घोर कलीयुग..मोबाईल घेतला म्हणून विद्यार्थिनीची शिक्षिकेला चपलेने मारहाण
शिक्षकांचा, गुरुंचा, वडिलधाऱ्यांचा आदर करणे ही परंपरा आता संपल्यात जमा झाली आहे का ? असा सवाल निर्माण झाला आहे.आताची आपली पिढी नक्की कोणत्या दिशेने जाते आहे? असा सवाल हा व्हिडीओ पाहून येत आहे.

आज काल मोबाईल सर्वांचा जीव की प्राण झाला आहे. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांना मोबाईलचे वेड लागले आहे. मुल मैदानी खेळ खेळण्याऐवजी सतत मोबाईलमध्येच अडकून पडलेली असतात. त्यामुळे घराघरात पालक आणि मुलांत मोबाईलवरुन सातत्याने वाद होत आहेत.सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एका विद्यार्थीनीचा मोबाईल जप्त केला म्हणून विद्यार्थीनीने त्या शिक्षिकेला चपलेने मारल्याची घटना घडली आहे.
विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे गुरू आणि शिष्याचे नाते. गुरुप्रौर्णिमेला या दरवर्षी आपआपल्या शिक्षकांना गुलाब आणि ग्रीटींग्ज देऊन त्यांचे आशीवार्द घेत असतात असे हे आदराचे आणि पवित्र नाते आता सर्वच क्षेत्रातील भेसळीमुळे आणखी विद्रुप झाल्याची अनेक उदाहरणे आपण बातम्यातून वाचत असतो. परंतू एका विद्यार्थीनीने तिचा मोबाईल घेतला म्हणून सर्वादेखत शिक्षिकेलाच चपलाने चोपल्याची घटना घडली आहे.एका जमान्यात गुरु समान शिक्षकांच्या पायाची धुळ चरणी लावली जायची. मात्र, आता जमान्यात काही विचित्र घटना ऐकाव्या लागत आहेत.
येथे पाहा पोस्ट –
मोबाईल घेतला म्हणून विद्यार्थिनीची शिक्षिकेला मारहाण.
ही धक्कादायक घटना एका इंजीनियरिंग कॉलेजच्या आवारात घडली असून, विद्यार्थिनीने नियंत्रण गमावत शिक्षिकेला चप्पलने मारहाण केली.
एखाद्या शिक्षकाचा स्वभाव कसाही असला तरी, शिक्षकांचा आदर करणे गरजेचे असते. आपली भावी पिढी नक्की… pic.twitter.com/L9WDTwlKEo
— स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) April 25, 2025
शाळेच्या मैदातून जात असताना शिक्षिकेने एका विद्यार्थीनीचा मोबाईल घेतल्याने या विद्यार्थीनी चक्क शिक्षिकेला चपलेने चोपल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना एका इंजीनियरिंग कॉलेजच्या आवारात घडलेली आहे. विद्यार्थिनीने रागावरील नियंत्रण गमावत चक्क आपल्या शिक्षिकेला चप्पलने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एखाद्या शिक्षकाचा स्वभाव तापट किंवा रागीट वा कसाही असला तरी, शिक्षकांचा आदर करणे हा संस्काराचा भाग असला तरी हल्ली सर्व संस्काराला मुठमाती मिळाल्याची भावना हा व्हिडीओ पाहून येत आहे.