Video : चिमुकल्याला वाचवताना साक्षीनं पाय गमावला; महाराजांच्या पोशाखात अमोल कोल्हेंचा साक्षीला त्रिवार मुजरा

साक्षी.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या भूमीतील लेक आहेस तू, जिजाऊंची लेक आहेस तू, तुलासुद्धा अशीच भरारी घेताला बघायचंय. तु स्वराज्य जननी जिजामाता मालिका पाहतेस हे कळलं म्हणून मुद्दाम या पेहरावात तुझ्याशी बोलतोय. तुलासुद्ध भरारी घेतलाना बघायचं आहे.

Video : चिमुकल्याला वाचवताना साक्षीनं पाय गमावला; महाराजांच्या पोशाखात अमोल कोल्हेंचा साक्षीला त्रिवार मुजरा
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 10:58 PM

मुंबई : महाडच्या पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात जेव्हा दरड कोसळली तेव्हा समोरच्या घरातलं 2 महिन्याचं बाळ वाचवण्यासाठी गेलेल्या क्रीडापटू साक्षी दाभेकरला आपला एक पाय गमवावा लागला आहे. साक्षीने त्या बाळाला तर वाचवलं मात्र ती एका पायानं दिव्यांग बनली. मात्र, आता तिला पुन्हा एकदा दोन्ही पायांवर उभं करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांनी साक्षीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशावेळी खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी खास छत्रपती शिवाजी महाराज यांचा पेहराव परिधान करत साक्षीला नवं बळ, धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. (Special video message from MP Dr. Amol Kolhe for Sakshi Dabhekar)

खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचा साक्षीला त्रिवार मुजरा

“साक्षी जय शिवराय… जन्माला येणारा प्रत्येक माणून स्वत:साठी जगतो, स्वत:च्या कुटुंबासाठी जगतो. पण बाळा दरड कोसळत असताना त्या संकटाच्या वेळी तू जे धाडस दाखवलं, तुझ्या ओळखीच्या कुटुंबाला, त्यांच्या लहानग्या बाळाला वाचवलं, त्यासाठी तुला मानाचा मुजरा. कुठून आणलं हे वाघिणीचं काळीज? मला आदितीताईंनी सांगितलं तुझ्यावर ओढवलेलं संकट. पण साक्षी असंच एक संकट ओढावलं होतं भारतीय राष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू अरुनिमा सिन्हावर. एका अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले होते. पण त्यानंतर जिद्दीनं अरुनिमा सिन्हा यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केलं. साक्षी.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या भूमीतील लेक आहेस तू, जिजाऊंची लेक आहेस तू, तुलासुद्धा अशीच भरारी घेताला बघायचंय. तु स्वराज्य जननी जिजामाता मालिका पाहतेस हे कळलं म्हणून मुद्दाम या पेहरावात तुझ्याशी बोलतोय. तुलासुद्ध भरारी घेतलाना बघायचं आहे. उमेदिनं उभं राहताना बघायचं आहे. तुला भेटायला मी लवकरच येईन. त्यामुळे लवकर बरी हो, पुन्हा उभी राहा. तुझ्या या धाडसाला, तुझ्या या शौर्याला माझा त्रिवाज मुजरा”, असा संदेश डॉ. अमोल कोल्हे यांनी साक्षीला पाठवला आहे.

साक्षीला कृत्रिम पाय मिळणार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन साक्षीची भेट घेतली. शिवसेनेकडून साक्षी दाभेकरच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून आजच एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. साक्षी दाभेकरला लवकरच कृत्रिम पाय मिळणार आहे. सरकारने आपल्या मुलीच्या शौर्याची दखल घ्यावी आणि तिला पुढील उपचारासाठी मदत करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली होती. पेडणेकर यांच्यासह नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही साक्षीची भेट घेतली. तसंच तिला कृत्रिम पाय मिळवून देण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे.

इतर बातम्या :

दरडीतून बाळाला वाचवताना भिंत कोसळली, 14 वर्षांच्या धावपटूचा पाय कापण्याची वेळ, आर्थिक मदतीचं आवाहन

Video : रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, 80 ते 90 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली, नेमकं काय घडलं?

Special video message from MP Dr. Amol Kolhe for Sakshi Dabhekar

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.