15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरण करा, अन्यथा कर्जमुक्तीचा लाभ नाही; नाशिकच्या शेतकऱ्यांना आवाहन

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरण करा, अन्यथा कर्जमुक्तीचा लाभ नाही; नाशिकच्या शेतकऱ्यांना आवाहन
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 4:37 PM

नाशिकः महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची नावे या योजनेच्या आधार प्रमाणिकरणाच्या यादीत असून, त्यांनी अद्याप आपले आधार प्रमाणिकरण केले नाही, त्यांनी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत आपले आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन नाशिक सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 104 शेतकऱ्यांच्या आधारचे प्रमाणिकरण करणे बाकी असून, याकरिता जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँक, तालुका उपनिबंधक व सहाय्यक निबंधक कार्यालय तसेच सहकारी संस्था कार्यालयाकडे आधार प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मृत कर्जदाराची अद्ययावत माहिती संकेतस्थळावर सादर करण्यासाठी बँकांना 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आधार प्रमाणिकरण करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत किंवा नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले पासबुक व आधार कार्ड घेऊन प्रमाणिकारण करून घ्यावे असेही, जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी कळविले आहे.

आम्ही कसं जगायचं?

रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषीपंपाची वीज खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. नागपूर विभागात 10 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज खंडीत करण्यात आलाय. सिंचनासाठी वीज नसल्याने नागपूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी संकटात आले आहेत. अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालीय. बुटीबोरी परिसरात 500 च्या वर शेतीपंपाची वीज खंडीत केली गेलीय. त्यामुळे खरिपात गहू, चणा कसा पेरायचा? कुटुंब जगवायचं कसं? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला केलाय.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी बँकेचे नोडल अधिकारी व तालुका उपनिबंधक व सहायक निबंधक तसेच सहकारी संस्था यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेण्याची कार्यवाही करावी. तसेच सदर आधार प्रमाणिकरण करण्याची अंतिम संधी असून, आधार प्रमाणिकरण न झाल्यास योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. – डॉ. सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक, नाशिक सहकारी संस्था

इतर बातम्याः

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अनुदान वाटपात घोळ; चौकशी समितीचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न, ठपका ठेवलेल्या दोषींवर कारवाईस टाळाटाळ

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाला चार आठवड्यांचा दिलासा, अटक टाळण्यासाठी धडपड

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.