Raj Thackeray Thane News: तर अमेरिकेतून मनसेच्या नगरसेवकाला फोन येतील, वसंत मोरेंनी किती ऑफर धुडाकावल्या?
Raj Thackeray Thane News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी भोंग्याबाबतची आपली भूमिका जाहीर केल्यानंतर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे नाराज झाले होते. मोरे यांनी त्याबाबतची जाहीर नाराजीही बोलून दाखवली होती.
ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी भोंग्याबाबतची आपली भूमिका जाहीर केल्यानंतर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे नाराज झाले होते. मोरे यांनी त्याबाबतची जाहीर नाराजीही बोलून दाखवली होती. मोरे यांनी थेट राज ठाकरे यांच्याच भूमिकेला आव्हान दिल्यानंतर मोरे यांना अनेक पक्षातून ऑफर आली. या मधल्या काळात नेमकं काय घडलं याची माहिती मोरे यांनी दिली. मला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच भाजपमध्ये (bjp) येण्याची ऑफर दिली. तिकडे काय करता या इकडे ते म्हणाले. त्यावर मी त्यांना दादा, मी तुमच्या उमेदवारांना पाडून पंधरा वर्षापासून निवडून येत आहे. तुमच्याकडे कसा येणार असं सांगितलं. तर, तुम्ही प्रचंड काम करा. राज ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवा. म्हणजे अमेरिकेतून आपल्या नगरसेवकांना फोन येतील, असं वसंत मोरे म्हणाले.
नाराजी नाट्यानंतर आज वसंत मोरे यांना ठाण्यातील सभेत बोलण्याची संधी देण्यता आली. या सभेत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. पुणे महापालिकेत आम्ही मनसेचे दोनच नगरसेवक आहोत. तरीही ‘चर्चेतील चेहरा’ हा पुरस्कार मनसेच्या नगरसेवकाला जातो. म्हणजे मनसे नक्कीच चांगलं काम करत आहे. 16 वर्षात 16 उद्यानं निर्माण करणारा मी एकमेव नगरसेवक आहे. मला पुरस्कार देताना चंद्रकांतदादा आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तेव्हा चंद्रकांतदादा म्हणाले, तुम्ही भाजपमध्ये या. तेव्हा मी दादांना म्हणालो, मी 15 वर्षे भाजपच्याच उमेदवाराला पाडून नगरसेवक होत आलोय. तुमच्याकडे कसा येऊ?, असं सांगत वसंत मोरे यांनी चंद्रकांत पाटील यांची ऑफर धुडकावल्याचं सांगितलं.
तर अमेरिकेतून फोन येतील
राज ठाकरे स्टेजवर येतात, बोलतात. पण आपल्याला राज ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवला तर अमेरिकेतून आपल्या नगरसेवकांना फोन येतील. आपल्या लोकांना तिकडं बोलावून घेतलं जाईल. आपला नगरसेवक कशा पद्धतीने काम करतो हे पाहिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
तेव्हा मनसे का आठवत नाही?
कोरोना काळात मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोकांना मोठी मदत केली. मनसेचं कार्यालय सर्वांसाठी उघड होतं. कोरोनाचा ट्रेन्ड बदलत गेला तसा फायनान्स, बँकवाले प्रत्येकाच्या दारात उभे राहायला लागले. अशावेळी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दारं उघडी होती. फायनान्सवाला, बँकवाला आला की मनसेवाला आठवतो. मग निवडणुकीच्या काळात मनसे का आठवत नाही? मनसेवाल्यांचा का विचार करत नाही? का आमचा विचार होत नाही? या गोष्टी विचारात घ्या, असं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरेंना भयंकर त्रास
यावेळी त्यांनी राज यांच्या प्रकृतीविषयीही भाष्य केलं. वर्षभरापासून राज ठाकरेंना पाहतोय. पण गेल्या दोन तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नाही. काल त्यांना भेटलो तेव्हाही त्यांचा त्रास जाणवत होता. पुण्यात आमच्या कोअर कमिटीत गेलो होतो. प्रत्येकाच्या घरात गेले. एक पायरीही चढता येणार नाही, एवढा त्यांना त्रास होतोय. पण तरीही ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या, आजही कोर्टात पदरी निराशा