Video : राज्यपाल येताच शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावर आमदारांची घोषणाबाजी, जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत

जयंत पाटील म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्षेप नोंदवला. मात्र, राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले. इतकेच नाही, तर ते राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Video : राज्यपाल येताच शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावर आमदारांची घोषणाबाजी, जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत
विधिमंडळ अधिवेशनातील राष्ट्रगीताला राज्यपाल उपस्थित होते. मात्र, त्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला.
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 2:24 PM

मुंबईः विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना महाविकास आघाडीच्या संतापाला सामोरे जावे लागले. राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे त्यांनी अभिभाषणाच्या प्रथेला फाटा देत थेट विधिमंडळ सोडून सभागृहातून काढता पाय घेतला. राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत, अशी खंत यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली. एकीकडे महाविकास आघाडीतील पक्षांनी राज्यपालाविरोधात आंदोलन तीव्र केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज्यपाल हटाव, अशी मागणी केली आहे. येणाऱ्या काळात हा कलगीतुरा रंगणार आहे.

नेमके प्रकरण काय?

औरंगाबादमध्ये रविवारी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपालांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे. या वक्तव्याविरोधात सत्ताधारी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

हे तर भाज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी विधिमंडळात पाय ठेवला. मात्र, यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आमदार आक्रमक झाले. बाहेर नवाब मलिकांविरोधात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केले, तर आत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार पेटून उठले. त्यांन राज्यपालांच्या शिवाजी महाराजांविषयीच्या वक्तव्याबद्दल आक्षेप व्यक्त करत निषेध नोंदवला. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हे राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत, अशी टीका आमदारांनी माध्यमांशी बोलताना केली.

राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत…

जयंत पाटील म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्षेप नोंदवला. मात्र, राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले. इतकेच नाही, तर ते राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.