Vasai-Virar Rain | वसईत सनसिटी गास रस्ता 4 दिवसांपासून पाण्याखाली, 10 ते 12 गाव पुराच्या विळख्यात

अनेक गावाला पुराने वेढा दिल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Vasai-Virar Rain | वसईत सनसिटी गास रस्ता 4 दिवसांपासून पाण्याखाली, 10 ते 12 गाव पुराच्या विळख्यात
vasai heavy rain
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 12:02 PM

विरार : गेल्या काही आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात ठिकठिकाणी रौद्ररुप धारण केले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर यांसह ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. वसई तालुक्यातील 10 ते 12 गावांना तानसा नदीच्या पुराचा विळखा पडला आहे. तानसा धरण ओव्हर फ्लो झाल्याने मध्यरात्रीच्या सुमारास नदीला पूर आला आहे. या पुराने भाताने, नावसाई, जाभुलपाडा, थल्याचा पाडा, बेलवाडी, आडना यासह अनेक छोट्या मोठ्या गावांना विळखा घातला आहे.

तानसा नदी गावाला पुराने वेढा

तानसा नदीला पूर आल्याने किनाऱ्यावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पूर्ण रात्र जागरण करावी लागली. अनेक गावाला पुराने वेढा दिल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वसईतील सनसिटी-गास रस्त्यावर गुडघाभर पाणी

तर दुसरीकडे वसईतील सनसिटी-गास रस्ता 4 दिवसापासून पाण्याखाली गेला आहे. वसई, विरार, नालासोपारा शहरात मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शहरातील सकल भागात रस्त्यावर साचलेले पाणी ओसरले आहे. मात्र वसईतील सनसिटी रस्त्यावरील पाणी अद्याप तसेच आहे. वसईतील सनसिटी-गास रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक जीव मुठीत घालून या पाण्यातून मार्ग काढत आहेत. सनसिटी- गास रस्त्याला समुद्राचे स्वरूप आल्याने रस्ता कुठे आहे हे दिसणे ही कठीण झाले आहे.

रस्ता वाहतुकीसाठी बंद करणे गरजेचे

वसई पश्चिमेकडून गास, भुईगाव, सोपारा, निर्मळ, विरार पश्चिम या ठिकाणी जाण्यासाठी हा जवळचा बायपास रोड आहे. मात्र या रस्त्यावरील पाणी साचले आहे. हे पाणी ओसरायला पुढचे 8 दिवस लागू शकतात. तोपर्यंत हा रस्ता प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद करणे गरजेचे आहे. अन्यथा याठिकाणी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Vasai Virar Palghar Heavy rain flood in many village)

संबंधित बातम्या : 

Konkan Rain : कोकण, कोल्हापुरात तुफान पाऊस, NDRF ची पथकं रवाना, रस्ते, रेल्वे वाहतूक रखडली

Chiplun Flood: चिपळूण जलमय, ढगफुटीने हाहाकार; बाजारपेठेत 5 फुट पाणी, अनेक जण पुरात अडकले, 2005च्या पुनरावृत्तीची भीती

गच्चीवरुन पूर पाहताना तोल गेला, पाण्यात पडून महाडमध्ये 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.