गोव्याला जाणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसबाबत मोठी बातमी, ऐकून व्हाल खूश
सणासुदीच्या दिवस सुरु होत आहेत. त्यामुळे दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण मार्गावरील गोवा हे सर्वात जवळचे आणि सुंदर डेस्टीनेशन सर्वांनाच भुरळ घालत असते. आता वेळापत्रक बदलत असल्याने प्रवाशांचा फायदा होणार आहे.
मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : देशभरातील 34 मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेस धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवास करायला मिळत आहे. मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण मार्गावर धावणारी मुंबई ते गोवा वंदेभारत एक्सप्रेस खूपच लोकप्रिय झाली आहे. आता या गोवा जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाची माहिती समोर आली आहे. सीएसएमटी ते मडगांव ( गोवा ) धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात आता बदल होणार आहे. आधी मान्सून वेळापत्रकानूसार ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावत होती. आता ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
सणासुदीच्या दिवस सुरु होत आहेत. त्यामुळे दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण मार्गावरील गोवा हे सर्वात जवळचे आणि सुंदर डेस्टीनेशन सर्वांनाच भुरळ घालत असते. त्यामुळे सीएसएमटी ते मडगांव ( गोवा ) या वंदेभारत ट्रेनला सर्वाधिक मागणी आहे. वंदेभारतच्या नव्या शेड्युलचा शुभारंभ येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. आता या मार्गावर ही ट्रेन शुक्रवार वगळता आठवड्याचे सहा दिवस धावणार आहे. पावसाळ्यामुळे कोकण मार्गावर मान्सूनचे वेळापत्रक लागू झाले होते. त्यामुळे वंदेभारत एक्सप्रेस आठवड्यातून केवळ तीन दिवस धावत होती. आता मान्सूनचे वेळापत्रक बदलत ही ट्रेन नियमित वेळापत्रकानूसार आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
1 नोव्हेंबरपासून नॉन-मॉन्सून वेळापत्रत
कोकण मार्गावर मान्सून आणि नॉन मान्सून अशा दोन वेळापत्रकानूसार कोकणा आणि दक्षिणेत जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक निश्चित होत असते. नॉन मान्सून काळात वंदेभारत एक्सप्रेस सीएसएमटी मुंबईतून स.5.25 वाजता सुटेल आणि दु.1.15 वा. मडगांवला पोहचेल. त्यानंतर परतीची ट्रेन दु. 2.35 वाजता मडगांवहून निघेल आणि सीएसएमटी मुंबईला रा.10.25 वा. पोहचेल. या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबा असेल. या ट्रेनचे चेअरकारचे तिकीट 1,100 ते 1,600 रुपये आहे. तर एक्झीकुटीव्ह क्लासचे तिकीट 2,000 ते 2,800 रुपयांदरम्यान आहे.