थोरांताना फोन करून परवानगी; काँग्रेसकडून लढताना वाचलेला निधी उर्मिलाकडून CM फंडात

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढल्यानंतर उरलेला निधी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे. (Urmila Matondkar donates Rs 20 lakh to CM’s relief fund)

थोरांताना फोन करून परवानगी; काँग्रेसकडून लढताना वाचलेला निधी उर्मिलाकडून CM फंडात
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 1:22 PM

मुंबई: काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढल्यानंतर उरलेला निधी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे. उर्मिला यांनी 20 लाख रुपयांचा उरलेला निधी मुख्यमंत्री फंडात दिला असून हा निधी देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची परवानगी घेतली आहे. (Urmila Matondkar donates Rs 20 lakh to CM’s relief fund)

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये असताना 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. काँग्रेसने लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना फंड दिला होता. उर्मिला मातोंडकर यांनाही 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र, त्यातील त्यांनी फक्त 30 लाख रुपये खर्च केले होते. त्याचा हिशोबही त्यांनी निवडणूक आयोगाला वेळोवेळी दिला होता.

निवडणुकीत 30 लाख रुपये खर्च झाल्यानंतर 20 लाखांचा निधी उरला होता. त्यातच राज्यात कोरोनाचं संकट उद्भवलं. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्याने सर्वच उद्योगधंदे बंद झाले होते. त्याचा राज्याला मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे त्यांनी हा 20 लाखांचा उरलेला निधी मुख्यमंत्री निधीत देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना फोन करून हा निधी सीएम फंडात देण्याची परवानगी मागितली होती. थोरात यांनीही त्यांना हा निधी सीएम फंडात देण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्यांनी हा निधी सीएम फंडात दिला आहे.

दरम्यान, उत्तर मुंबई मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर नाराज झाल्या होत्या. त्यातच पक्षांतर्गत वाद निर्माण झाल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. मात्र गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचं विधानपरिषदेच्या सदस्यपदासाठी शिवसेनेकडून नावही देण्यात आलं आहे. (Urmila Matondkar donates Rs 20 lakh to CM’s relief fund)

संबंधित बातम्या:

मग तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का; सुभाष देसाईंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

अभिनेत्रीच्या निधनाचं वृत्त जाहीर, दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून पतीला फोन… ‘तान्या जिवंत आहे’

कर नाही त्याला डर कशाला?; अरविंद सावंतांनी सुनावला महाजनांना भाजपचा डायलॉग

(Urmila Matondkar donates Rs 20 lakh to CM’s relief fund)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.