Narayan Rane| मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का; नारायण राणे यांनी खोचक टोल्यातून डिवचले!

मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का, असा खोचक टोला सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करून राणे यांनी राजकीय राळ उठवून दिली होती.

Narayan Rane| मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का; नारायण राणे यांनी खोचक टोल्यातून डिवचले!
मिलिंद नार्वेकर
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 12:19 PM

पुणेः मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का, असा खोचक टोला सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करून राणे यांनी राजकीय राळ उठवून दिली होती. त्यानंतर काही काळ सौम्य झालेले राणे आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक होत असलेले पाहायला मिळतायत.

नेमके  प्रकरण काय?

आजच्याच दिवशी 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत 16 व्या शतकात बांधण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यानंतर देशभर दंगली उसळल्या. त्यात जवळपास दोन हजार लोक मारले गेले. हा इतिहास सर्वांना माहितच आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल, तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले. स्वतः शिवसेना आज महाविकास आघाडीत असली तरी कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार आजवर करत आली आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी आज सकाळी एक ट्वीट केले आहे.

नार्वेकरांचे ट्वीट असे…

मिलिंद नार्वेकर यांनी आज 6 डिसेंबरचे निमित्त साधून एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत बाबरी मशीद पाडण्यासाठी जमाव मशिदीवर चढत असल्याचे दिसते आहे. शिवाय त्या फोटोवर एक ओळ लिहिलेली आहे. त्यात असे म्हटले आहे की, अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन…या ट्वीट संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अतिशय खोचक शब्दांत टोलेबाजी केली. मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

राणे का खोचक बोलले?

सध्या शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. दोन्ही पक्षांत विस्तू आडवा जात नाही. त्यात नारायण राणे आणि शिवसेनेचे जास्तच फाटले आहे. विशेषतः राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इतरांच्या सांगण्यावरून आपले मत बनवतात असा आरोप आहे. यापूर्वी त्यांनी ही खदखद अनेकदा व्यक्त केली आहे. हे इतरांच्या सांगण्यावरून म्हणजे यातील एक जण मिलिंद नार्वेकर. शिवाय हिंदुत्त्व हा भाजपचा सध्याचा अजेंड्यावरचा मुद्दा. त्यामुळे कोणाचे हिंदुत्व जास्त कडवे यावरून अनेकदा भाजप-शिवसेनेते जुंपते. हे सारे ध्यानात घेता नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकरांना आणि शिवसेनाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

इतर बातम्याः

Special News| डॉ. आंबेडकरांचा काळाराम मंदिर सत्याग्रह, येवल्यातली धर्मांतर घोषणा अन् अशी झाली रक्तहीन क्रांती!

Dr. Ambedkar: महामानवाच्या अस्थी मराठवाड्यात फक्त एकाच ठिकाणी, औरंगाबादच्या भाऊसाहेब मोरे कुटुंबियांकडे लाखमोलाचा वारसा!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.