16 कोटीच्या इंजेक्शननंतरही चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूमागचं नेमकं कारण!

उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. छातीमध्ये दूध गेल्यामुळे वेदिकाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

16 कोटीच्या इंजेक्शननंतरही चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूमागचं नेमकं कारण!
वेदिका शिंदे
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 4:46 PM

पिंपरी चिंचवड : 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन देऊनही आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यासाठी सदिच्छा व्यक्त होऊनही चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू झालाय. स्पायनल मस्क्यूलर अॅट्रॉफी नावाचा दुर्मिळ आजार असल्यानं वेदिकाला तब्ब्ल 16 कोटी रुपये किंमत असलेल्या इंजेक्शनची गरज होती. क्राऊड फंडिगद्वारे ही रक्कम उभारण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारनंही या इंजेक्शनसाठी कर सवलत दिली. त्यानंतर वेदिकाला हे इंजेक्शन देण्यात आलं. मात्र, असं असूनही रविवारी (1 ऑगस्ट) रोजी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी वेदिकाच्या मृत्यूचं नेमकं कारण सांगितलं आहे. (Doctors informed that Vedika Shinde died due to milk in her Chest)

इंजेक्शन दिल्यानंतर 11 महिन्याच्या चिमुकल्या वेदिकाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. रविवारी संध्याकाळी वेदिकाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. छातीमध्ये दूध गेल्यामुळे वेदिकाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, मुलगी गेल्याचं दु:ख असतानाही वेदिकाच्या वडिलांनी सामाजिक बांधिकली जपल्याचं पाहायला मिळत आहे. वेदिकाचा मृत्यू इंजेक्शन दिल्यानंतरही कसा झाला, असा चुकीचा प्रश्न उपस्थित करु नका, असं आवाहन सौरभ शिंदे यांनी केलं आहे.

इंजेक्शनसाठी लोकवर्गणीतून जमवले होते 16 कोटी रुपये 

वेदिका Spinal Muscular Atrophy या जनुकीय आजाराने ग्रस्त होती. वेदिकाला हा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिचे आईवडील चांगलेच हादरले होते. मात्र, नंतर हिम्मत न हारता त्यांनी वेदिकावर उपचार करण्याचे ठरवले. त्यासाठी तब्बल 16 कोटी रुपये किमतीचे इंजेक्शन खरेदी करण्याचेही त्यांनी ठऱवले. मोठे प्रयत्न करुन त्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून 16 कोटी रुपये जमवले होते. तसेच पुण्याच्या खासगी रुग्णालयात जून महिन्यात वेदिकाल झोलगेन्स्मा (Zolgensma) ही लस देण्यात आली होती. मात्र, एवढे सारे प्रयत्न करुनही वेदिकाचे प्राण वाचू शकले नाहीत.

SMA हा आजार काय आहे?

जेनेटिक स्पायनल मॅस्कुलर अ‍ॅट्रोफी म्हणजेच SMA हा आजार शरीरात एसएमएन-1 जीनच्या कमतरतेमुळे होतो. यामुळे छातीचे स्नायू कमकुवत होतात आणि श्वास घेण्यात अडथळा येतो. हा आजार जास्तकरुन लहान मुलांना होतो आणि त्रास वाढून रुग्णाचा मृत्यू होतो. ब्रिटनमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे दरवर्षी जवळपास 60 बाळांना जन्मजात हा आजार होतो.

या आजाराचं इंजेक्शन इतकं महाग का असतं?

ब्रिटनमध्ये अनेक बाळांना या आजाराने ग्रासलं आहे. पण, तिथे याचं औषध तयार होत नाही. या इंजेक्शनचं नाव जोलगेनेस्मा आहे. ब्रिटमध्ये हे इंजेक्शन अमेरिका, जर्मनी आणि जापानहून मागवलं जातं. हा आजार असलेल्या रुग्णाला एकदाच हे इंजेक्शन दिलं जातं. हे इंजेक्शन इतकं महाग आहे, कारण जोलगेनेस्मा त्या तीन जीन थेरेपीपैंकी एक आहे ज्या थेरेपीला युरोपात प्रयोग करण्याची परवानगी आहे.

इतर बातम्या :

Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’वर संतप्त, जोरदार तोडफोड

Video | औरंगाबाद पंचायत समितीत तुफान राडा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भाजप सभापतीला मारहाण

Doctors informed that Vedika Shinde died due to milk in her Chest

पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.