महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, रोहित पवार यांच्याकडे पोहोचल्या निनावी फाईल्स, घोटाळ्यांची मालिका उघड होणार?

आपल्याला एका निनावी व्यक्तीने फाईल्स पाठवल्या आहेत. त्या फाईल्समध्ये सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घोटाळ्यांची सविस्तर माहिती असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. आपण त्याबाबत टप्प्याटप्प्याने गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, रोहित पवार यांच्याकडे पोहोचल्या निनावी फाईल्स, घोटाळ्यांची मालिका उघड होणार?
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 5:54 PM

मुंबई | 10 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे रोहित पवारांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. रोहित पवारांनी या कारवाईनंतर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना काय-काय प्रक्रिया पार पडली होती या विषय विस्तृत माहिती दिली. यावेळी त्यांनी क्लोजर रिपोर्टही दाखवला. पण राजकीय सूडापोटी आपल्यावर ही कारवाई केली जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. रोहित पवार यांनी यावेळी एक मोठा दावा केला. आपल्याला एका निनावी व्यक्तीने फाईल्स पाठवल्या आहेत. त्या फाईल्समध्ये सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घोटाळ्यांची सविस्तर माहिती असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. आपण त्याबाबत टप्प्याटप्प्याने गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. विशेष म्हणजे लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“ज्या दिवसापासून मी लढायला लागलो आहे त्यानंतर निनावी व्यक्तीने मला काही फाईल पाठवल्या आहेत. तपास यंत्रणेच्या माध्यमातून फाईल गोळ्या केल्या आहेत. दोन भाजपचे नेते आहेत. 2 ओबीसी नेते आहेत. एक न एक फाईल माझ्याकडे आल्या आहेत. एकाच पत्त्यावर 30-40 कंपन्या आहेत. त्यांच्या फाईल आल्या आहेत”, असा खुलासा रोहित पवारांनी केला.

रोहित पवार फाईलबद्दल नेमकं काय म्हणाले?

“मी सत्ताधाऱ्यांविरोधात लढत असताना माझ्याकडे निनावी फाईल आली आहे. अनेक नेत्यांच्या फाईल माझ्या ऑफिसमध्ये आल्या आहेत. ठाणे-मुंबईतल्या आरक्षित जागा बिल्डरला विकल्याची फाईलही माझ्या ऑफिसला आली आहे. तसेच मुंबई मनपातल्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्या ऑफिसला आली आहे. एवढी सगळी माहिती असलेल्या फाईल अचानक माझ्या ऑफिसला आल्या कशा? मी माझ्या काही तज्ज्ञांना त्या फाईली अभ्यास करायला दिल्या आहेत. मी ज्या व्यक्तीने या फायली पाठवल्या आहेत. त्यांचे मी आभार मानतो. रुग्णवाहिकेचा मोठा घोटाळा झाला आहे. मी या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने उघड करणार आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

मुख्य बातमी : ‘ईडीच्या प्रेसनोटमध्ये खूप मोठ्या चुका’, रोहित पवार यांची गौप्यस्फोटांची पत्रकार परिषद, संपूर्ण इतिहासच सांगितला

‘मुद्दाम वेगळं राजकारण केलं जातंय का?’

“निवडणूक असते तेव्हा तुम्ही नोटीस पाठवता. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. मला 19 जानेवारी 2024 ला रिपोर्ट आला आणि मला 20 जानेवारी 2024 ला नोटीस दिली. याचा अर्थ बाकीच्यांना क्लीनचीट द्यायची आणि मी संघर्ष करतोय म्हणून माझ्यावर कारवाई केली जाते. कुठल्याही एफआयआरमध्ये माझं आणि बारामती अॅग्रोचं नाव नाही. तरीसुद्धा माझं नाव घेतलं जात आहे. क्लोजर रिपोर्टमध्ये तसं काहीही लिहिलेलं नाही. बारामती अॅग्रो आणि कन्नड कारखान्यात काहीही चुकीचं घडलेलं नाही, असं स्पष्ट क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिलेलं असताना मुद्दाम वेगळं राजकारण केलं जातंय का?”, असा सवाल रोहित पवारांनी केलाय.

“मी निवडणूक काळात शांत बसावं म्हणून ही नोटीस दिली जातेय का? केंद्राला राज्याच्या पोलिसांवर विश्वास नाही असं प्रत्यक्षपणे सांगायचं आहे का? बारामती अॅग्रो कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मी ईडीला सहकार्य करतोय. जे मागितलं ते सर्व दिलं आहे. त्यानंतर आता अचानक लोकसभेची आचारसंहिता लागण्याआधी ते अशाप्रकारे कारवाई करत असतील तर याला आपण काय म्हणायचं?” असा प्रश्न रोहित पवरांनी उपस्थित केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.