या दुष्काळग्रस्तांनी बालगाव येथे रस्ता रोको करत रक्तदान केले आहे. जत तालुक्यातल्या 65 गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे, ऐन हिवाळ्यामध्ये जत तालुक्यात पाण्याची तीव्रत टंचाई निर्माण झाली आहे,त्यामुळे शेतीच्या,जनावरांचा आणि नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

  • 01 Feb 2024 04:00 PM (IST)

    राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

    राज्यसभेच्या राज्यातील 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 28 फेब्रुवारीला मतदान होईल. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळं भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर येण्याचा मार्ग मोकळा होईल.

  • 01 Feb 2024 04:00 PM (IST)

    रोटी, कपडा, मकान देणारा अर्थसंकल्प, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

    मुंबई : रोटी, कपडा, मकान देणारा असा हा मोदी सरकार आणि आजचा अर्थ संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज स्किल डेव्हलपमेंट स्टाटप केलं. मुलींना सर्वाकल कॅन्सरवर योजना आणली. आशा वर्कर योजना आणली. कोणती दरवाढ, करवाढ न करता पायाभूत सुविधांसाठी ११ हजार कोटी बजेटमध्ये आहे. हा सर्व समावेशक अर्थसंकल्प असून विकसित भारत या ध्येयाकडे वाटचाल करणारा हा अर्थसंकसल्प आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

  • 01 Feb 2024 03:58 PM (IST)

    ग्राम पंचायतींचा १३२ कोटींचा निधी पडून, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी करणार चौकशी

    लातूर : लातूर जिल्ह्यातल्या ग्राम पंचायतींना पायाभूत सुविधांसाठी देण्यात आलेला १३२ कोटींचा निधी खर्चाविना पडून आहे. केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या ग्राम पंचायतींना ३६६ कोटी १९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यापैकी १३२ कोटी रुपयांचा निधी अद्यापही खर्चाविना पडून आहे. त्यामुळे आता खर्चात कामचुकारपणा करणाऱ्या ग्राम पंचायतीची जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी चौकशी करणार आहेत.

  • 01 Feb 2024 03:13 PM (IST)

    शिक्षकांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, सरकारशी बोलून मार्ग काढावा

    जालना : राज्यातील खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांना वाढीव अनुदान मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे शेकडो शिक्षकांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याबाबत जरांगे पाटील यांनी सरकारशी बोलून मार्ग काढावा अशी मागणी यावेळी शिक्षकांनी केली.

  • 01 Feb 2024 03:06 PM (IST)

    हरलेल्या डावाचा ते जयजयकार करतील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

    संगमनेर : आजच्या अर्थ संकल्पामुळे नागरिक समाधानी झाले असतील असे वाटत नाही. शेअर बाजारात कोणताही उत्साह दिसून आला नाही. शेतकऱ्यांसाठी केले हा फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वाढलेल्या महागाईवर कोणत्याच उपाययोजना दिसून आल्या नाही. हरलेल्या डावाचा ते जयजयकार करतील. मात्र, ते डाव हरलेले आहेत आणि होणारा जयजयकार खरा नसेल अशी टीका कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

  • 01 Feb 2024 02:44 PM (IST)

    पुण्यात गावठी पिस्टलचा धाक दाखवत सराफा व्यवसायिकास लुटण्याचा प्रयत्न

    पुणे : गावठी पिस्टलचा धाक दाखवत सराफा व्यवसायिकास लुटण्याचा प्रयत्न. पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या. शिरूर शहरातील सराफा व्यवसायिकाला लुटण्याचा केला होता प्रयत्न. शिरूर बाजारपेठेत असणाऱ्या कोलथे सराफ दुकानात 28 तारखेला सायंकाळी दरोडा घालण्याचा केला होता प्रयत्न. शरद बन्सी मल्हाव, सागर उर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर असे आरोपींची नावे. आरोपींवर या अगोदर बेकायदेशीर शस्त्र बाळगण्या प्रकरणी विविध सात गुन्हे दाखल आहेत.

  • 01 Feb 2024 02:36 PM (IST)

    खोदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प – काकासाहेब कुलकर्णी

    नवी दिल्ली : आजचा अर्थसंकल्प हा निराशा जनक होता. व्यावसायिकांना सवलती दिल्या गेल्या नाहीत. महागाई आणि त्याबाबत काही उपाययोजना या अर्थसंकल्पातून झाल्या नाहीत. खोदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे. अशी टीका काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे.

  • 01 Feb 2024 02:21 PM (IST)

    महाविकास आघाडीत आल्यास छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी – सूत्र

    महाविकास आघाडीत आल्यास संभाजीराजेंना उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील तीन पैकी का पक्षात प्रवेश केल्यास उमेदवारी निश्चित मानली जात आहे. छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या पक्षात संभाजीराजेंनी प्रवेश केल्यास लोकसभेला उमेदवारी दिली जाणार आहे. अशी सूत्रांची माहिती आहे.

  • 01 Feb 2024 02:19 PM (IST)

    मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांची थेट पोलीस महासंचालकाकडे तक्रार

    छगन भुजबळ यांची थेट पोलीस महासंचालकाकडे तक्रार. छगन भुजबळ अशांतता पसरवत आहेत. मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या महेश डोंगरे यांनी समन्वयकांसह रश्मी शुक्ला यांच्याकडे ही तक्रार केली आहे.

  • 01 Feb 2024 02:00 PM (IST)

    रोहित पवार यांच्या ईडी चौकशीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

    संभाजीनगर- रोहित पवार यांच्या ईडी चौकशीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

  • 01 Feb 2024 01:50 PM (IST)

    देशवासियांना फसविणारा अर्थसंकल्प आज सादर झाला- विनायक राऊत

    “देशवासियांना फसविणारा अर्थसंकल्प आज सादर झाला आहे. खूप काही मिळेल अशी भाबडी आशा होती. मात्र निराशा झाली. शेतकऱ्यांच्या MSP चाही उल्लेख कुठे झाला नाही. केवळ योजनांचं वाचन या अर्थसंकल्पात केलं गेलं. शेतकरी, व्यापारी, नोकरदार यांना काहीही या अर्थसंकल्पात दिलं नाही. कॉर्पोरेटला भरभरून देण्याचं काम अर्थसंकल्पात केलं गेलंय. केंद्राचं तिप्पट कलेक्शन असताना देखील काही मिळालं नाही,” अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली.

  • 01 Feb 2024 01:40 PM (IST)

    साखरेवरील अनुदानाला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ

    साखरेवरील अनुदानाला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत साखरेवरील १८.५० रुपये प्रतिकीलो अनुदान दिले जाते. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 01 Feb 2024 01:30 PM (IST)

    हा अर्थसंकल्प गरीबांना आणखी ताकद देणार- नरेंद्र मोदी

    “अर्थसंकल्पातून विकासित भारताची गॅरंटी देण्यात आली आहे. हा देशाच्या भविष्याचा अर्थसंकल्प आहे. रेल्वेचा प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. हा अर्थसंकल्प गरीबांना आणखी ताकद देणार. या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात  आले आहेत,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 01 Feb 2024 01:20 PM (IST)

    रोहित पवार चौकशीसाठी दुसऱ्यांदा ईडीसमोर हजर

    रोहित पवार चौकशीसाठी दुसऱ्यांदा ईडीसमोर हजर झाले आहेत. मी काहीच चुकीचं केलं नाही. माझ्यावर अन्याय होतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

  • 01 Feb 2024 01:10 PM (IST)

    हा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे

    निर्मला सीतारमण यांनी अखेरचा अर्थसंकल्प सादर केला. 2014 मध्ये चाय-पे-चर्चा झाली, मात्र आता चहा आणि साखर सगळंच महाग झालं आहे. जनतेला चिरडणं म्हणजे यांचा विकास आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.

  • 01 Feb 2024 12:47 PM (IST)

    Budget 2024 : हे तर जुनचं बजेट, खरं बजेट तर जुलैमध्ये येईल – फारूख अब्दुल्ला

    खरं बजेट तर जुलैमध्ये येईल. हे तर जुनंच बजेट आहे. जुलैमधील बजेटमधून लोकांना खरा फायदा होईल अशी आशा आहे.

  • 01 Feb 2024 12:39 PM (IST)

    Budget 2024 : इतिहासातील सर्वात कमी वेळेचं भाषण – शशी थरूर

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं आजं भाषण हे सर्वात कमी वेळचं अर्थसंकल्पीय भाषण होतं. बजेटमधून फारसं काही मिळालेलं नाही, अशी टीका शशी थरूर यांनी केली.

  • 01 Feb 2024 12:17 PM (IST)

    Budget Session 2024 | पायाभूत सुविधांवर 11 टक्के अधिक खर्च करणार -निर्मला सीतारमण

    सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-वाहने उपलब्ध करून दिली जातील. रेल्वे-सागरी मार्ग जोडण्यावरही भर दिला जाणार आहे. पर्यटन केंद्रांच्या विकासाला गती देणार. पर्यटन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल. 75 हजार कोटी रुपयांचे कर्ज बिनव्याजी देण्यात आले. पायाभूत सुविधांवर 11 टक्के अधिक खर्च केला जाईल.

  • 01 Feb 2024 12:10 PM (IST)

    Budget Session 2024 | 10 वर्षांत करसंकलन तीन पटीने वाढलं – निर्मला सीतारमण

    वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षांत आयकर संकलन तीन पटीने वाढलं .

  • 01 Feb 2024 12:07 PM (IST)

    Budget Session 2024 | प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल नाही – निर्मला सीतारमण

    प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल नाही – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा.

  • 01 Feb 2024 12:06 PM (IST)

    Budget Session 2024 | जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करू – निर्मला सीतारमण

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तासाभरात अंतरिम अर्थसंकल्पाचं भाषण पूर्ण केलं. जुलै महिन्यात आमचं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, असे त्यांनी नमूद केले.

    वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. या अर्थसंकल्पात कररचनेत कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत.

  • 01 Feb 2024 12:00 PM (IST)

    Budget Session 2024 | सामान्यांसाठी मोठी बातमी, आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही – निर्मला सीतारमण

    आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही . इन्कम टॅक्स मागील वर्षीप्रमाणेच राहणार आहे. यंदा प्रत्यक्ष करात कुठलाही बदल नाही.

  • 01 Feb 2024 11:53 AM (IST)

    Budget Session 2024 | वार्षिक 7 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही – निर्मला सीतारमण

    रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4 टक्क्यांनी वाढली आहे. करदात्यांच्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानते. नव्या कररचनेत 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.

  • 01 Feb 2024 11:51 AM (IST)

    Budget Session 2024 | 40 हजार रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील – निर्मला सीतारमण

    गेल्या 4 वर्षात आर्थिक विकासाला वेग. युवाशक्ती तंत्रज्ञान योजना बनवेल. तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. पॅसेंजर रेल्वे गाड्यांचे कामकाज सुधारण्यात येईल. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार आहे. 40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील.

  • 01 Feb 2024 11:48 AM (IST)

    Budget Session 2024 | विमानतळांच्या संख्येत दुपटीने वाढ होणार – निर्मला सीतारमण

    देशभरात आज 149 विमानतळ कार्यरत आहेत. 517 नवीन विमान मार्ग प्रस्तावित केले आहेत.

  • 01 Feb 2024 11:44 AM (IST)

    Budget Session 2024 | अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा

    देशात नव्या मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात येणार.

    9 ते 14 वर्षांच्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी लस दिली जाणार.

    प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील.

    1 कोटी घरांना सौरउर्जा देण्याचं ध्येय

  • 01 Feb 2024 11:39 AM (IST)

    Budget Session 2024 | पुढील पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची असतील – निर्मला सीतारमण

    देशाची पुढील पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची वर्षे असतील, अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

  • 01 Feb 2024 11:37 AM (IST)

    Budget Session 2024 | 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत – निर्मला सीतारमण

    1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत. त्या अन्य महिलांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत. लखपती दीदीचे लक्ष्य 2 कोटींवरून वाढवून 3 कोटी करण्यात आले आहे.

  • 01 Feb 2024 11:35 AM (IST)

    Budget Session 2024 | किसान संपदा योजनेतून 38 लाख शेतकऱ्यांना लाभ – निर्मला सीतारमण

    दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी योजना सुरू करणार. किसान संपदा योजनेतून 38 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

  • 01 Feb 2024 11:33 AM (IST)

    Budget Session 2024 | पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार – निर्मला सीतारमण

    देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. आमच्या सरकारचे पारदर्शक कारभारावर लक्ष आहे. येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार.

  • 01 Feb 2024 11:32 AM (IST)

    Budget Session 2024 | देशभरात 390 कृषी विद्यापीठं सरकारने सुरू केली – निर्मला सीतारमण

    देशभरात 390 कृषी विद्यापीठं सरकारने सुरू केली. 7 आयआयटी, 7 आयआयएम सरकारनं सुरू केली.

  • 01 Feb 2024 11:30 AM (IST)

    Budget Session 2024 | जीएसटी प्रणालीमुळे ‘एक देश, एक बाजार ‘ संकल्पना यशस्वी – निर्मला सीतारमण

    जीएसटी प्रणालीमुळे ‘एक देश, एक बाजार ‘ संकल्पना यशस्वी झाली. देशभरात 390 नवी विद्यापीठ, नवे 3 हजार ITI सुरू केले.

  • 01 Feb 2024 11:27 AM (IST)

    Budget Session 2024 | गरीब महिला, तरूण आणि शेतकऱ्यांवर आमचे लक्ष – निर्मला सीतारमण

    गरीब महिला, तरूण आणि शेतकऱ्यांवर आमचे लक्ष आहे. त्यांच्या गरजा, आकांक्षा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

  • 01 Feb 2024 11:21 AM (IST)

    Budget Session 2024 | महिला सशक्तीकरणावर सरकारचा भर – निर्मला सीतारमण

    सकल विकासाकडे सरकारच लक्ष आहे. महिला सशक्तीकरणावर सरकारचा भर . गेल्या 10 वर्षांत महिला उच्च शिक्षण घेत आहेत. पीएम आवास योजने अंतर्गत 70 टक्के घर ग्रामीण महिलांना.

  • 01 Feb 2024 11:19 AM (IST)

    Budget Session 2024 | युवांना सशक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू – निर्मला सीतारमण

    युवांना सशक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू. 3 लाख कोटींचा व्यापार शेती क्षेत्रातून होत आहे.

  • 01 Feb 2024 11:14 AM (IST)

    Budget Session 2024 | पंतप्रधान स्वनिधी योजनेचा अनेक लोकांना लाभ मिळाला – निर्मला सीतारमण

    पंतप्रधान स्वनिधी योजनेचा अनेक लोकांना लाभ मिळाला . 25 कोटी लोकांसाठी विविध योजना राबवल्या. पीएम किसान योजनेचा 11 शेतकऱ्यांना फायदा. 80 कोटी लोकांना मोफत धान्यवाटप

  • 01 Feb 2024 11:10 AM (IST)

    Budget Session 2024 | 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल – निर्मला सीतारमण

    विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली. 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल. गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काम करतंय.

  • 01 Feb 2024 11:06 AM (IST)

    Budget Session 2024 | सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र – निर्मला सीतारमण

    गेल्या 10 वर्षांत देशाचा सकारात्मक विकास. सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र. आमच्या सरकाराने व्यापक विकासाची कामं केली.

  • 01 Feb 2024 11:04 AM (IST)

    Budget Session 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्पाचं वाचन सुरू

    अंतरिम बजेटला सुरूवात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 2024 – 2025 अर्थसंकल्पाचं वाचन सुरू.

  • 01 Feb 2024 11:02 AM (IST)

    Budget Session 2024 | अंतरिम बजेट देशासाठी चांगलं असेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    अंतरिम बजेट देशासाठी चांगलं असेल , कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया.

    थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील.

  • 01 Feb 2024 10:50 AM (IST)

    Budget Session 2024 | केंद्रीय मंत्रीमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पावर औपचारिक चर्चा झाली. केंद्रीय मंत्रीमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली.

  • 01 Feb 2024 10:29 AM (IST)

    Budget Session 2024 | केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक सुरू, अर्थसंकल्पाला मिळणार मंजुरी

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.

  • 01 Feb 2024 10:14 AM (IST)

    Budget Session 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल

    देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या देशाचा अर्थसंकल्प मांडतील.

  • 01 Feb 2024 09:55 AM (IST)

    Budget Session 2024 | देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर होणार

    देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर होणार आहे. हे वर्ष निवडणुकीचे असल्याने सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार नाही. पण, निवडणुकीच्या वर्षांत सरकार मोठ्या घोषणा करू शकते.

  • 01 Feb 2024 08:50 AM (IST)

    Budget Session 2024 | बजेटमध्ये रेल्वेला काय मिळणार?

    आज बजेटमध्ये रेल्वे संदर्भात काही मोठ्या घोषणा होऊ शकतात. 2024 मध्ये रेल्वेसाठी जास्त निधीची तरतूद केली जाऊ शकते. 2024-25 मध्ये रेल्वे बजेट 3 लाख कोटीच्या पुढे जाऊ शकतो.

  • 01 Feb 2024 08:30 AM (IST)

    Budget Session 2024 | इलेक्ट्रिक व्हेइलकलबद्दल होणार महत्त्वाची घोषणा

    बजेटमध्ये आज इलेक्ट्रिक व्हेइलकलबद्दल महत्त्वाची घोषणा होऊ शकते. 12500 कोटी रुपयांची तरतूद आहे. यात सर्व इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्या आहेत. इलेक्ट्रिक व्हेइकल आणि हायब्रिड गाड्यांसाठी सब्सिडी कायम राहिलं.

  • 01 Feb 2024 08:09 AM (IST)

    Budget Session 2024 | निर्मला सीतारमण किती वाजता आपल्या निवासस्थानातून निघणार?

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या निवासस्थानाहून 8.15 वाजता निघतील. अर्थ मंत्रालयात पोहोचून त्या आपल्या बजेट टीमला भेटतील. 8.50 वाजता मंत्रालयाच्या गेट नंबर 2 वर फोटो ऑप असेल. तिथून त्या राष्ट्रपती भवनात जातील. 9.30 वाजता संसदेत पोहोचतील.

  • 01 Feb 2024 07:55 AM (IST)

    Budget Session 2024 | शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा

    भाजपने तीन राज्यांत नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा होऊ शकते.

  • 01 Feb 2024 07:44 AM (IST)

    Budget Session 2024 | जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प

    अंतरिम अर्थसंकल्प एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी असणार आहे. केंद्र सरकारच्या आवश्यक खर्चाची पूर्तता करण्यासाठी संसदेची मंजुरी या अंतरिम अर्थसंकल्पात घेण्यात येणार आहे. एप्रिल/मे मध्ये सार्वत्रिक निवडणुकांनंतर निवडून आलेले नवीन सरकार जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे.

  • 01 Feb 2024 07:32 AM (IST)

    Budget Session 2024 | सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत सकाळी ११ वाजता तर केंद्रीय अर्खराज्यमंत्री डॉ. भागवत कराड राज्यसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे.

  • 01 Feb 2024 07:20 AM (IST)

    Budget Session 2024 | आज अर्थसंकल्प, शेतकऱ्यांसाठी काय असणार

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या मोदी सरकारचा यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा अंतिम अर्थसंकल्प आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळेच अन्नदाता शेतकरी, महिला, तरुण, गरीबांना, व्यापारी यांना डोळ्यांसमोर ठेऊन हा अर्थसंकल्प असणार आहे.

Published On - Feb 01,2024 7:24 AM

Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.