राज्यात शिक्षणाचा नवा “बीड पॅटर्न”, दहावीच्या 47,000 विद्यार्थ्यांना घरबसल्या मोफत शिक्षण

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बीड जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शिक्षणाचा नवा बीड पॅटर्न तयार करण्यात आला आहे (V School Education Pattern of Beed for SSC student).

राज्यात शिक्षणाचा नवा बीड पॅटर्न, दहावीच्या 47,000 विद्यार्थ्यांना घरबसल्या मोफत शिक्षण
Follow us
| Updated on: Jun 12, 2020 | 1:34 AM

बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बीड जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शिक्षणाचा नवा बीड पॅटर्न तयार करण्यात आला आहे (V School Education Pattern of Beed for SSC student). आज (11 जून) बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते व्ही-स्कूल (VSchool) या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात झाली. यामुळे बीड जिल्ह्यातील 47 हजार दहावीच्या विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. पुणे येथील वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (VOPA) या सामाजिक संस्थेने बीड जिल्ह्यातील काही नामवंत विषयतज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा शैक्षणिक प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या कामात बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिली. विद्यार्थ्यांना हा प्लॅटफॉर्म http://ssc.vopa.in/ येथे मोफत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या शैक्षणिक उपक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले, “जेव्हा आपलं दैनंदिन शैक्षणिक काम सुरु असतं तेव्हा अशा प्रकारचे वेगळे शैक्षणिक कार्यक्रम पूर्ण होत नाही. आपली इच्छा असूनही असे शैक्षणिक उपक्रम मागे राहतात. ती इच्छा पूर्ण न झाल्याने आपल्याला समाधानही मिळत नाही. मात्र, आज कोरोनाच्या संकटाने आपल्याला हे शैक्षणिक स्वप्न सत्यात आणण्यासाठी संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना वोपाच्या माध्यमातून ही शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आपल्याला यश आले आहे. वोपाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जो उपक्रम सुरु केला, त्यासाठी मी वोपाचे आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांचे आभार मानतो.”

“आपण या रचनात्मक पद्धतीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या प्रयत्नांचा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल, असा मला विश्वास आहे. आपल्या या उपक्रमाची वेबसाईट आपण सर्वांनाच उपलब्ध करुन देत आहोत. ही वेबसाईट अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करु. ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत देखील हे शिक्षण पोहचवू. या व्यतिरिक्तचा अभ्यासक्रम देखील यात लवकरच समाविष्ट करता येईल यासाठी प्रयत्न करुयात. वोपाने स्वतःहून हा उपक्रम सुरु केला. संसाधनांची कमतरता असतानाही त्यांनी त्याची जुळवाजुळव करुन हा उपक्रम पूर्णत्वास नेला. हा उपक्रम राज्याला प्रेरणादायी ठरेल आणि याचा राज्यातील विद्यार्थ्यांना उपयोग होईल”, असंही रेखावर यांनी नमूद केलं.

या उपक्रमाची वैशिष्ट्ये काय?

1. विद्यार्थ्यांचा स्क्रिन टाईम कमी करण्यासाठी प्रयत्न 2. यासाठी कोणत्याही अॅप्लिकेशन, नोंदणी इत्यादी गोष्टींची गरज नाही. कोणत्याही मोबाईलवर याची उपलब्धता होते. 3. कमीत कमी इंटरनेट स्पीडवर देखील हा प्लॅटफॉर्म चालेल. 4. यात फक्त व्हिडीओ नाही, तर टेक्स्ट, अॅनिमेटेड फोटोजचा वापर. 5. मोबाईलचा उद्देश केवळ शिक्षण पोहचण्यासाठी केला आहे. मात्र, खरं शिक्षण मोबाईलच्या बाहेर वही, पुस्तक, पेन आणि परिसर यांचा वापर व्हावा यावर भर दिला आहे. 6. प्रश्नपत्रिका आणि सराव दिले आहेत. 7. शाळा आणि स्थानिक शिक्षकांची यात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. यात वेळोवेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांची मदत घेण्यास सांगितले आहे आणि शिक्षकांनाही यात मदतीबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. 8. विद्यार्थ्यांना कोठेही क्लिक करावं लागत नाही किंवा इतर पेजवर जावं लागत नाही. त्यामुळे कमीत कमी इंटरनेट आणि विद्यार्थ्यांचं अधिकाधिक लक्ष वेधून घेण्यास मदत होते. 9. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने विद्यार्थी खरंच अभ्यास करतात की नाही आणि शिक्षक खरंच मदत करतात की नाही यावर तांत्रिकदृष्ट्या देखरेख करण्याची व्यवस्था आहे. याचा उपयोग करुन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कामात अधिक पारदर्शकता आणता येणार आहे. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींवर देखील मदत केली जाणार आहे. 10. यात विद्यार्थ्यांना देखील आपली मतं नोंदवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यातून शिक्षकांच्या कामाचं आणि विद्यार्थ्यांच्या सहभाग आणि आकलनाचं मुल्यमापन करता येणार आहे.

विशेष म्हणजे केंद्रशासनाच्या दीक्षा अॅप मधील सर्व शैक्षणिक व्हिडीओचा देखील येथे खुबीने वापर केला आहे. म्हणजेच शासन निर्देशित ऑनलाइन शिक्षणाला स्पर्धा न करता पूरक अशीच व्यवस्था केली आहे.

“सामाजिक व शैक्षणिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी हा प्लॅटफॉर्म”

या उपक्रमाविषयी बोलताना हा उपक्रम उभा करणाऱ्या वोपा संस्थेचे संचालक प्रफुल्ल शशिकांत म्हणाले, ““बाजारात उपलब्ध असलेले महागडे ऑनलाइन शिक्षणाचे अॅप्स समाजातील सामान्य पालक आपल्या पाल्यांसाठी घेऊ शकत नाहीत. परिणामी गुणवत्तापूर्ण आधुनिक शैक्षणिक साधने व ज्ञान एका विशिष्ट वर्गापूरतेच सीमित राहते. पर्यायाने भविष्यात सामान्य घरातील विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये पिछाडीवर राहण्याची शक्यता वाढते. सामाजिक व शैक्षणिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म व व्यवस्था विकसित केली आहे.”

“या प्रकल्पात शाळा व शिक्षकांचे स्थान व महत्व अबाधित आहे. शासनाने या पद्धतीने अवलंब केल्यास कमीत कमी आर्थिक साधनांमध्ये आपण गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षणाचा हक्क समाजातील खूप मोठ्या वर्गाला मिळवून देऊ शकू. स्थानिक तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने केवळ 9 लाख रुपयांच्या वार्षिक बजेटमध्ये आम्ही बीड जिल्ह्यातील 47,000 विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली आहे. हे बजेट समाजातील दानशूर व शिक्षणाचे महत्व वाटणाऱ्या लोकांच्या योगदानातून उभे करायचे आहे. त्यात मदतीसाठी आम्ही प्रशासन आणि समाजातील दानशुरांना आवाहन करतो,” असंही प्रफुल्ल शशिकांत म्हणाले.

VSchool प्लॅटफॉर्मची ठळक वैशिष्ट्ये:

  1. जिल्ह्यातील 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध
  2. शाळा व शिक्षक यांना यात सक्रीय रोल आहे, त्यांना बाजूला सारत नाही
  3. सर्वांसाठी एकच कंटेंट नसावा, भौगोलिक भागानुसार वेगळी निर्मिती शक्य
  4. बाजारातील महागडे अॅप नाकारून, सर्व शिक्षक- शाळा यांनी एकत्र येऊन आपल्या विद्यार्थ्यांसाठी ह्याची निर्मिती (सहकार तत्त्वावर राबवणे शक्य)
  5. लॉकडाऊन संपल्यानंतर देखील विद्यार्थी आणि शिक्षकांना उपलब्ध
  6. स्क्रीन टाईम कमी राहील याकडे विशेष लक्ष
  7. स्क्रीन च्या बाहेर घेऊन जाणाऱ्या अनेक गृहपाठ व कृतींचा समावेश
  8. वापरायला एकदम सोप्पा, संपूर्ण धडा एकाच पेजवर, कॉम्प्लेक्स रचना नाही
  9. इंस्टॉलेशन किंवा लॉगीन करण्याची गरज नाही
  10. फक्त व्हिडीओचा भडीमार नाही, त्यासोबत सूचना, गृहपाठ, इमेज, gif इमेज, ऑनलाईन परीक्षा, फीडबॅक यांचा कल्पकतेने वापर

शिक्षकांच्या प्रतिक्रिया

या शैक्षणिक उपक्रमाविषयी बोलताना आंबेजोगाईचे इंग्रजीचे वरिष्ठ शिक्षक श्रीधर नगरगोजे म्हणाले, “आम्ही बालभारती सोबत पुस्तकनिर्मितीचे काम करताना नेहमी तंत्रज्ञानाचा न्याय्य (योग्य) वापर हि संज्ञा वापरायचो, पण हा प्लॅटफॉर्म बनवताना याचा खरा प्रत्यय आला.” “शिक्षणाचे माध्यम ऑनलाईन झाले आहे, शिक्षण नाही. हे अनुभवायला मिळाले. यामध्ये शाळा व शिक्षकांना निर्णायक भूमिका आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे,” अशी प्रतिक्रिया पाटोद्याचे मराठीचे वरिष्ठ शिक्षक बी. व्ही. साळुंके यांनी व्यक्त केली.

बीडमधील विज्ञानाचे वरिष्ठ शिक्षक अतुल मुळे म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम एकाचवेळी आकर्षक/मनोरंजक, जिज्ञासा वाढवणारा आणि बोर्डाच्या दृष्टीने उपयुक्त असला पाहिजे, असा अभ्यासक्रम बांधताना आमची चांगलीच कसरत झाली.” बीडमधील गणिताचे वरिष्ठ शिक्षक शिरीष धावडे म्हणाले, “मला तांत्रिक गोष्टींची फार येत नव्हत्या, आम्ही नवीन तांत्रिक गोष्टी खूप हसत-खेळत शिकलो, वोपा टीमच्या मार्गदर्शनामुळे हे सहज शक्य झाले.”

“उसतोड कामगारांचा जिल्हा निसर्गाची अवकृपा आणि उद्योगांची वानवा ही ओळख बदलणार”

या कार्यक्रमाला उपस्थित ढवळे ट्रस्टचे प्रमुख सुनिल चव्हाण म्हणाले, “वोपाने आपली पूर्ण ताकद लावून हा उपक्रम पूर्णत्वास नेला. या काळातही ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मागे राहू नये, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा प्लॅटफॉर्म उभा केला आहे.”

बीडमधील गुरुकुल शाळेचे प्रमुख सुदाम भोंडवे म्हणाले, ” बीड जिल्हा हा उसतोड कामगारांचा जिल्हा निसर्गाची अवकृपा आणि उद्योगांची वानवा अशी ओळख होती. मात्र, वोपा टीम मागील 2 वर्षांपासून गुरुकुलच्या विकासासाठी काम करत आहे. आता वोपा संपूर्ण बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत. या उपक्रमासाठी खूप गुणवत्तापूर्वक शिक्षक निवडले आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाच्या कामात शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, बीडमध्ये या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोरोनाशी सामना करतानाच शिक्षणासाठी देखील वेळ देत हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मदत केली. हा उपक्रम नक्कीच जिल्ह्याचं भविष्य बदलेल याचा मला विश्वास आहे.”

हेही वाचा :

Corona Updates : राज्यात तब्बल 3607 कोरोना रुग्णांची वाढ, 152 जणांचा मृत्यू

कोकणाला 9 दिवसात काहीच मदत मिळाली नाही, लोकांना जिथं ठेवलंय ती अवस्था खुराड्यासारखी : फडणवीस

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, वादळग्रस्त कोकणाला उभं करण्यासाठी प्लॅन ठरला

V School Education Pattern of Beed for SSC student

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.