राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा देखील अंदाज
imd, Weather update: राज्यातील वातावरणात अनेक बदल दोन दिवस दिसणार आहे. काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील देखील तापमान जाणार 40 अंशाच्यावर जाणार आहे. त्याचवेळी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ काही भागांत दिसणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. राज्यातील नागरिक एकीकडे उन्हामुळे लाहीलाही होणार आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील 48 तासांतमध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा फटका शनिवारी पिकांना बसला. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे.
राज्यातील वातावरणात अनेक बदल दोन दिवस दिसणार आहे. काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील देखील तापमान जाणार 40 अंशाच्यावर जाणार आहे. त्याचवेळी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ काही भागांत दिसणार आहे. त्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसणार आहे.
अमरावतीत अवकाळी पावसाचा फटका
शुक्रवारी रात्री विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस अमरावती विभागात झाला. या अवकाळी पावसामुळे गहू, संत्रा, कांद्यासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे अमरावतीत नागरिकांची आणि शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. अवेळी होत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात पाऊस
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. शेतातील काढून ठेवलेले पीक पावसामुळे खराब होण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली. एकीकडे दुष्काळी परस्थितीमुळे पाणी नाही तर दुसरीकडे अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, आंबा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील लोणार, सिंदखेड राजा, मेहकर, साखर खर्डा परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे या परिसरातील भाजीपाला पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा तसेच कांदा बियाणे पिकांचे मोठं नुकसान झाले. साखर खर्डा परिसरात गारांचा ही पाऊस झाल्याने आंबा पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. तर साखर खेरडा परिसरात ही वादळी वाऱ्यामुळे सवडत येथील घरावरील टीनपत्र उडालीय आहे. अनेक घरांची पडझड झालीय आहे.