राज्याला अवकाळीचा तडाखा ; पुणे, नाशिक, धुळ्यात जोरदार हजेरी
एकीकडे कोरोना महामारीने संसाराची घडी विस्कटली आहे, त्यात निसर्ग अवकृपा दाखवत असल्यामुळे आम्ही आता जगायचे कसा, असा प्रश्न राज्यातील बळीराजाकडून उपस्थित केला जात आहे. (Unseasonal rain hit in the state; Strong attendance in Pune, Nashik, Dhule)
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने मुक्काम ठोकला आहे. आजही बऱ्याच भागांमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांची चिंता वाढवली. अनेक ठिकाणी सोसायट्याच्या वाऱ्याने शेतातील उभी पिके जमिनदोस्त केली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. धुळे, नाशिक, पुणे जिल्ह्यात अवकाळीचा मोठा तडाखा बसला. अनेक ठिकाणी घरांची कौले उडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एकीकडे कोरोना महामारीने संसाराची घडी विस्कटली आहे, त्यात निसर्ग अवकृपा दाखवत असल्यामुळे आम्ही आता जगायचे कसा, असा प्रश्न राज्यातील बळीराजाकडून उपस्थित केला जात आहे. (Unseasonal rain hit in the state; Strong attendance in Pune, Nashik, Dhule)
पुणे शहरात गारांचा पाऊस, ग्रामीण भागातही जोरदार हजेरी
पुणे शहरात आज गारांचा पाऊस कोसळला. गेले काही दिवस वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या पुणेकरांना या पावसाने उकाड्यापासून मोठा दिलासा दिला. शहरातील नागरिकांनी हा पाऊस एन्जॉय केला. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील पावसाने बळीराजांची धांदल उडवली. पावसाने शेतीकामाचा खोळंबा केला, तर पिकांचेही नुकसान केले. शहरात अनेक भागांत सकाळीच पावसाने सुरुवात केली होती. कात्रज, कोंढवा, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. शहरात पुढील पाच दिवस अधूनमधून पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. तसेच अवकाळीचा तडाखा शेतीचे बरेच नुकसान करू शकतो. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, असाही इशारा हवामान खात्याने दिला आहे.
धुळ्यात पोलिसांचा तंबू उडाला
अवकाळी पावसाने धुळेकरांचीही तारांबळ उडवली. यातून पोलिसांचीही सुटका झाली नाही. लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांची पावसामुळे पळापळ झाली. अधूनमधून वादळीवारा सुटला होता. त्यात धुळे पोलिसांचा तंबू उडाला. तसेच रस्त्यावर उभारलेले बॅरिकेड्स उडाले. जागोजागी उभारण्यात आलेले तंबू वाचवण्यासाठी पोलिसांची प्रचंड धावपळ झाली. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
नाशिकमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस
नाशिक जिल्ह्यातही वादळीवारयासह पावसाने हजेरी लावली. मनमाडसह नांदगाव तालुक्यातील काही भागांत वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे मळ्यात काढून ठेवलेला कांदा भिजून झाला खराब झाला. तसेच इतर पिकांचेही नुकसान झाल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.
जुन्नरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
जुन्नर तालुक्यात आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर सोसाट्याचा वारा वाहत होता. तसेच विजांचा कडकडाट सुरू होता. काल संध्याकाळी सातनंतर पावसाला सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. यात कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. भिजलेला कांदा भरून लवकरात लवकर बाजार समितीमध्ये नेण्याची धावपळ शेतकऱ्यांनी केली. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या मोडून पडल्या. तसेच शेतामध्ये पाणी साठल्यामुळे धना, टॉमॅटो, उन्हाळी बाजरी, कोथिंबीर, शांप यासारख्या पिकांचेही नुकसान झाले. (Unseasonal rain hit in the state; Strong attendance in Pune, Nashik, Dhule)
Iphone 13 चं डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स लीक, कसा असेल नवा स्मार्टफोन?#Iphone #iphone13 #Apple https://t.co/HEjtTVUYYC
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2021
इतर बातम्या
Flipkart Big Saving Days Sale : G40 ते Razr 5G, मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Video | कोल्हापूरमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ, नागरिकांनी शिवीगाळ केल्याचा आशा वर्कर्सचा आरोप