EVM विरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर, उद्यापासून आंदोलन छेडणार

वंचित बहुजन आघाडी ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून उद्यापासून राज्यात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

EVM विरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर, उद्यापासून आंदोलन छेडणार
प्रकाश आंबेडकरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 6:40 PM

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वंचितकडून राज्यात येत्या 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 2004 पासून EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM वापरामधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मारकडवाडी गावात गावकऱ्यांकडून बॅलेट पेपरवर मतदान

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विरोधकांकडून यापुढच्या सर्व निवडणुका या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी गावात गावकऱ्यांना ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा संशय आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचं ठरवलं आहे. गावकऱ्यांनी सर्व गावकऱ्यांना विधानसभेला ज्या उमेदवाराला मदतान केलं त्यालाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.