Vande Bharat | देशाला मिळणार दहा नवीन वंदे भारत, महाराष्ट्रातून कुठे धावणार हायस्पीड वंदे भारत ट्रेन

Vande Bharat Train News: बेंगळुरूमध्ये ऑक्टोबर 2023 पासून वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर प्रोटोटाइपतयार होत आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये राजधानी एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा चांगल्या सुविधा असणार आहे. एकूण 10 वंदे भारत स्लीपर ट्रेनचा सेट तयार करण्याचे काम सुरु आहे.

Vande Bharat | देशाला मिळणार दहा नवीन वंदे भारत, महाराष्ट्रातून कुठे धावणार हायस्पीड वंदे भारत ट्रेन
jalna to csmt vandebharat express
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 9:49 AM

अभिजित पोते, पुणे | दि. 10 मार्च 2024 : देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन महाराष्ट्रातून सुरु आहेत. मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर राज्यातील मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबईवरुन शिर्डी, मुंबई-गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. आता देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे. त्यातील दोन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून सुरु होणार आहे. येत्या १२ मार्च रोजी राज्याला या दोन गाड्या मिळणार आहे.

महाराष्ट्रातून पुणे शहरास मिळाल्या दोन गाड्या

पुणे शहरातून 2 नवीन वंदे भारत रेल्वे सुरू होत आहे. नव्या रेल्वे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. पुणे-बडोदा आणि पुणे – सिकंदराबाद या नव्या 2 वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्या जाणार आहेत. येत्या 12 मार्च रोजी पुण्यासह देशाला नव्या 10 वंदे भारत रेल्वे एक्स्प्रेस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

आणखी दोन गाड्या मिळण्याची शक्यता

देशभरातील धार्मिक स्थळांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केली जात आहे. अयोध्या रेल्वे स्थानकावर देशातून अनेक ठिकाणांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस येत आहेत. महाराष्ट्रात शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत. आता पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या दोन वंदे भारत सुरु करण्याचा हालचाली सुरु आहेत. यामुळे संत गजानन महाराजांचे दर्शन घेणे मुंबई, पुण्यातील भाविकांना सोपे होणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्लिपर वंदे भारत येणार

अमृत ​भारत आणि वंदे भारत ट्रेनच्या चेअर कारच्या यशानंतर आता लवकरच लोकांना वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन देखील रुळांवर पाहायला मिळणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी वंदे भारत स्लीपर ट्रान्झिटच्या कार बॉडी स्ट्रक्चरचे उद्घाटन केले.

बेंगळुरूमध्ये ऑक्टोबर 2023 पासून वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर प्रोटोटाइपतयार होत आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये राजधानी एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा चांगल्या सुविधा असणार आहे. एकूण 10 वंदे भारत स्लीपर ट्रेनचा सेट तयार करण्याचे काम सुरु आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.