फ्रान्समध्ये शिवरायांची अप्रकाशित बखर सापडली, ऐतिहासिक बखरीत काय आहेत रहस्यं ?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ही पुरातन बखर सापलेली आहे. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द लिहीलेली आहेच शिवाय शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसांतील घडामोडींवर प्रकाश पडणार आहे.. शिवाजी महाराज आणि आणि त्यांच्या पत्नी सईबाई यांच्यातील काळ या बखरीत नोंदविलेला आहे.

फ्रान्समध्ये शिवरायांची अप्रकाशित बखर सापडली, ऐतिहासिक बखरीत काय आहेत रहस्यं ?
bakhar of Chhatrapati Shivaji Maharaj
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 2:01 PM

एकीकडे राज्य सरकारने लंडनच्या म्युझियममधून वाघनंख आणणार असतानाच आता आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील जुनी अप्रकाशित बखर मिळाली आहे. ही बखर मोडी लिपित लिहीलेले हस्तलिखित सापडले असून यात शिवरायांची संपूर्ण कारकीर्दीतील घटनांची नोंद आहेच शिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीचाही लेखाजोखा आलेला आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स येथे काही संदर्भ तपासत असताना पुण्याचे इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांना ही बखर सापडल्याचे म्हटले जात आहे.

ही पुरातन बखर मोडी लिपीत लिहीलेली आहे. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द लिहीलेली आहेच शिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीची सुरुवातीचा काळ आला आहे. शिवाजी महाराज आणि आणि त्यांच्या पत्नी सईबाई यांच्यातील संवाद देखील या बखरीत नोंदविलेला आहे. अफझल खानाचा वध झाला तेव्हा त्यावेळ शिवाजी महाराजांच्या सोबतीला कोण-कोण होतं याचा उल्लेखही या बखरीत आहे. साधू संताची महाराजांनी घेतलेली भेट यात लिहीलेली आहे. वसईवर स्वारी करणाऱ्या चिमाजी आप्पा यांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजे साल 1740 मध्ये ही बखर लिहीलेली असावी असा अभ्यासकाचा दावा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आतापर्यंत सापडलेल्या 91 कलमी बखरींचा यात ओझरता इतिहास देखील आहे. बखरीच्या अखेरच्या भागात किताबत राजश्री राघव मुकुंद यांसी असा या बखरीत उल्लेख केलेला आहे. ही बखर एकूण 83 पानांची आहे.

पुस्तक येणार

राज्य सरकारने अलिकडे लंडनच्या म्युझियममधून शिवरायांची ‘वाघनंख आणण्याची घोषणा केली होती. आता शिवाजी महाराजांची अप्रकाशित बखर फ्रान्समध्ये म्युजियममध्ये संशोधकांना सापडली आहे. त्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. ही बखर चिमाजी आप्पा यांच्या कालखंडात लिहीलेली आहे. ही बखर मोडी लिपित लिहीलेली आहे. 83 पानांच्या या बखरीला पुस्तक स्वरुपात प्रकाशित केले जाणार आहे. शिवरायांची संपूर्ण कारकीर्दीतील घटनांची नोंद आहेच शिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या कालंखंडाचा उल्लेख आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स येथे काही संदर्भ तपासत असताना पुण्याचे इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांना ही बखर सापडली आहे. मोडी अभ्यासकांनी या बखरीचा अभ्यास करुन शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसातील काही नोंदी सापडतात का ? याची अभ्यासकांना उत्सुकता लागली आहे.

Non Stop LIVE Update
रत्नागिरीत तुफान पाऊस, हवामान खात्यानं कोकणाला काय दिला अलर्ट?
रत्नागिरीत तुफान पाऊस, हवामान खात्यानं कोकणाला काय दिला अलर्ट?.
हस्तांदोलन अन् हास्य विनोद... विधान भवनात अचानक भेट?; भेटीत दडलंय काय?
हस्तांदोलन अन् हास्य विनोद... विधान भवनात अचानक भेट?; भेटीत दडलंय काय?.
फडणवीसांसोबतच्या प्रवासानंतर ठाकरे म्हणाले, पुढील चर्चा लिफ्टमध्येच...
फडणवीसांसोबतच्या प्रवासानंतर ठाकरे म्हणाले, पुढील चर्चा लिफ्टमध्येच....
फडणवीस-ठाकरे एकत्र अन् 'हा' भाजप नेता दिसताच म्हणाले, याला बाहेर काढा
फडणवीस-ठाकरे एकत्र अन् 'हा' भाजप नेता दिसताच म्हणाले, याला बाहेर काढा.
VIDEO फडणवीस-ठाकरेंचा पुन्हा एकत्र प्रवास, लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं?
VIDEO फडणवीस-ठाकरेंचा पुन्हा एकत्र प्रवास, लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं?.
मोठी बातमी… राज्यात पावसाचा जोर कायम, काय म्हणतंय हवामान खातं?
मोठी बातमी… राज्यात पावसाचा जोर कायम, काय म्हणतंय हवामान खातं?.
'लालपरी'चे कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार, या मागणीसाठी उतरणार रस्त्यावर
'लालपरी'चे कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार, या मागणीसाठी उतरणार रस्त्यावर.
लाज वाटते, लोकमधून जनावरांसारखा प्रवास; हायकोर्टाकडून रेल्वेचे वाभाडे
लाज वाटते, लोकमधून जनावरांसारखा प्रवास; हायकोर्टाकडून रेल्वेचे वाभाडे.
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुन्हा 30 दिवस मेगाब्लॉक पण कधी, कुठे?
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुन्हा 30 दिवस मेगाब्लॉक पण कधी, कुठे?.
मोदींना आता विदेश पर्यटन करता येणार नाही कारण.., सामनातून काय निशाणा?
मोदींना आता विदेश पर्यटन करता येणार नाही कारण.., सामनातून काय निशाणा?.