Maharashtra 10th, 12th Exams 2022 : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधीपासून? वाचा सविस्तर
SSC and HSC Board Exam 2022 Time Table - राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्चे ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्चे ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार? याची प्रतीक्षा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना होती, त्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.
दोन वर्षांनंतर होणार दहावी बारावीच्या परीक्षा
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले होते. ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आल्यानंतर यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता. याबाब वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यात बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. तर त्यानंतर दहावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहवीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे. 14 फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.
नमस्कार विद्यार्थी व पालक हो, सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.#SSCexams #HSCexams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR pic.twitter.com/ZWwQoKAbV8
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
दहावीचे वेळापत्रक
दहावी परीक्षा वेळापत्रक
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा | परीक्षेचा कालावधी | संभाव्य कालावधी | आवश्यक कामाचे दिवस | निकाल |
---|---|---|---|---|
प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांचा | परीक्षा कालावधी | 25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 | 18 दिवस | 21 दिवस | अंदाजे निकाल माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वीचा निकाल जुलै 2022 च्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात |
लेखा परीक्षा | 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 | 35 दिवस | 12 दिवस | |
प्रात्यक्षिक श्रेणी / तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा | 05 एप्रिल 2022 ते 25 एप्रिल 2022 | 21 दिवस | 16 दिवस | |
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा | 05 एप्रिल 2022 ते 19 एप्रिल 2022 | 15 दिवस | 12दिवस |
बारावीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल
बारावी परीक्षा वेळापत्रक
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा | परीक्षेचा कालावधी | संभाव्य कालावधी | आवश्यक कामाचे दिवस | अंदाजे निकाल |
---|---|---|---|---|
प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांचा | परीक्षा कालावधी | 14 फेब्रुवारी, 2022ते 03 मार्च, 2022 | 13 दिवस | 13 दिवस | अंदाजे निकाल उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) चा निकाल जूनचा पहिला/ दुसरा आठवडा |
लेखा परीक्षा | 04 मार्च,2022 ते 07 एप्रिल, 2022 | 35 दिवस | 22 दिवस | |
माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षा | 31मार्च,2022 ते 09 एप्रिल, 2022 | 10 दिवस | 06 दिवस | |
प्रात्यक्षिक श्रेणी / तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा | 31 मार्च,2022 ते 21 एप्रिल, 2022 | 22 दिवस | 16 दिवस |
कसे असेल परीक्षांचे नियोजन?
ओमिक्रॉनसंदर्भात राज्य शासन खबरदारी घेत आहे. त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेता आल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते.